|
Maanus
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:35 pm: |
| 
|
शिमला म्हनजे काय? बुगडी माझी सांडली ग, गाणे ऐकतोय, त्यात ती म्हनते, पैरन फेटा अन पाठीत शिमला. पैरन म्हनजे काय ते पन कुणी सांगीतले तर बरे होईल
|
Vaatsaru
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:48 pm: |
| 
|
to ' iXamalaa ' nasaUna ' Xaomalaa ' Asao Aaho mhNajao ÔoT\yaacao qaÜDo laÜMbaNaaro TÜk pazIvarÊ AaiNa pOrNa mhNajao ' baMDIvajaa ' XaT-. caU. BaU. Va. Gyaa.
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 8:02 am: |
| 
|
पूर्वाश्रमीचे ह्या शब्दाची फ़ोड आणि त्याचा अर्थ मला कुणी सांगेल का? धन्यवाद! नेमस्तक, अहो हा प्रश्न अगदी depth मधे मी शब्दार्थ ह्याच बीबीवर विचारला आणि इथे बघतो तर ते पोष्ट दिसत नाही.
|
बी, ते Looking for या विभागात विचारले होते ना?
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:57 am: |
| 
|
गजानन, धन्यवाद. मला वाटले मी इथेच तो शब्द विचारला. /hitguj/messages/35/1426.html?1140083682 इथे आहे ती लिंक. मैत्रेयीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
|
Mrunmayi
| |
| Friday, February 24, 2006 - 1:38 pm: |
| 
|
मला इथे १६ फ़ेब. पर्यंतचे posting दिसते आहे. पण bb तर update झालेला दिसतोय. असं का ?
|
Bee
| |
| Tuesday, February 28, 2006 - 2:49 pm: |
| 
|
आपल्याकडे खारुताईवर काहीतरी खास प्रेम दिसते. बाकी इतर प्रांतात तिला गिलहरी म्हणतात. पण आपल्याकडे तिला ताई म्हणतात. ह्याची काही कथा वगैरे कुणाला माहिती आहे का? खारुताईचे खरे नाव तरी काय? माझ्या मित्राने मला आज खारुताईला पाहून विचारले तुम्ही हिला मराठीत काय म्हणता मी त्याला म्हंटले खारूदीदी आणि तो खूप हसला
|
Moodi
| |
| Tuesday, February 28, 2006 - 3:02 pm: |
| 
|
देव जाणे!! मी तिला खारोटी, खारुटली, चावकुटी काहीही म्हणते प्रेमाने.
|
Dswati
| |
| Tuesday, February 28, 2006 - 3:09 pm: |
| 
|
आपल्याकडे लहान मुलांना गोष्टी सांगताना गोष्टीतल्या पात्राला दादा , ताई , काका , मामा , आजी असे संबोधतात. उदाहरणार्थ चिऊताई, कावळेदादा, बगळेदादा. हे प्राणी वा पक्षी त्यांना माहितीचे असल्यामुळे मुलांना त्याची जवळीक वाटून, ती गोष्ट आवडीने ऐकतात. मुख्यत्: जेवताना गोष्टीत रममाण झाल्यामुळे, इकडे तिकडे पळण्याच्या आत जेवण होते. खारूताई हा त्यातलाच प्रकार असावा.
|
माणसा आणि वाटसरा, पैरण म्हणजे ग्रामीण भागातील जुन्या पद्धतीचा शर्टच.बन्डीवजा. हा शब्द बहुधा पर्शियन आहे. मूळ शब्द आहे पैराहन. पुढे त्याचे पेहरन झाले. भान्डरकर रोड व प्रभात रोडच्या १५ व्या गल्लीच्या लिन्क मधे पेहरन नावाचे दुकानच आहे अर्थात तिथे पैरणी मिळत नाहीत ते सोड गालिबच्या एका शेरात आहे चिपक रहा है बदनपर लहूसे पैराहन हमारी जेबको अब हाजते रफू क्या है.... म्हणजे माझी पैरन रक्ताने भिजून शरीराला चिकटली आहे आता त्या पैरणीच्या खिशाला रफू करायची तरी काय गरज आहे
|
Ahojoshi
| |
| Friday, March 31, 2006 - 5:43 am: |
| 
|
निमन्त्रण आणि आमन्त्रण यातिल फ़रक कोणी सागु शकेल का धन्यवाद
|
Milindaa
| |
| Friday, March 31, 2006 - 10:13 am: |
| 
|
अहोजोशी, वर जे असंख्य आर्काईव्ज दिसताहेत ना, त्यात आहे बघा... थोडं शोधावं लागेल
|
Bee
| |
| Friday, March 31, 2006 - 10:26 am: |
| 
|
माझ्यामते आमंत्रण म्हणजे बोलावणे mean an invitation आणि निमंत्रण म्हणजे विनंतीपर बोलावणे. जसे की kind request for your important presence .
|
Dakshina
| |
| Friday, March 31, 2006 - 11:43 am: |
| 
|
एक समान प्रश्नं प्रगट झाला की प्रकट झाला?
|
भडभुंजा म्हणजे काय? हा शब्द बरेच दिवसात ऐकीवात आला नाही.
|
भडभुंजा म्हणजे लाह्या, कुरमुरे बनवणारा.
|
हव_हवै, धन्यवाद.म्हणजे माझ्या भावाने मायक्रोवेव्हमधे पॉप कॉर्न केले तर त्याला भडभुंजा म्हणायचे का? गंमत म्हणून विचारले, कृपया राग मानू नये. आता मी त्याला भडभुंज्या म्हणूनच हाक मारीन.
|
भडभुंजा म्हणजे लाह्या, कुरमुरे बनवणारा. >> अगदी बरोबर हवे. फरसाणाच्या दुकानातील माणुस. (आम्ही तेलकट माणसाला पण भडभुंजा म्हणतो.)
|
शिवी म्हणून वापरण्यासारखा साधा सरळ शब्द.... भाषेची कमाल 
|
"भीड" ला मराठीत प्रतीशब्द कुणाला माहीती आहे का
|
|
|