|
Karadkar
| |
| Monday, December 19, 2005 - 7:31 pm: |
| 
|
कोकम सरबत असे instant होत नाही. ते जवळ्पास २ ते ३ दिवस कमीत कमी मुरावे लागते. कोकमे स्वच्छ धुवुन पुसुन कोरडी करायची. आणि ती हाताने फोडायची आणि बिया मात्र काढुन दुसर्या पातेल्यात ठेवायच्या. एक काचेची बरणी (प्लास्टीक अजिबात नकॊ) कोरडी पुसुन घ्यायची. तिच्या तळाला थोडे मीठ आणि साखर ह्याची लेयर बनवायची. त्यावर साधरण ३-४ कोकमाची साले घालायची आणि परत त्यावर एक लेयर साखर मीठ घालायचे. असे सगळ्या कोकमांचे करुन शेवतचा लेयर घालायच्या आधी बिया कुस्करुन रस काधुन तो घालायचा (फक्त रस बिया नाही). वरुन लेयर घालुन मग झाकण स्वच्छ पुसुन घट्ट लावायचे. झाकणाला एक कापड घट्ट बांधायचे. ही बाटली आता न हालवता २ दिवस ठेवायची. २ दिवसानी कोरड्या चमच्याने हे हलवायचे. रस सुटला असेल्तर तो काढुन सरबत करायला हरकत नाहि. हे करताना एक महत्वाची काळजी घ्याची म्हनजे कुठेहि पाण्याचा स्पर्श होता कामा नये. नाहितर केलेल्या सगळ्या प्रकाराला बुरशी येऊ शकेल. आणि त्या ज्या बिया होत्या त्या फेकुन नाही द्यायच्या. पाणी घालुन घालुन त्याचा पूर्ण रस काढुन मग फेकायच्या. त्या पाणी मिश्रीत रसाचे सरबत, सोलकढी, अमसुलाचे सार हे प्रकार करता येतात. कोकमाना अंगचा चीक खुप असतॊ. त्यामुळे मिक्सर वर वाटली तर मिस्कर ला चीक लागु शकतो आणी तो स्वच्छ करायला प्रचंड त्रास होतो. तरी तो प्रकार करु नये.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|