Asami
| |
| Friday, June 02, 2006 - 3:23 pm: |
| 
|
सामसूम बरोबर आहे. तुला सुनसान म्हणयाचे आहे का दुस्र्या शब्दामधे ?
|
हो सामसूम च बरोबर आहे. चिऊ, तू जे पाहणे चे लिहिलयस ते दिसणे ला लागू पडते! दिसणे म्हणजे (मुद्दम न घडता) नजरेला पडणे! पण पाहणे म्हणजे बघणे ही क्रियापदे एकाच अर्थाची आहेत असे मला वातते.
|
अरे बघणे पाहणे वरून आठवलं... शोधणे, हुडकणे ही असेच शब्द आहेत... दोन्हींचा अर्थ एकच... आता सांगली, मिरज, कोल्हापूर कडची मंडळी हुडकणे म्हणतात...आणि पुणेरी नमुने "शोधणे" हाच शुद्ध शब्द आहेत असं मानतात... मी एकदा पुण्यात गेल्यावर "ई हुडकणे काय म्हणतायत" असली काही वाक्य ऐकू आली होती ओ मॉड तो पुणे bb उघडा ना किती पाट्या साठून राहिल्यात कधीपासून
|
Ninavi
| |
| Friday, June 02, 2006 - 6:23 pm: |
| 
|
ई साठून काय म्हणतोस!! क्ष्क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष्क्ष 
|
तुंबुन म्हणायला पाहिजे खरंतर
|
Bee
| |
| Monday, June 05, 2006 - 8:21 am: |
| 
|
सूनसान तर आहेच रे पण त्या व्यतिरिक्त तो दुसरा शब्दाही खूपदा वाचनात आला म्हणून विचारले. धन्यवाद सगळ्यांचे! शोधणे आणि हुडकणे ह्या दोन शब्दांमधे नक्कीच फ़रक आहे. निदान हे दोन्ही शब्द कधी वापरायचे हे तरी मराठी बोलणार्याला माहितीच असते. जसे की माझी चप्पल हरवली तर ती मी शोधली.. शोधतो असे आपण म्हणतो. चप्पल हुडकतो आहे असे म्हणणे नक्कीच चुकीचे आहे. एखादी वस्तू हरवली नाही पण कुठे तरी अडगळीत दडून बसली आहे. तेंव्हा ती जी वस्तू आपण शोधतो त्याला हुडकणे म्हणतात. सर्वसामान्य शोधणे हे हुडकण्यालाही वापरू शकतो पण जिथे हुडकणे अगदी चपखल बसतो तिथे शोधणे हा शब्द वापरणे बरोबर वाटणार नाही. चु. भु. दे. घे.!
|
Bee
| |
| Monday, June 05, 2006 - 8:42 am: |
| 
|
मधे आणि मध्ये हे दोन शब्द वापरताना इतक्यांदा माझी चुक होत असावी आणि नक्की बरोबर कुठले हा विचार केला तर ते वाक्य पुढेच जात नाही
|
Shonoo
| |
| Monday, June 05, 2006 - 12:16 pm: |
| 
|
सवर्ण चा नेमका अर्थ काय? त्याची व्युत्पत्ती काय? सुरवातीचा वापर, आजकालचा वापर याच्यात फरक आहे का?
|
Bee
| |
| Tuesday, June 06, 2006 - 5:30 am: |
| 
|
एक प्रयत्न... स अधिक वर्ण बरोबर सवर्ण असे होऊ शकेल का? म्हणजे वर्णासह? वर्णासोबत? वर्णानिशी? बहुतेक सगळेच चुकते आहे माझे.
|
Mrunmayi
| |
| Monday, June 19, 2006 - 11:44 am: |
| 
|
bee, sanskrut pramane tu lihilayas te barobar aahe, savarna ha mazya mahiti pramane mhanunach gorya lokansathi vaprat yenar shabda aahe
|
Bee
| |
| Thursday, June 22, 2006 - 9:56 am: |
| 
|
'शेजेवर' ह्या शब्दाचा अर्थ हवा आहे. 'शेजी' म्हणजे 'जवळ' असा एक वर्हाडी शब्द आहे. मैत्रेयी, open space च्या बीबीवर मधे मध्ये बद्दल माहिती दिल्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार.
|
Maitreyee
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:14 am: |
| 
|
शेजेवर = बिछान्यावर, इथे शेजी या वर्हाडी शब्दाचा संबन्ध नाही
|
Deemdu
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:19 am: |
| 
|
शेज = बिछाना so शेजेवर = बिछान्यावर शेजारती = देव बिछान्यावर असताना म्हणजे देव झोपताना केलेली आरती
|
Maudee
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:22 am: |
| 
|
हा ख़र तर हिंदी शब्द आहे पण मला याचा अर्थ माहीत नाही. कोणी सांगू शकेल का? शब्द आहे " FANNA "
|
Deemdu
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:30 am: |
| 
|
FANNA - destroyed in love
|
माऊडी, त्या उर्दू शब्दाचा अर्थ होतो- destruction.
|
Maudee
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:40 am: |
| 
|
धन्यवाद दीम्डू, गजानन देसाई. GD मला तो हिंदी शब्दच वाटत होता.
|
Devdattag
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:52 am: |
| 
|
सवर्ण याचा संबंध रंगाशी नसून चतु:वर्ण्य ह्या भारतीय समाज संस्थेशी असावा असं माझं मत आहे
|
Maitreyee
| |
| Thursday, June 22, 2006 - 12:11 pm: |
| 
|
हो, 'सवर्ण' चा अर्थ शब्द्श : न घेता उच्च,वरच्या वर्णाचा(जातीचा) असा होतो.
|
Shonoo
| |
| Thursday, June 22, 2006 - 4:52 pm: |
| 
|
मलाही सवर्ण हा शब्द जातवाचक वाटतो. पण तो नेमका कुठल्या जातींना उद्देशून वापरला जातो ते विचारायचे होते. ब्राह्मण का ब्राह्मणेतर पण दलित किंवा मागासवर्गीय नसलेले का आणाखीन वेगळ्या समुदायासाठी वापरला जातो हा शब्द?
|