|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:43 am: |
| 
|
'हा हंत हंत नलिनीउद्धार' ही ओळ कुणाची आहे आणि ह्या ओळीचा अर्थ कुणाला सांगता येईल का? खूप खूप आभारी आहे सर्वांचा..
|
बावते... बावणे, अर्थात कोमेजणे ..
|
Giriraj
| |
| Tuesday, July 18, 2006 - 5:50 am: |
| 
|
आरति प्रभूंच्या एका कवितेतल्या ओळी.. डाळींबाचे दाणे बशीत बावले तरी आल्या नाहीत चिमण्या दारात... बावणे म्हणजे सुकणे,कोमेजणे,शिळे होणे... (बी,एक प्रश्न,तुला नेमका विरुद्ध अर्थ आहे असे का वातले?सहजच विचारतोय...)
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 6:51 am: |
| 
|
लिंबूटिंबू, गिरिराज खूप खूप धन्यवाद. गिरिराज, आरती प्रभुंच्या ओळींबद्दल धन्यवाद. मी नेमका विरुद्ध अर्थ घेतला कारण धगीच्या बाष्पामुळे कदाचित शिशिरात गार पडलेली कळी पाकळी उमलली असेल असे मला त्या कवितेचा अर्थ घेताना वाटले.. ह्या हंत हंत बद्दल कुणाला माहिती असेल तर सांगा रे.. मी खूपदा ही ओळ वाचली आहे विविध लेखात. hence I am very curious..
|
Shonoo
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:23 pm: |
| 
|
मेषपात्र या शब्दाची व्युत्पती काय आहे? अर्थ मला माहिती आहे. पण हा शब्द कशावरून आला असावा?
|
Shonoo
| |
| Tuesday, July 18, 2006 - 12:25 pm: |
| 
|
हा हन्त हन्त ह्या चा अर्थ हत्तीने आपल्या मस्तीत कमळाचे फूल चुरगाळून टाकल्या बद्दल चे दु:ख असा काहीसा आहे. चू. भू. दे. घे.
|
हा हन्त हन्त नलिनि गज उज्जहार अशी ओळ आहे. हा हन्त हन्त हा एक खेदवाचक उद्गार आहे, अरेरे अशा अर्थाचा.
|
Bee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:02 pm: |
| 
|
मैत्रेयी, अशी ओळ आहे का ती. मी ही ओळ तुज आहे तुजपाशी ह्या नाटकात पहिल्यांदा ऐकली त्यावेळी मला 'हा हंत हंत नलिनी उद्धार' अशी ऐकायला आली. त्या नंतर तू म्हणतेस त्याप्रमाणे अरेरे सारख फ़क्त हा हंत हंत असे कितीतरी लेखात मी वाचले. शोनूनी दिलेला अर्थ बरोबर असेल तर नलिनी म्हणजे फ़ुल आणि उज्जहार म्हणजे तुडविने.. गज माहितीच आहे. धन्यवाद मैत्रेयी.
|
Shonoo
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:17 pm: |
| 
|
बी सर्व साधारणपणे क्रियापदांमधे बाणातला ण असतो. नळातला नाही. बावणे, कोमेजणे, तुडवणे, अडवणे इत्यादी. याला अपवाद असू शकतील, पण मला पटकन तरी काही आठवले नाहीत.
|
इथे हिंदी शब्दांचे अर्थ विचारले तर चालतील का? मला " जजबा " या शब्दाचा अर्थ हवाय.. कोणाला माहीत आहे का? !!!.. .. .. .. ..
|
Zakki
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:26 pm: |
| 
|
बी, interest असल्यास वाच, नाहीतर admin ना सांगून उडवून टाक: रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति चंद्रभानू इत्थं विचिंतयिती कोषगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार असा मूळ श्लोक आहे. रात्र जाईल, सकाळ होउन बरेच काही काही होइल, नि कमळाच्या पाकळ्या उघडतील. मग मी त्यातून बाहेर पडीन, अशी आशा करणार्या भुंग्याचे दुर्भाग्य यात वर्णन केले आहे. बिचारा असा विचार करत असतानाच हत्तीने कमळ उपटून टाकले. (अर्थात् चित्रात दाखवतात तसे श्री लक्ष्मीला वहायलाच! असा आपला माझा तर्क). संस्कृत व्याकरणातील 'सति सप्तमि' या विशेष वाक्प्रचाराचे एक उदाहरण म्हणून हा श्लोक मी पाठ केला होता. एस. एस. सी. च्या संस्कृत परिक्षेत जर शंकरशेट वगैरे मिळवायची असेल, तर नुसते गाईडमधले वाचलेले लिहून पुरत नाही. काहीतरी करून आपल्याला संस्कृत जास्त माहित आहे असे दाखवावे लागते, म्हणून असले प्रकार करावे लागतात.
|
Storvi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 3:45 pm: |
| 
|
>>जजबा>>म्हणजे emotion हो ना?
|
Nvgole
| |
| Tuesday, July 18, 2006 - 4:01 pm: |
| 
|
लोपामुद्रा, स्टो, जजबा भावना हे बरोबरच आहे. झक्की गुरूजी, नमस्कार, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं भास्वानुदेष्यति हसिष्यति चक्रवाकं इत्थं विचिंतयिती कोषगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार
|
thanks storavi aaNi Nvgole, maajhaa thodaa gonadhal jhaalaa hotaa!!!
|
जजबा म्हणजे भावना. त्याचे अनेक वचन जजबात असे होते....
|
Bee
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:22 am: |
| 
|
झक्की, इतके छान पोष्ट्स उडवून टाकायचा विचार डोक्यात येणेच नाही.. मला फ़क्त एक ओळ माहिती होती, तुम्ही पूर्ण श्लोक अर्थासहीत सांगितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. सोबत गोळेंचेही आभार ज्यांनी एक शब्द बरोबर केला.. खेळणे, पिणे, जेवणे, खाणे, वाचणे, चालणे, पडणे, मारणे, पिळणे, चारणे, वाळविणे, सुकविणे, करणे, झोपणे, जोजविणे, फ़िरणे, चोरणे, खोडणे, फ़ोडणे, भरणे, सांडणे, उबडणे, लावणे, काढणे, ठेवणे, उचलणे, पळणे, धावणे, बसणे, उठणे, थांबणे, तोडणे, जोडणे.. .. अरे वाह शोनू वरील सर्व क्रियापदांमध्ये बाणातलाच ण येतो आहे की.. मज्जा आली हा नियम जाणून.. इथे जर कुठे न हवा असेल तर जाणकार मंडळी बरोबर करतीलच.
|
Zakki
| |
| Wednesday, July 19, 2006 - 2:27 pm: |
| 
|
अरे बापरे बी! एव्हढे सगळे तू करतोस? एकाच वेळी नाही ना? मग भाजणे, रडणे पण का नाही करत? एक विचार: बहुजन समाज जी बोलतो ती भाषा बरोबर. म्हणजे शेकडो वर्षापूर्वी सगळे संस्कृत नि नंतर प्राकृत बोलत असत, मग मराठी आली. इतरत्रहि, उर्दू नि कुठलीतरी दुसरी भाषा यातून हिंदी झाली. मग आता महाराष्ट्रात जर बहुसंख्य लोक 'कनिक, लोनि आनिक पानि आन.' असे म्हणत असतील तर 'ण' हवाय् कुणाला? जे 'ण' म्हणत असत ते आजकाल बहुधा इंग्रजीत किंवा हिंदीत बोलतात किंवा परदेशात जातात!
|
Nvgole
| |
| Wednesday, July 19, 2006 - 3:23 pm: |
| 
|
अशे काहून बोलताजी झक्की महाराज, आम्ही तं आहो न इथे.
|
narendra.. ... ajun giriraj bhaiyyaa kase padhaarale naahit.!!!
|
Shonoo
| |
| Wednesday, July 19, 2006 - 4:08 pm: |
| 
|
उबडणे म्हणजे काय? मी हे क्रियापद पहिल्यांदाच ऐकले.
|
|
|