वाक्याचा अर्थ बदलणार नसेल तर संकोच का शब्द चालावा..
|
संदर्भानुसार भीड या शब्दाचे वेगवेगळे अर्थ निघतात. भीड चेपणे=भीति कमी होणे / जाणे. भीड घालणे=दबाव आणणे. [भीड=भीति,दबाव] भीड खर्चणे=वजन (influence) वापरणे. भीडभाड=आदर. मी त्याची अजिबात भीडभाड ठेवत नाही=मी त्याला अजिबात किम्मत देत नाही / मी त्याला अजिबात दबत नाही. [भीड=आदर] CBDG.
|
भिडस्त भीड पासूनच निघालाय वाटतं.
|
Chafa
| |
| Friday, April 21, 2006 - 8:05 pm: |
| 
|
आणि भीड "भ्याड" पासून निघाला असावा.
|
भीड भिकेची बहीण अशी एक मराठीत म्हणही आहे म्हणजे लाजाळूपणाने अगर संकोची स्वभावाने व्यवसाय केल्यास भिकेला लागण्यास वेळ नाही त्यामुळे पुणेकर कोणाचीही भीड भाड ठेवीत नाहीत..........
|
दक्षिणा, प्रकट हा शब्द बरोबर आहे.. प्रगट हा रूढ अपभ्रंश आहे.
|
भिडणे नावाचे एक क्रियापद आहे.त्यावरून भिडे आडनावाच्या लोकांवर आम्ही चावट असताना विनोद करीत असू. त्यातून हिन्दीत भिडन्त हा एक फारच अर्थवाही शब्द आहे अर्थ त्याचा encounter पण हिन्दीत तसे भिडना असे क्रियापद सर्वसाधारणपणे दिसत नाही
|
Atulpj
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:42 pm: |
| 
|
[भीड=आदर] निर्भिड म्हणजे निरादर का?
|
भीड म्हणजे आदर नाहीच आहे मुळी..... दडपणयुक्त संकोच म्हणा त्याला........
|
>>> भिडे आडनावाच्या लोकांवर आम्ही चावट असताना विनोद करीत असू. चावट असताना म्हणजे नक्की कधी आणि चावटपणा असा जाऊ शकतो का
|
'खाजगी' बरोबर आहे की 'खासगी' ?
|
खासगी बरोबर आहे. खास आणि आम असे दोन विरोधी शब्द आहेत.खास पणा जिथे राखला जातो ती खासगी. आम म्हणजे सर्वासाठी. दीवान ए आम आणि दीवान ए खास या जागा प्रसिद्धच आहेत. तसेच राजांचा अथवा पेशव्यांचा खासगी नावाचा विभाग असे म्हणजे त्यांचा कौटुम्बीक विभाग. त्याची व्यवस्था बघण्यास जे कारभारी असत त्याना खासगीवाले म्हणत. अजुनही हे आडनाव दिसून येते.
|
चावट म्हणजे चावणारा.तशा अर्थाने कुत्रा, डास हेही चावट असतात. ढेकूण देखील.दात पडल्यानन्तर बहुधा चावटपनाजात असावा. काही पुरुष तर 'चावट्ट मेले' ही असतात. पुण्याच्या जवळच्या एका गावात चावट पाटील नावाचे एक मराठा समाजाचे आडनावही आहे.
|
ते शोधीतील सीता... संदेह ह्यात नाही... निष्ठा प्लवंगमांची तु लोचनेस पाही... होतील सिद्ध सारे सर्वस्व अर्पिण्याला... सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला... होता फ़िरून माझे...ते सैन्य वानरांचे... होतील लाख शत्रू त्या दुष्ट रावणाचे... ते लंघतील सिंधू खणतील शैलमाला... सन्मित्र राघवांचा सुग्रीव आज झाला... ह्यात पहिल्या कडव्या मधे प्लवंगम आणि दुसर्यात शैलमाला म्हणजे काय robinhood ?
|
Jo_s
| |
| Tuesday, April 25, 2006 - 5:40 am: |
| 
|
"काटा रुते कुणाला" या गाण्याचा संदर्भ, मथितार्थ कोणी सांगेल का?
|
शैलमाला म्हणजे पर्वतरांगा, प्लवंगमाचा मराठीत शब्दार्थ बेडकाच्या ओरडण्याचा ताल असा दिला गेला आहे.
|
विप्लव म्हणजे माकड. प्लवंगम म्हणजे पण माकडच असावे असे वाटतेय. आणि या गाण्याच्या संदर्भानुसार ते माकडांच्या निष्ठेबद्दलच म्हटले असणार. CBDG
|
अमेय, संघमित्र प्लवंग म्हनजे बेडूकच. वाल्मिकीच्या रामायणात पुढील श्लोक आहे सत्पद तंत्री, मधुर अभिधानम प्लवंगम उदीरित कंठ तालम आविष्कृतम मेघ मृदंग नादै वनेषु संगीतम इव प्रवृत्तिम म्हणजे मधमाशांच्या मधुर गुंजारवाची तन्तुवाद्ये,बेडकांच्या डराव डरावचे कंठसंगीत,मेघांच्या गडगडाचे ढोल यांचे जंगलात सुनियोजित संगीत सुरू झाले आहे........ यावरून प्लवंग म्हणजे बेडूक हे स्पष्ट व्हावे. विप्लव म्हणजे माकड नाही. विप्लव म्हणजे खरे तर झंझावात. सर्व उखडून टाकणारा निष्ठेचाच प्रश्न असेल तर बेडूक पावसाळा आल्यावर ज्या religiously त्यांचे गायन करतो त्याच्याशी जोडता येईल. (अर्थात हा त्याचा ब्रीडींग सीझन असल्याने बेडकिणीला साद घालण्यासाठी तो ध्वनी करतो असे शास्त्र म्हणते म्हणजे हा त्याच्या निष्ठेपेक्षा त्याच्या वासूगिरीचाच जास्त भाग दिसतो...)
|
vaa, vaa Chaan vishleshan keley, tumhi evhadhe kuthe vaachataa, i mean konatyaa pustakaat ?
|
कुठे कुठे सापडत राहते.कधी आठवते, कधी नाही.. लोपे आहेस कुठे? तुला तीन मेल्स पाठवल्यात.. मिळाल्या की नाही?
|