चिऊ गीतरामायणातल्या ओळी अशा आहेत... दोन ओडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फ़ळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... दोष ना कुणाचा
|
Bee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 2:06 am: |
| 
|
मनिषा धन्यवाद.. इतका सोपा सरळ माहिती असलेला शब्द पण म्या पामराने तिथेही चुक केलीच..
|
>>>ऑप्शन १ : सुपारी देवून मला आधी कळेना जेवणानंतर पाहुण्याला सुपारी दिल्यावर पाय कसा काय मोडेल.
|
दोन ओडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फ़ळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा... दोष ना कुणाचा या कडव्यातली तिसरी ओळ, 'काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा' ही नसून, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसान्चा' अशी आहे. धन्यवाद, --तात्या.
|
Manmouji
| |
| Wednesday, August 23, 2006 - 4:54 am: |
| 
|
As two logs come together on tide When next one will come, where will it guide? So you meet, so much is the span Don't be so proud, you are helpless hey man!
|
Parop
| |
| Wednesday, August 23, 2006 - 5:28 am: |
| 
|
क्या बात है! मान गये मनमौजी
|
Bee
| |
| Wednesday, August 23, 2006 - 6:14 am: |
| 
|
मनमौजी, कवितेत मानवाला दोष दिलेला नाही, तुम्ही दोष देऊ पाहता आहे :-) चला मीही आता हिंदीमध्ये करुन टाकतो भाषांतर कम अनुवाद.. :-) जैसे मिला देती हैं दो लट्ठे आनेपर एक लहेर वैसे बिछडभी जाते हैं पल मे फ़िरसे एक बार, यू मिलना-बिछडना हैं समय समय की बात ये इन्सान तू गम ना कर.. अफ़सोस मगर यही हैं कुदरत गदीमा असते तर एखादं काष्ठशिल्प बक्षिस देऊन माझी स्तुती केली असती :-(
|
Ludabuda
| |
| Wednesday, August 23, 2006 - 7:29 am: |
| 
|
फटकवलं असत रे त्या गदिमांनी तुम्हाला. आगदीहाताला मिळेल त्या काष्ठानी
|
>>>> फटकवलं असत रे त्या गदिमांनी तुम्हाला. आगदीहाताला मिळेल त्या काष्ठानी बर्याच ठीकाणचा स्वानुभव दान्डगा दिस्तोय! DDD
|
लिंबु भाउअ अगदी डेस्कवर डोक ठेवुन मनमोकळे हसुन घेतले. आजुबाजुचे तर टकामका बघत होते... जळी स्थळि काष्ठी पाषाणी चा अर्थ मी तरि आजपर्यंत "इकडे तिकडे सगळीकडे" असाच घेत होते. मझ्य माहितीत तोच अर्थ होता...
|
हो रुपाली अग त्याचा थोडक्यात अर्थ तोच आहे सगळीकडे
|
Zakki
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:23 pm: |
| 
|
हिंदी व इंग्रजीत अनुवाद करण्याबद्दल धन्यवाद. आजकाल पुण्या मुंबईकडे बर्याच लोकांना मराठी कळत नाही. त्यांना कळेल. आता हळू हळू सगळ्या मराठी लिखाणाचे भाषांतर करा. मग हवीय कुणाला मराठी? लोकांना लिहायला त्रास नि वाचायला त्रास. त्यापेक्षा आपले फाड फाड इंग्रजीत बोलले की कसे, एकदम हुष्षार असल्यासारखे वाटते.
|
या जळी स्थळी.. वरून तमाशातला एक विनोद आठवला... कृष्ण गवळणीना व मावशीला स्वत:ची ओळख करून देताना सांगत असतो.. अगं, मी कुठे राहतो म्हणून काय विचारतेस? मी सर्व विश्वात चराचर व्यापून राहीलेलो आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र मी आहेच. यावर मावशी.. 'कायरे म्हंजी तू संडासात पण असतो काय रे?' कृष्णाची गोची आणि प्रचंड हशा!!!
|
Bee
| |
| Thursday, August 24, 2006 - 9:40 am: |
| 
|
आजकाल अशा विनोदावर कुणीही हसेल असे वाटत नाही रॉबीनभाऊ. तुला तरी येईल का हसायला सांग बरे.. त्यापेक्षा तुझे नि झक्कींचे विनोद सातपटीने चांगले असतात...
|
तसे नाही बी, तमाशा ही उत्स्फूर्त आणि कुठलेही स्क्रिप्ट नसलेली कला आहे. एन एस डीचे महर्षी अल्काझी तर ती पाहून थक्क झाले होते. त्यातले बरेच विनोद हे त्या क्षणी सुचलेलेही असतात. मुळात विनोदाच्या ऐवजापेक्षा त्याचे अफलातून असलेले टायमिन्ग हे ह्या विनोदाचे खरे मर्म आहे. त्यासाठी तो तमाशा लाईव्हच पहायला पाहिजे. त्यामुळे लिखीत स्क्रिप्टमध्ये डेड वाटणारे विनोद प्रत्यक्ष स्टेजवर एकदम फटाक्यासारखे फुटत जातात.... त्यात नुसते आँ असे साभिनय म्हटले तरी मोठा लाॅफ्टर येऊ शकतो... अर्थात तमाशा कलावन्त हे अशिक्षीत अथवा अर्धशिक्षीत असल्याने फार intellectual विनोदाची अपेक्षा करणे बरोबर नाही. प्रेक्षकही'तसलेच' असल्याने (माझ्यासारखे) सगळाच protocol जुळून मझा येतो...
|
Zakki
| |
| Thursday, August 24, 2006 - 11:56 am: |
| 
|
छे छे रॉबिनहूड, तुम्ही कसले अशिक्षित किंवा अर्धशिक्षित! निदान तुम्ही फार कुशाग्र बुद्धीचे असणार. बर्याच लोकांना जे सुचत नाही ते तुम्हाला सुचते, नि तुम्ही प्रतिक्रिया देता त्यावरून ते लक्षात येते.
|
शालजोडीतले... .. शालजोडीतले... !!
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 5:54 am: |
| 
|
जर नावापुर्वी 'श्री' लावले तर पुढे नावानंतर 'जी' लावणे चुकीचे आहे की बरोबर? इथे बरेच जण श्री. शैलेशजी दामले, श्री. सुधीरजी गाडगिळ असे सारखे सारखे म्हणत होते म्हणून मला ते कानाला चुकल्यासारखे वाटले. माझ्यामते एकतर तुम्ही श्री लावा किंवा जी लावा. दोन्ही एकाच वेळी लावणे चुकीच होय. १) मला काय ठाव नाही? २) मी रोज चार ठाव जेवते? पहिल्या वाक्यावरुन 'ठाव असणे' म्हणजे माहिती असणे असा अर्थ निघतो. अगदी ठावूक असल्याप्रमाणे प्रमाणे. दुसर्या वाक्यात, ठाव म्हणजे किती वेळा, कितीदा असा अर्थ निघतो. 'ठाव' हा शब्द वापरुण एक दोन वाक्य तयार करण्याचा मी प्रयास केला जेणेकरुन सराव होईल, मी विसरू नये. ती वाक्य बरोबर आहे हा हे बघा. १) मी चार ठाव तुला फ़ोन केला. २) दिवसातून चार ठाव झोपा काढायच्यात आणि चार ठाव हादळायचं ह्यापलिकडे काही ठाव नाही तुला.. हे सर्व बरोबर आहे ना?
|
बी, ठाव चे अनेक अर्थ आहेत १-- माहीत असणे ठाव हाय मला. २--मागमुस त्याचा शेवटपर्यंत टाव लागला नाही पोलिसांना. ३---जेवणाचे ताट--- ठावभर भात खाल्ला. ४ स्थान सध्या ठाव ठिकाणा काय तुमचा इतर अर्थ असल्यास मला माहीत नाहीत अथवा आठवत नाहीत
|
Bee
| |
| Monday, August 28, 2006 - 6:53 am: |
| 
|
छान मनिषा. एकंदरीत ठाव म्हणजे 'माहिती' असा एक अर्थ मी घेतला. २र्या वाक्यात मी जो ठाव शब्द वापरला तो तुझ्या वाक्यांमध्ये मला दिसला नाही. तेंव्हा ठाव म्हणजे ताट आणि किती वेळा, कितीदा असे एकूण ३ अर्थ निघतात.
|