वात्रट शब्द आला आहे वातरट पासून. वात झाल्यानन्तर माणूस काहीही असंबद्ध बरळू लागतो.तसे बडबडणारा तो वात्रट. व्रात्य म्हणजे खोडकर... दशग्रंथी ब्राम्हन म्हणजे ज्याने दहा धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे तो. वेदी(याला सरदार बेदी असे म्हणतात)द्विवेदी,त्रिवेदी, चतुर्वेदी हा त्यातलाच प्रकार....
|
Bee
| |
| Monday, August 14, 2006 - 10:26 am: |
| 
|
... व्रात्यबद्दल रॉबीनचे धन्यवाद! मला अंतपूर शब्दाचा अगदी ठाम अर्थ हवा आहे. मी कित्येक कवितांमधून हा शब्द वाचला आहे.. माझ्या मतानुसार अंतपूर म्हणजे मृत्युनंतरचे ठिकाण.. CBDG
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 10:39 am: |
| 
|
बी अंतःपूर म्हणजे जर मृत्युनंतरचे ठिकाण तर स्वर्ग, नरक कशाला म्हणतात? मृत्युलोक कशाला म्हणतात? अंत म्हणजे कसला अंत? कोणाचा अंत? पूर म्हणजे काय? तो कशाचा असू शकतो? की त्याला अंत असे म्हणतात? मग अंतःस्थ म्हणजे काय? अंत याला दुसरा शब्द कोणता? आतले याला काय म्हणतात? सांगू शकशील? 
|
Bee
| |
| Monday, August 14, 2006 - 10:48 am: |
| 
|
मूडी, एक ना धड अन भाराभार चिंद्या. केवढे ते प्रश्न आणि smilyes !!!!! त्यापेक्षा उत्तर माहिती असते तर सांगायला काय पैसे पडले असते तुला.. स्वर्ग, नरक, पाताळ ही ठिकाणांची स्पष्टपणे नावे झालीत. प्रत्येकाच्या वाट्याला ह्यातील कुठलेली अंतपूर येऊ शकते. हा शब्द नक्कीच अंत + पूर असा बनलेला नाही. तू पूर काय विचारतेस उगाच :-) दिवे घे हो ताई माई अक्का..
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 11:04 am: |
| 
|
बी अरे मला ताई माई अक्का कॉंग्रेसचा शिक्का नको म्हणूस जरुर म्हण. अन स्माईली टाकल्या म्हणून रागवु नकोस रे. तू नाही का भारंभार टाकतोस? बरं पूर म्हणजे प्रासाद, महाल म्हणजे खोली, रुम, दिवाणखाना, भवन( अख्ख्या घरालाही भवन म्हणतात, मराठीच भाषा ती) जसे कैकयी कोपभवनात गेली होती. आता कोप म्हणजे काय नको विचारुस. अंत म्हणजे आतल्या, अंतस्थः. आणि त्या चिंध्या आहेत हं, चिंद्या नाही. आणि हो मी पैसे घेत किंवा देतही नाही सांगायला. दिवे घे हो. आणि काही चुकले तर चुकले. बाकीचे जरुर दुरुस्त करतील. 
|
Moodi
| |
| Monday, August 14, 2006 - 11:40 am: |
| 
|
बी एक विसरले. महाभारत रामायण कालीन जे ग्रंथ असतात, त्यात शेवटच्या पानांवर त्या त्या शब्दांचा अर्थ दिलेला असतो, जमल्यास तो ही बघत जा.
|
Ajjuka
| |
| Tuesday, August 15, 2006 - 2:22 am: |
| 
|
अंतपूर नाहीये तो शब्द. अंतःपूर असा आहे. हा विसर्ग र चा लोप होऊन आलेला आहे संधी होताना. अंतर + पूर असा. मूडी म्हणते ते बरोबर आहे. पूर म्हणजे ठिकाण. अंतर या शब्दाचा अर्थ आतले किंवा मनातले असा होउ शकतो. या शब्दाच्या संदर्भात तो आतले हाच आहे. थोडक्यात अंतःपूर म्हणजे घरातील आतले ठिकाण. सगळ्या जुन्या गोष्टींच्यात राजाचे / राणीचे अंतःपूर हा शब्द येतो. त्याला private space हाही sense आहे. पण शब्दार्थ बघितला तर आतली जागा हा योग्य आहे. मी सहज उत्सुकता म्हणून शेवटचे archive वाचले त्यातले काही.. पांघरून हे क्रियापद नाही. पांघरणे हे आहे. मी शाल पांघरली.. इत्यादी.. असो. ग्रंथी याचा अर्थ glands असा होतो. ग्रंथी होणे असे क्रियापद मी तरी ऐकले नाही. दशग्रंथी चा अर्थ बरोबर आहे वरच. गबाळग्रंथी हे विशेषण माणसाला फारसे लागू पडत नाही. तो गबाळग्रंथी आहे असे शक्यतो म्हणले जात नाही तर त्याचा कारभार गबाळग्रंथी आहे असे म्हणले जाते. यावरून तरी मला ग्रंथीचा संदर्भ maintaining (books) याच्याशी असावा असे वाटते. असो..
|
Bee
| |
| Tuesday, August 15, 2006 - 2:33 am: |
| 
|
अज्जुका, खूप सुंदर माहिती दिलीस. मी आज सकाळी इथे येऊन विसर्ग विसरलो हे लिहिणारच होतो. तेवढ्यात तुच बरोबर केलेस. तुझे, मूडीचे दोघींचे thanks
|
Shonoo
| |
| Wednesday, August 16, 2006 - 1:19 am: |
| 
|
बी सर्वसाधारणपणे राण्यांच्या ( स्त्रियांच्या )निवासाची जागा या अर्थाने अन्त:पूर हा शब्द वापरला जातो.
|
Bee
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:01 am: |
| 
|
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ह्यामध्ये काष्ठी शब्दाचा अर्थ काय होतो आणि ते काष्ठी आहे की काष्टी आहे? काष्टा हा नऊवरीला असतो इतके माहिती आहे. ह्यावरुन वाटते की हा शब्द काष्ठा असा असेल. (नेसलेल्या नऊवारीच्या कुठल्या भागाला काष्टा म्हणतात मला माहिती नाही.) तसेच रांधा-वाढा-उष्टे-काढा हे शब्दही कसे लयबद्ध आणि एकमेकांना चिकटून आलेले वाटतात. मराठी भाषेत असे समूहाने एकत्रीत आलेले शब्द कुणाला माहिती असेल तर इथे लिहा.
|
Nvgole
| |
| Thursday, August 17, 2006 - 6:03 am: |
| 
|
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी म्हणजे पाण्यात, जमिनीवर, लाकडात आणि दगडात.
|
Milindaa
| |
| Thursday, August 17, 2006 - 12:14 pm: |
| 
|
काष्टा तो कासोटा असतो
|
नऊवारी साडीचा असतो तो काष्टा आणि इथे काष्ठ असा शब्द आहे काष्ठ म्हणजे लाकुड. कष्ठशिल्प हा शब्दप्रयोग ऐकला असेल.
|
Moodi
| |
| Thursday, August 17, 2006 - 1:22 pm: |
| 
|
नाही मिलिंदा बी म्हणतोय ते बरोबर आहे. कासोट्याला काष्टा पण म्हणतात. काष्ट्याची साडी असाही शब्द प्रचलीत आहे.
|
Asami
| |
| Thursday, August 17, 2006 - 2:51 pm: |
| 
|
बाकी काही असो, bee ने काष्ठीचा धरलेला अर्थ ठेवून जळी - स्थळी वाचले तर
|
Maitreyee
| |
| Thursday, August 17, 2006 - 3:04 pm: |
| 
|
असाम्या! अग्गदी तेच डोक्यात आलं होतं माझ्या
|
Naatyaa
| |
| Thursday, August 17, 2006 - 3:08 pm: |
| 
|
असामी तुझा मवाळ स्वभाव काही जाणार नाही!!
|
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ह्यामध्ये काष्ठी शब्दाचा अर्थ काय होतो आणि ते काष्ठी आहे की काष्टी आहे <<<<बी , काष्ठी म्हणजे धोतराचा काश्टा . आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी महणजे दगडा वर जळून पडलेले धोतर ! लक्षात ठेव आणि पुन्हा विसरु नको !
|
Zakki
| |
| Thursday, August 17, 2006 - 4:53 pm: |
| 
|
आयला मिलिंदा. काहीतरी कारण काढून एकदम कासोट्याला हात घालतोस. बरे नव्हे हो! मार खाशील एक दिवस.

|
Anilbhai
| |
| Thursday, August 17, 2006 - 5:57 pm: |
| 
|
काय गम्मत आहे. गोव्यात काश्टी म्हणजे लंगोटी. 
|