|
Saurabh
| |
| Friday, August 04, 2006 - 11:58 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मित्रहो, तुम्ही joomla ह्या open source content management system बद्दल कदाचित ऐकले असेल. ह्या system मधे निरनिराळ्या भाषांत संकेतस्थळे बनवता येतात. हिंदी मधील indicjoomla हे एक उत्तम उदाहरण आहे. ह्यासाठी त्या त्या भाषेतील एक शब्दसूची आवश्यक असते. मराठी भाषेसाठी मात्र अजून अशी सूची उपलब्ध नाही ( joomala च्या संदर्भात). मी ती करण्याच्या विचारात आहे (मुख्यतः ह्या संकेतस्थळासाठी). पण प्रत्यक्ष मात्र संगणकीय शब्दांना प्रतिशब्द शोधणे हे वाटले होते त्यापेक्षा बरेच कठीण आहे असे लक्षात आलेले आहे . तरी इथे तुम्हा सर्वांची मदत घेईन म्हणतो. खाली मी काही पारिभाषिक शब्द देतो आहे. संकेतस्थळांच्या संदर्भात ह्या शब्दांना चपखल प्रतिशब्द सुचवाल का? धन्यवाद.
|
Saurabh
| |
| Saturday, August 05, 2006 - 12:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
1.Restricted access: नियंत्रीत कक्ष? 2.login 3.Show 4.Hide 5.Save 6.Apply (apply a particular setting अशा अर्थाने) 7.Cancel 8.Print: मुद्रण? मुद्रांकन? 9.Archive/Unarchive: 10.Delete: क्रमशः
|
Nvgole
| |
| Saturday, August 05, 2006 - 6:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रेस्ट्रिक्टेड ऍक्सेस म्हणजे मर्यादित शिरकाव किंवाप्रवेश लॉग इन म्हणजे दाखल होणे शो म्हणजे दाखवणे हाईड म्हणजे लपविणे सेव्ह म्हणजे साठविणे अप्लाय म्हणजे अंमलात आणणे कन्सल म्हणजे रद्द करणे प्रिंट म्हणजे छापणे, मुद्रण करणे आर्काईव्ह म्हणजे संग्रह करणे, अन आर्काईव्ह म्हणजे संग्रहातून बाहेर काढणे डिलीट म्हणजे काढून टाकणे, नष्ट करणे, नाहीसे करणे
|
वा एनव्ही, झकास! सौरभ, है क्या आव्वाज? विचार अजुन! (म्हन्जे मला दोन्ही भाषेतले कळतील) डिलिटला पुसणे, उडविणे, साफ करणे असे पर्याय होऊ शकतात का?
|
'क्लिक करणे' याला काय म्हणता येईल ?
|
Nvgole
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
क्लिक करणे = टिचकी मारणे
|
|
|