Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Anuradha patil

Hitguj » Language and Literature » पद्य » Anuradha patil « Previous Next »

Sumati_wankhede
Friday, July 14, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

auradha patil hyanchyaa 'diganta'hya kavitasangrahaatil kahi kavita.

Sumati_wankhede
Saturday, July 15, 2006 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१.
लुटतांना उधळतांना
अपार अनावर झालो
आभाळ कवेत घेताना
पुन्हा एकदा भरून आलो

सांगतेस पुन्हा पुन्हा
शब्दात ओतून सारा जीव
ठाऊक आहे रे सारे काही
त्या दानात नव्हतास 'तू'.

२.
सीमा विसरून माझा झालास
असे दान तुझेच होते
लाख हातांनी देऊ केलेस
एवढेच मला पुरे होते.

३.
किती ऋतूंना परत पाठवलंय
मला माहीत आहे
घरे नुसतीच उजाड होतात
असे नाही.

४.
एकाकी जळणारे कंदील घेऊन
दूर घाटावरच्या नावा
पाण्यावरून सरकत जातात
निघून जाते केवढे माझ्यातून
सावल्या पाण्यावर नाचत राहतात.




Sumati_wankhede
Wednesday, July 19, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

५.
भाबड्या आशावादाने पाहात
आलेय मी
ही उजाड खेडी,
गुडघ्याभोवती हातांची मिठी घालून
बसलेलं हे जीवन;
किती समजूतदारपणानं संपत
जातात ही माणसं.

६.
अथांग क्षितिजाच्या काठांना घालीत पालाण
निघून गेलेत स्वप्नांचे काफिले
निशब्द कोसळतात आज सरी आकाश हरवून
गहिवरले मातीच्या दिठी दिठी मरण सोहळे.

७.
कुठे हरवतात माणसं अशी
मनात वाढणारी
आणि दर्वळून उठतात
असंख्य राग
आतल्या चूपचाप तारांवर.


Sumati_wankhede
Wednesday, July 26, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनाशी वाटांना कवटाळीत गेलोत आपण हरेक पराभव पचवीत
आपल्यासाठी नव्हत्या विस्कटलेल्या तळहाती रेषा... ठरवीत
कित्येक गंधार घननीळ होऊन आलेत बहरून आसमंत
कुठलाच किनारा गाठता आला नाही पाठ फिरवूनही आयुष्य मूर्त
दुःख ओथंबून पावलांशी दुरात दिवे उजळत जातात
स्पर्श, स्पंदनं कुठे कुणाची वाटे वाटेवर साद देतात
क्षितिजं हरवीत वळणावळणावर कुणासाठी थांबत आले
अग्न्याताचे सारे स्वर का असे अनावर झालेत
आभाळ असे मिटून गेले गहिवर सारे दाटल्यावर
तू घन निळा निळा तरी श्रावण बरसून गेल्यावर
पालवी फुटावी स्वप्नांना असा तू डोळ्यात बुडत जाणारा
उजळत जाताहेत दिशादिशा पाऊस आभाळभर झालेला
उलगडतोय आज भ्रमंतीचा अर्थ वादळे मनात थांबल्यावर
रुजत जावीत आंत आंत मुळे मातीत, तसा तू माझ्यात.


Sumati_wankhede
Wednesday, August 02, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दूर वाजतो पाऊस जळे गारवा मनात
माझी भिजलेली हाक संपले आभाळ प्राणात

दूर वाजतो पाऊस माझे संपावे सोहळे
या पाऊस धारांनी केले आयुष्य पांगळे

दूर वाजतो पाऊस सुने सुनेसे आंगण
कुणी रडावे कुशीत माझे वाजते कांकण

कुठे वाजतो पाऊस डोळा दाटते आसोशी
माझे थकलेले दुःख उभे इमानी दाराशी.


Sumati_wankhede
Wednesday, August 02, 2006 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपदा तशीच थांबलेय मी
तुझ्या अनाकलनीय प्रश्नांपाशी
पण म्हणून माणसं बदलतात
असं तू मला सांगू नकोस.
तुझ्या कुठल्याच क्षणाचं ऋण
मला चुकवता आलं नसेल
पण आज मला जरा रडून घेऊ दे.
नव्याने जगणे सोपेही असेल
पण आपली दुःखं आपलीच असतात
तुटलेले दुवे पुन्हा एकदा जोडून घेऊ दे.


Kishorasre
Sunday, February 17, 2008 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Simply supurb ! Many, numerous & infinite thanks to you for introducing such a lovely lines. I am surprised, there is no single post reply for your efforts since 2006. I have tremendous respect for Anuradha Patil since I read 'Divsendivas'. And I am glad that you have choosen & written Patils poem. Now, I am expecting some good lines from you of Patils & others too. Please dont let me down. Excuse me for this time, however, next time I will try to write in Marathi - Kishor



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators