Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
फुन्दके

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » खमंग » फुन्दके « Previous Next »

Moodi
Wednesday, January 04, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुन्दके

मला वाटत की हा प्रकार खानदेशी आहे.

तुर डाळ, मुग डाळ, हरभरा डाळ अन उडीद डाळ अश्या सर्व डाळी साधारण अर्धा ते १ वाटी समप्रमाणात घेऊन सकाळी भिजत घालाव्यात.साधारण ५ ते ७ तास भिजवाव्यात.

संध्याकाळी मिक्सरमध्ये फार बारीक पेस्ट न करता किंचीत जाडसर वाटुन घ्याव्यात. यात हिरवी मिर्ची, आले लसुण याची एकत्र पेस्ट घालावी, चवीपुरते मीठ अन साखर घालावे. अन ढोकळ्यासारखे वाफवुन घ्यावे. वाफवुन झाले की उतरवुन त्यावर मोहरी, हिंग,हळदीची फोडणी घालुन अन बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन सजवावे. खुप छान लागते.


Chinnu
Wednesday, January 04, 2006 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, सही आहे कृती! धन्यवाद. आम्ही फ़ुणके म्हणायचो यांना

Anuli
Wednesday, January 04, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi, chan ahe recipe fakta ek shanka ahe. vatlelya daliche vade karayche ka? te nahi lakshat ale.

Moodi
Wednesday, January 04, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी ग अनुली हे सांगायचे राहिले. याचे वडे नाही करायचे हे डाळीचे वाटलेले मिश्रण तसेच भांड्यात ओतुन कुकरमध्ये वा ढोकळा stand मध्ये वाफवायचे.

आले,लसुण अन मिर्ची डाळींबरोबर वाटले तरी चालेल.


Arch
Wednesday, January 04, 2006 - 4:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! छानच आहे recipe , मूडी. पण नाव काय अस? असो. पौष्टिकपण आहे.

Moodi
Wednesday, January 04, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च,चिनु अन अनुली धन्यवाद. हा प्रकार खानदेशी लोकांचा.

माझ्या आईने हे कुकरमध्ये वाफावुन केले अन मग वड्या कापुन थोड्या फोडणीत त्या shallow fry केल्या, ढोकळ्यापेक्षा खमंग लागतात. खायच्या सोड्याची जरुर नाही वाटल्यास घालावा.

मात्र मी इकडे आधी हे एकदा ओव्हनमध्ये बेक करुन पहाणार आहे हांडव्यासारखे अन मग वरुन फोडणी वगैरे टाकणार.


Suniti_in
Sunday, January 15, 2006 - 2:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खानदेशात याला फुणकेच म्हणतात मुडी. मी सुध्दा ही रेसेपी टाकणार होते बघ मुडी. बर झाल तु लिहीली. यात थोडी माझ्या गावी कशी करतात त्याची भर घालते.
ग़ावाकडे सर्वात जास्त चवळीची डाळ टाकतात. २ वाटी चवळी डाळ्(मला इकडे मिळत नाही तर मी चवळी टाकते. जास्त भीजू दिली की साल निघून येते), १ १/२ तूर डाळ, १/२ वाटी चणाडाळ. १/२ वाटी मूग डाळ. उडीद डाळ नाही टाकत. या डाळी भिजवून त्यांना पाणी न घालता जरा जाडसर वाटतात. यात आल्-लसून, जीरे वाटून लाल तिख़ट मिक्स करावे. करायच्या आधी बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पीठात एकत्र करावी. किंचीत सोडा घालावा.
हातात बसतील एवढे पीठ घेऊन त्याचे मोठे लांबट मुटकुळे वळावे. पातेल्यात भरपूर पाणी घालून चांगले खळखळ उकळले की चाळणीला तेलाचा हात लावून एक एक मुटकुला चिकटणार नाही असा ठेवावा. वरून झाकण ठेऊन वाफेवर होऊ द्यावे.
मुडी तु सांगितल्याप्रमाणे कुकर मधेही होतील. मी पाहीले नाही पण करून अजून. ट्राय करेल पण.
या फुणक्यांसोबत खायला गव्हाच्या पीठाचे कान्होले आणि कढी करतात. त्याची रेसेपी उद्या टाकते.


Suniti_in
Sunday, January 15, 2006 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुणके सोबत करायचे कान्होले-
पोळ्यांच्या कणकेप्रमाणे १ चमचा तेल घालून मीठ घालून पीठ थोडे घट्ट भिजावे. पिठाचे गोळे तेल लावून पापडाप्रमाणे जमतील तेवढेच पातळ लाटावे. लाटून झाल्यावर वरून तेल लावून अर्धी घडी घालावी. पुन्हा तेल लावून चतकोर घडी घालावी.
असे २-३ लाटून तेलाचा हात लावून हे कान्होले गरम फुणक्यांवर ठेवावे. वाफेवर होऊ द्यावेत. नंतर उलटून परत थोडा वेळ होऊ द्यावेत.
फुणके झाले की नाही बघण्यासाठी सुरीने टोचून बघावे मोकळी बाहेर आली म्हणजे झाले असे समजावे. हे झालेले फुणके आणि कान्होले काढून उरलेल्या पीठाचे फुणके करावे. ग़रमा गरम कढी बरोबर कान्होल्यांसोबत खावे.


Prajaktad
Tuesday, January 27, 2004 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dudhi bhopala che funke
1 chota dudhi bhopala
1 vati kanik
pav vati /jwari/bhajani pith(optional)
2 mothe chamache daliche pith
1/2 vati kothimber
tikhat,mith,dhane jire pud,halad
2 chamche padhare til
tel mohan aani fodanisathi
dudhi sal kadhun kisawa ghatt pilun pani bajula kadhun thevave
yat varil pithe masale aani kothimber ghalun 2 chamche tel garam karun takave
pith malun kothimber vadyana karto tyapramane valkati karavi pith bhijatana lagale tar dudiche kadhalele panich vaprave.
kukar madhe vafvave
thand zalya var kapun jast telachya fodanit partave
kiwa telat kharpus talawe
kutalihi chatani, sos barobar chan lagte




Nandita
Friday, March 30, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुधि भोपळाअ चे फ़ुनके
१ छोटा दुधि भोपळा
१ वाटि कणिक
पाव वाटि ज्वारि किंवा भाजणी पिठ(ऑप्शनल)
२ मोठे चमचे डालिचे पिट्थ
१२ वाटी कोथिंबिर तिखट,मिठ,धने जिरे पुड,हलद २ चम्चे पांढरे तिल
तेल मोहन आणी फ़ोडणीसाठी
दुधि साल कधुन किसाव घट्ट पिळुन पाणी बाजुल काढुन्ट्थेववे
यत वरिल पिठे मसाले आणि कोथिम्बेर घालुन २ चमचे तेल गरम करुन ताकवे
पिठ मलुन कोथिम्बेर वड्यांना कर्तो त्याप्रमाने वळकटी करावि पिठ भिजताना लागले तर दुधिचे काधलेले पाणीच वापरावे.
कुकर मधे वाफ़वावे
थंड झाल्या वर कापुन जास्त तेलाच्य फ़ोडणीत परतावे
किंवा तेलात खरपुस तळावे
कुठ्लिहि चटणी, सॉस बरोबर छान लागते



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators