|
Bee
| |
| Monday, October 31, 2005 - 2:25 am: |
|
|
मला आणि मराठी प्रेमीला दिवाळीच्या विधियुक्त पुजेची माहिती हवी होती. आणखी एक माहिती खूप दिवसांपासून विचारायची होती. देवापुढील दिव्याची ज्योत आपल्याकडे असावी की देवाकडे? मी खूप ठिकाणी दिव्याची ज्योत आपल्याकडे असताना पाहिली आहे. मी मात्र देवाकडे ज्योत ठेवतो. मराठी प्रेमी, ढोबळ मनाने, दिवाळीची पुजा मी अशी करतो. घरातील सर्व दारांना आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. मधेमधे लिंबू, मिरची, झेंडूची फ़ुले ओवावे. जिथे आपण लाभ शुभ लिहितो तिथे पाच बोटे हळदी कुंकवाची लावावी. नंतर नविन केरसुनीची पुजा करावी. असे म्हणतात दिवाळीच्या दिवशी नविन झाडू, नविन दुरडी आणली म्हणजे घरात बरकत राहते. घरात तांदूळाच्या लाह्या उधळाव्या. पुजेच्या आदल्या दिवशी देवाची वस्त्रे, पणत्या, दिवे, कळस नीट घासून धुवून ठेवावी. हळद, कुंकू, चंदन, अष्टगंध, नारळ, विड्याची पाने, सुपार्या, तांदूळ, फ़ुले, पाच प्रकारची फ़ळे, पंचामृतासाठी मध, दूध, तूप, दही आणि साखर, रांगोळी आणि रांगोळीचे छापे, बोळकी जी गौरीहरापेक्षा छोटी असतात, दोरा, बत्तासे ह्या पुजेला लागणार्या वस्तुंची आपल्या परीने नि उपलब्ध असेल त्याप्रमाणे तयारी करून ठेवावी. चौरंग, करदड किंवा केळीचे खांब हे जर असेल तर पुजा मांडायला आणखी छान वाटते. संध्याकाळी पुजेची वेळ झाली की उंबरठ्यापासून सुरवात करून लक्ष्मीची सात पावले रांगोळीनी किंवा रांगोळीच्या छाप्यानी काढावी. देवाच्या पाटाभोवती, जमल्यास दारात स्वस्तिक वेलींची शुभेचिन्हे काढावीत. त्यावर हळद कुंकू फ़ुले वहावी. पुजेच्या पाटावर आधी कोरा कपडा अंथरून घ्यावा. त्यावर आधी विड्याचे पान सुपारी ठेवून गणेशाची स्थापना करावी. मग तांदूळाची रास करून त्यावर कळस मांडावा. कळसात एखादे नाणे, सुपारी, तांदूळ टाकावे, कळसावर स्वस्तिक आखावे, हळद कुंकवाची पाच बोटे लावावी. कळस दोर्यानी पाचवेळा गुंडाळून घ्यावा. तत्पुर्वी दोरा कुंकवाच्या पाण्यानी लालसर करून घ्यावा. पुजेची जी भांडी, देव आहेत त्यांना हळद कुंकवाची बोटे लावावीत. फ़ुलांच्या पाकळ्या वाहाव्यात. हे करताना डोक्यावर गांधीटोपी किंवा खांद्यावर उपरणे घ्यावे. तिळाचे तेल घालून पणत्यांची आरास मांडावी. पुजेच्या बोळक्यात लाह्या बत्ताशे भरून ठेवावे, त्यांनाही दोर्यानी गुंडाळून हळदी कुंकू लावावे. पुजेला सर्वात आधी अथर्वशीर्ष नंतर पाच आरत्या, त्यात एक आरती लक्ष्मीची म्हणायची. नंतर कोर्या वहीत कुंकवाच्या बोटानी स्वस्तिक काढून वहीचीपण पुजा करावी. दौत आणि वही सरस्वतीदेवीचे प्रतिक मानले जाते. लक्ष्मीची पूजा नेहमी गणपती, सरस्वती, महाकाली, कुबेर ह्यांच्या सोबत केली जाते. ताटात आपल्याकडे असेल ते धन लक्ष्मीपुढे ठेवावे. ह्यात Master card, ATM card हे ठेवले तरी हरकत नाही. जर लक्ष्मीची मुर्ती नसेल तर फोटो किंवा चांदीच्या नाण्यावर लक्ष्मीचे चित्र असले तरी चालते. राळ घालून धूप, कपूर हे सर्व असतेच. नंतर फ़राळाचा नैवेद्य दाखवावा आणि अष्टांग नमस्कार घातला की पुजा संपली. पुजा संपली की केर काढू नये. पुजा आटोपली की मग आपली पोटपुजा करावी. इथे खर तर काही वातावरण जाणवत नाही. आपणच सुरवात करायची. काल मी दिवे लावले बाहेर, माझे बघून एका दक्षिणात्य बाईनीही मग दिवे लावले. दिवाळीच्या दिवशी पैसे खर्च करू नये, कुणाचे देणे घेणे काही वस्तू विकत आणने हे सर्व आधीच उरकून घ्यावे असे शास्त्रात सांगितले आहे.
|
धन्यवाद बी खुपcअ उपयुक्त आणि आवश्यक माहिती अगदी वेळेत दिली. मी परदेशात असते पण ब - यcअशा गोष्टी माझ्याकडे आहेत. देवाcआ दिवा हा देवाकडे तोंड करून असवा.आणि शक्या झाल्यास पुजा करणा - याcएअ तोंड पुर्वेकडे असावे अशी माझी माहिती आहे. दिवाळीcया हार्दीक शुभेcछा!
|
hi me nikhil kapde,me indore hun ahe ,doing my masters from lamar univ texas,ya thu la me satyanarayan chi puja karnar ahe pan maze kade sagli puja vidhi ahe pan kahani marathi madhe nahi ahe jarka kona kade teche soft copy asel tar ti mala mail karal ka.ani jar ka pustak asel tar te scan karoon send kele tare chalel.my mail id is nikhil_kapde@yahoo.co.in
|
Shonoo
| |
| Wednesday, November 30, 2005 - 12:55 pm: |
|
|
चूल बोळकी इवली इवली हे फक्त गाण्यातच ऐकून माहिती आहे. बी, प्लीज बोळकी, गौरीहर आणि असेल तर सम्पुष्ट यांचा फोटो टाकता येइल का
|
Bee
| |
| Thursday, December 01, 2005 - 2:15 am: |
|
|
शोनू, माझ्याकडे फोटो नाही पण नेट वर शोधून पाहीन.
|
Madya
| |
| Thursday, December 01, 2005 - 6:31 am: |
|
|
दिव्यची वात आपल्याकडे हवी. देवाकडे असली तरी चालते....पण आपल्याकडे असणे अपेक्शीत आहे.
|
Jeetu9
| |
| Friday, July 07, 2006 - 8:43 pm: |
|
|
Hello, दीव्याचि वात ही दीशेवर अवलम्बून आहे. पूर्व :- शुभ दक्शीन :- वर्ज (म्रीत्यु दर्शवतो) (नरकचतुर्दशिल मात्र दक्शीनेला वात लावावि) पस्चीम :- वर्ज (रोग दर्शवतो) ऊत्तर :- लाभ , भरभराट ईशान्य(North-East) :- ऊत्तम पन आपन सगळ्या दीशेला जर दीवा लावला तरि चान्गले पन एकाच दीशेला लावाय्चे असल्यास पुर्व,ऊत्तर,ईशान्य दीशेल लाववा. दीवा हे एक पान्चोपचार पुजेतील माहत्वचि पुजा. दीव्याचि वात ज्या दीशेल त्या दीशेच्या देवेतेचे आपन एक प्रकारे आवाहन करत आसतो.
|
I m in Germany Frankfurt so here there is . Pls guide me if I will not get 'WALU' then shall I take regular Mahadev Pinda for pooja fro Hartalika?
|
Prajaktad
| |
| Monday, October 16, 2006 - 7:14 pm: |
|
|
'धनतेरस'ला काय करायचे असते?म्हणजे पुजा वैगेरे!
|
प्राजक्ता, खरे तर धनतेरस ल आपल्याकडे धनत्रयोदशि म्हणतात.. north side ल धनतेरस असतो.. आणि या दिवशी आपण भगवान धन्वन्तरि ची पुजा करतो.. कारण भगवान धन्वन्तरि हे आरोग्यचे दैवत अहेत.. doctor लोकान्कडे तर यान्चि विशेष पुजा होते
|
sorry for the late reply... कारण इकडे धनत्रयोदशी होउन गेलि आणि मी आता msg पाहुन reply देतो आहे..भगवान धन्वन्तरि यान्चा फोटो अथव मुर्ती चि पन्चोपचार पुजा केलि जाते.. धन्वन्तरि चा मन्त्र म्हणला जातो आणि त्याना आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासठी प्रार्र्थना केली जाते
|
Prajaktad
| |
| Friday, October 20, 2006 - 3:12 pm: |
|
|
मनकवडा, धन्स काल अजुन थोडा सर्च केला, मग धन,धान्य,पैसे याची पुजा केली आरोग्यासाठी प्राथ्रना केली.धनत्रयोदशीला सोने चांदी,स्टिलची भांडी घ्यावी असही कळल. चामडे,लोखंडी वस्तु घेवु नये. 'लक्ष्मीपुजनाचे'वर्णन वर बी ने केलेय तरी बाकीच्यानीही काही addition करावी.
|
वाह प्रजक्ता, झकास एकदम... का कोणास ठवुक पण असे सगले केले कि मन एकदम प्रसन्न होवुन जाते ना... नन्तर मे सगळे पुज विधि मन्त्रसहित देण्यचा प्रयत्न करेन.. अजुन मल नीट मराथि त लिहने जमत नहि आहे.. म्हणुन हलु हलु देइन.. क्रुपय समजुन घ्यावे... बकि दिवळि कशि ज़ालि सर्वन्चि... आजच सगळे posts check करतो आहे... आणि हो जमले तर रोज रामरक्षा म्हणवि, खूप powerful आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|