|
Sami
| |
| Saturday, September 25, 2004 - 9:14 pm: |
| 
|
सुमा, वरीला english मधे samo म्हणतात. वरीच्या तांदळाची खिचडी अशी करावी : १ वाटी वरी तांदूळ, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे दाण्याचे कूट (हवे असल्यास) १ बटाटा, (हवा असल्यास) जीरे, मीठ कोथिंबीर, खोबरे तूप. वरीचे तांदूळ चांगले धुवून घ्यावेत. बटाटा, मिरच्या चिरून घ्याव्यात. तूप आणि जिर्याची फोडणी करून त्यात मिरच्या आणि बटाटा घालावा. शिजला की तांदूळ घालावेत. आणि थोडे भाजावेत. २ वाट्या उकळलेले पाणी, दाण्याचे कूट, मीठ घालावे. आणि झाकण ठेवून शिजू द्यावे. झाल्यावर खोबरं कोथिंबीर घालून दाण्याच्या आमटी बरोबर serve करावे.
|
Akhi
| |
| Thursday, May 15, 2008 - 12:23 pm: |
| 
|
ज्याना दाणे मिरची सहन होत नाही. त्यानी भगरी मधे थोड आल किसुन घालाव वेगळी चव येते.
|
Bee
| |
| Thursday, May 15, 2008 - 2:37 pm: |
| 
|
माझ्या घरी उपवासाला भगराच्या वड्या करतात. आधी भगर शिजवून मग लगेच गरमगरम खोलगट ताटामधे काठापर्यंत एकसमान पसरवायच. त्यात वरतून शेंगदाण्याच्या कुट घालायचा, हिरवी मिरची घालायची. जरा वेळानी ते गार झाले की वड्या पाडायच्यात. मठ्ठ्यासोबत ह्या वड्या छान लागतात. काही जण ह्या वड्यांवर लाल तिखट भुरभुरतात. तेही छान लागते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|