Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 5:57 am: |
| 
|
मानसी, तुझे बरोबर आहे. पुरु पूर्णपणे चुकीचा अर्थ घेतलास रे तू. मेनोपाॅजमुळे स्त्रि व्यथित झाली आहे असे तुला इथे कशावरुन वाटले? मानसी, अर्थ लक्षात आला पण पार्स्वभुमी तुला जर माहिती असेल ह्या कवितेची तर लिहितेस का..?
|
पुरु आणि इतर ग्रामस्थ, मधु मागशि या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे. तांब्यांच्या उतारवयात ताम्ब्यांच्या एका स्नेह्याने त्याना एक सुन्दर कविता पत्र लिहून मागणी केली होती. म्हणून ताम्ब्यानी त्यांची प्रतिभा आता सम्पत आल्याने ही मागणी पुरवू शकत नाही हे ही कविता त्याना पाठवून सूचीत केले होते. अर्थात हा ताम्ब्यांचा विनय होता हे ती कविता आcल द टाईम ग्रेट होऊन गेली यावरूनच दिसते. ह्या पार्श्वभूमीमुळे कवितेतील शब्दांचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे जाणवेल अशी अपेक्षा.....
|
Manasi
| |
| Thursday, June 08, 2006 - 12:37 pm: |
| 
|
robeenhood is right...Hope you understood it now puru मधु म्हणजे कविता लिहिणे आता शक्य नहि आता मी थकलो आहे आता कविता कसली 'लागले नेत्र हे पैलतीरि' हा सन्दर्भ घेउन पूर्ण कविता वाच
|
Bee
| |
| Friday, June 09, 2006 - 2:00 am: |
| 
|
पण मला एक कळत नाही की प्रतिभा संपत आली असे कधी होते का? उलट लेखक लिहित राहिला की त्याची प्रतिभा अजून तेजस्वी होते. कवितेच्या बाबतीत तरी प्रतिभा कमी झाली हे पटत नाही. कथा कादांबरीला नविन विषय न सुचने हे एक पटू शकते पण कवितेचे विषय हे वेगवेगळे असतात तेंव्हा प्रतिभा संपली हे काही कळत नाही. थोडे कठिण आहे आत्मसात करायला.
|
Soha
| |
| Friday, June 09, 2006 - 5:47 am: |
| 
|
मला वाटत प्रतिभा सम्पली ही स्थिती येऊ शकते. किम्बहुना सर्वच प्रतिभावन्ताच्या बाबतीत ती कधी ना कधी येतेच. काही लोक ती accept करतात. तर काही करू शकत नाहीत. उदा. तुम्ही जर कोणत्याही गाजलेल्या सन्गीत काराच्या रचना बघितल्या तर त्यात तुम्हाला कुठे ना कुठे तरी पुनराव्रुत्ती आढळेल. शेवटी त्यान्चा एक साचा बनतो. अर्थात काही लोकान्ना basically च इतकी अलोउकिक प्रतिभा लाभलेली असते की मग त्यान्नी अशा साचेबन्द रचना केल्या तरी त्या चान्गल्या वटतात. पण काही कलाकार नवनिर्मितिच्या आन्नदासाठी रचना करतात. मग त्यान्च्या जेव्हा लक्षात येते की आपल्या कामात तोचतोचपणा येतोय तेव्हा ते रचना करणे बन्द करतात. विन्दा करन्दिकरान्नी काहीश्या अशाच भुमिकेतून कविता लिहिणे बन्द केले. त्यान्च्या एका मुलाखतीत मी हे वाचले होते.
|
Santu
| |
| Saturday, June 10, 2006 - 1:29 pm: |
| 
|
सोहा तुज बरोबर आहे.प्रतिभे ला ओहोटि लागते. hemigway नी तर स्वताला शेवटि गोळि घालुन घेतली. नौशाद हा संगितकार काराचे पण असेच झाले.मधे त्याचा एक सिनेमा (हल्लि)आला होता.पण त्याला जुनी झळाळी नव्हती. प्रतिभावंताचा एक काळ असतो.
|
Santu
| |
| Saturday, June 10, 2006 - 1:42 pm: |
| 
|
बी मला वाटते की अनुभवाने कारागिरी polished होत जाईल.प्रतिभा नाहि.प्रतिभा हि उस्फ़ुर्त आहे. आपल्याला काय वाटते. vo;taire न्द्यानेश्वरानि आपल्या रचना लहान वयातच केल्या.
|
Jo_s
| |
| Sunday, June 11, 2006 - 8:50 am: |
| 
|
मित्रहो, या कवितेच हिंदीत भाषांतरही झालं आहे. मी एकदा ते दूरदर्शनवर पाहीलं, ऐकलं आहे. सुधीर फडकेंच्या आवाजात. त्याच्या पहील्या ओळी अशा आहेत. पुढच्या असल्यास टका इथे. "मधु मांगन मेरे मधुर मीत मधुके दिन मेरे गये बीत" सुधीर
|