Dineshvs
| |
| Wednesday, July 05, 2006 - 4:57 pm: |
| 
|
सुशेगाद हा मूळ पोर्तुगीज शब्द आहे. अर्थ विनयने सांगितला तोच.
|
Raina
| |
| Thursday, July 06, 2006 - 6:50 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा. (४ शब्दांची लिमिट, म्हणुन हे पुढचे वाक्य लिहायला लागले)
|
Abhi9
| |
| Thursday, July 06, 2006 - 8:06 am: |
| 
|
कुठेतरी सुशेगात असे वाचल्याचे आठवते. हा वेगळा शब्द आहे की सुशेगाद चाच अपभ्रंश
|
Bee
| |
| Monday, July 10, 2006 - 5:19 am: |
| 
|
एक नाही दोन नाही एक नाही की दोन नाही अशा वाक्यांचा अर्थ काय होतो? मी व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकात ही वाक्ये वाचली आहेत. माझ्या मध्ये एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी विचारतो आहे, त्याला परिस्थीतीच गांभिर्य समजवून सांगतो आहे आणि ती व्यक्ती अनुत्तरीतच आणि आपण पुढे पुढे विचारतच जातो.. बोलतच जातो. तेंव्हा त्या व्यक्तीची गप्प स्थिती व्यक्त करण्यासाठी 'एक नाही दोन नाही' असे वाक्य लिहिल्या गेले असेल. किंवा कशालाच न ऐकणे हा देखील मी एक तर्क केला आहे. जसे की आपण त्या व्यक्तीला समजवून सांगताना बाबारे असे कर.. तसे कर.. हे कर ते कर असे सांगतो मात्र तो कशालाच दाद देत नाही.. तेंव्हा एक नाही, दोन नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, July 10, 2006 - 5:31 pm: |
| 
|
अभि, दोन्ही प्रकाराने हा शब्द वापरतात. खरे तर सुशेगा s s s त मरे ? असे विचारायचे असते. आता या मरे, चा अर्थ अरे किंवा का रे सारखा. बी मला नाही वाटत मी लिहितोय ते बरोबर आहे, पण एखाद्याला उत्तर देणे सोपे व्हावे म्हणुन आपण पर्याय देतो, पहिला निवड किंवा दुसरा निवड, त्यावेळी तो मख्खासारखा बघत बसतो, त्यावेळी असे म्हणतात. हु नाही का चु नाही, हा पण यातलाच प्रकार
|
Bee
| |
| Tuesday, July 11, 2006 - 8:38 am: |
| 
|
दिनेश, मला कळले पण अचूक सांगता येत नाही मी विचारलेल्या वाक्याचा अर्थ. त्यासाठी मैत्रेयीचीच मदत लागेल असे दिसते हु नाही की चु नाही.. हे वाक्य मी कितीतरी वर्षानंतर वाचतो आहे. इथे आमचा मराठी बोलीभाषेशी अजिबात संबंध राहिला नाही. त्यामुळे असे वाक्य आजकाल कानावर पडने एकदम बंदच झाले आहे.
|
Giriraj
| |
| Tuesday, July 11, 2006 - 10:33 am: |
| 
|
बी,तू मला फ़ोन करत जा... बरीच मराठी वाक्ये कानावर येतील आणि तू 'एक नहि की दोन नाही'... 'हू नाही की चूँ नाही' करणार नन्तर! अभि,मुळात कोंकणि ही बोली भाषा आहे.. नन्तर तिला राजभाषेचा दर्जा देऊन नियमबद्ध केले गेले. आणि तसे कर्तांना मराठीच्या व्याकरणाचा त्यावर अर्थातच खूप प्रभाव पडला. लिपी कोणती वापरावी यावरूनही बरेच प्रकार झाले आणि सध्या रोमन आणि देवनागरी अश्या दोन्ही लिपी प्रचलित आहेत.. मात्र रोमन लिपी हि दक्षिण गोव्यातच अधीक वापरली जाते.. कोंकणि पाठय्पुस्तके देवनागरीतच आहेत.(निदान मि पहिलेली तरी)
|
झक्किंना जशी सगळीकडे रोबिनहूड साथ देतात तशी गिरी आणि बी ची साथ आहे वाटत.. !!! पण हा बी बी खरच उपयुक्त आहे दिनेश आणि इतर मंडळी माहिती देत रहा अशीच...!!!
|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:41 am: |
| 
|
लोपमुद्रा, झक्की जसे निमूटपणे ऐकून घेतात त्यातला मी वाटलो का बर तर.. मला कैदाशिनीचा अर्थ कुणी सांगेल का? ही शिवी तर नाही ना... just guessing!
|
असं म्हणतात की कैदाशीण ही लक्ष्मीची बहिण. म्हणजे वाईट बुद्धि. जिथं जिथं लक्ष्मी जाते तिथं तिथं मागोमाग ही पण जाते. आता का कैदाशीण आठवली? (असं म्हणतात! :D )
|
Raina
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:16 am: |
| 
|
कैदाशीण, म्हणजे दुष्ट, पाषाणहृदयी, राक्षशीण वगैरे... बायकांना उद्देशुन- अगदी असभ्य शिवी नाही पण हा काही सकारात्मक शब्द नाही.. पूर्वीच्या बायकांच्या बोलण्यात general gossip or एकमेकींच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला हा शब्द वापरला जायचा e.g तुझी XXX अगदी कैदाशीण आहे... किंवा त्या कैदाशिणीने माझ्या मुलावर काय अंमल केला कोण जाणे. ह्या शब्दाचा पुल्लिंगी form कधी ऐकला नाही- उदा- चांडाळणी- चांडाळ type चु.भु.द्या.घ्या
|
Raina
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:25 am: |
| 
|
गजानन- "आत्ता का ही अवदसा आठवली" - हे वाक्य अनेकदा ऐकलेवाचले आहे- पण आत्ता का ही कैदाशीण आठवली- हे पहिल्यांदाच वाचले.. माझं चुकत ही असेल कदाचीत.. तुम्हाला अजून माहिती असेल ह्या शब्दाबाबत तर सांगा ना..
|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:28 am: |
| 
|
अच्छा म्हणजे फ़ार वाईट शिवी नाहीये ही आणि पुरुष दुष्ट, पाषाणहृदयी आणि राक्षसी नसतात हेही सिद्ध झाले मी जरा बळ एकवटूनच लिहिली इथे तसेच एक शिवी आहे शिन्च्या नावाची. आमच्या विदर्भात ही शिवी कुणीच वापरत नाही.. कदाचित काहींना माहितीही नसावी. मी फ़क्त मराठी मालिकेत चित्रपटांमधून ऐकून आहे. अर्थ मात्र माहिती नाही.. सुरवातीला मला कन्च्या ऐकला यायच. कंच्या म्हणजे कुठल्या किंवा सुंदर असे दोन अर्थ निघतात.. बहुतेक सुंदरला कंचा असेल.. या येत नाही त्यात.
|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:31 am: |
| 
|
मी पण आता का ही अवदसा आठवली असेच ऐकले आहे.. पण असे होऊ शकते ना.. आता का ही अवदसा आठवली तुला कैदाशिणी
|
Raina
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:37 am: |
| 
|
पुरुष दुष्ट, पाषाणहृदयी आणि राक्षसी नसतात हेही सिद्ध झाले >> डोंबल !!! 
|
रैना, मी ऐकलंय असं, may be जास्त प्रचलीत नसावा हा शब्दप्रयोग. माझे चुकत असेल तर चू.भू.द्या.घ्या. आजकाल नाही का जरा कुठं गुणगुणायला जावं, तर कुठून तुला हिमेश आठवला, असं ऐकायला मिळतं. आता का ही अवदसा आठवली तुला कैदाशिणी <<< bee LOL
|
Maitreyee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:19 pm: |
| 
|
'कंचा' चा अर्थ सुन्दर? मी तरी नाही ऐकलाय!
|
बी, शिंच्या या शब्दाबद्दल मी पूर्वी कुठेतरी लिहिले आहे. शिंच्या हा शाॅर्ट फाॅर्म आहे. शिन्दळीच्या या शब्दाचा. विशेषत : ग्रामीण भागात शिन्दळ हा शब्द प्रचलीत आहे. शिन्दळ म्हणजे व्यभिचारी स्त्री. शिन्दळकी करणे म्हणजे व्यभिचार करणे. शिन्दळ बाइच्या मुलाला अरे शिन्दळीच्या शिवी देण्याचा प्रघात आहे. 'रांडेच्या' हा त्याचाच अवतार. व्यक्तीचा अपमान करण्यासाठी त्याच्या आइचा उद्धार करण्याची पद्धत शिव्याशास्त्रात सर्वत्र आहे. त्यामुळे व्यक्तीस अनावर राग येतो.... शिन्दळीच्या चे लघु रूप शिंच्या झाले. गमतीची गोष्ट म्हणजे ते सर्रास सभ्य कुटुम्बातही बिनदिक्कतपणे वापरले जाते... जसे क्वल्लापुराकडे रांडेच्या ही शिवी आहे याचाच विसर पडलाय... त्यांच्या दृष्टीने ते exclaimation आहे........
|
Storvi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:19 pm: |
| 
|
>>शिव्याशास्त्रात >> .. ..
|
Bee
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:27 am: |
| 
|
मैत्रेयी, ते एक गाणे नाही का.. कंचा रे कंचा रे प्यार मेरा साचा रुक जा न जा मुझे छोड के.. मग तो म्हणतो कंची रे कंची रे.. इथे कंचा कंची काय आहे मग? रॉcबीन तुम्हाला शिव्याशास्त्रात फ़ार गती दिसते हो छान
|