|
Moodi
| |
| Monday, January 02, 2006 - 9:04 pm: |
|
|
दाल फ्राय. १ वाटी तुर डाळ, २ टॉमेटो, ३ ते ४ हिरव्या मिर्च्या, ४ ते ५ सुक्या लाल मिर्च्या, १ इंच आले, ५ ते ६ लसुण पाकळ्या, २ कांदे, कोथिंबीर, कढिपत्ता, २ चमचे लोणी / बटर, १ कांद्याची पात. कृती : प्रथम डाळ कुकरमध्ये शिजवुन घ्या. टॉमेटो आले, लसुण बारीक चिरा. एका पातेल्यात नेहेमीप्रमाणे मोहरी, जीरे, कढिपत्त्याची फोडणी करुन घ्या. त्यात बारीक चिरलेले आले,लसुण अन हिरवी मिर्ची टाका. नंतर सुक्या मिर्च्या टाका. व चिरलेला कांदा घालुन परता, नंतर टॉमेटो टाकुन मंद आंचेवर झाकण ठेवुन शिजवा. २ मिनिटानी शिजवुन घोटलेली डाळ, चिरलेली कोथिंबीर व मीठ घाला. अगदी थोडे पाणी घाला. चवीपुरती साखर वा गुळ घाला. सर्व्ह करताना वरुन बटर घालुन अन कांद्याची पात त्याच्या कांद्यासकट बारीक चिरुन घाला.
|
Dhabyavar milate tashi daal fry kashi karayachi? var dilyapramanech ka kahi vegali recipe aahe?
|
Iop123
| |
| Wednesday, January 25, 2006 - 5:26 pm: |
|
|
If you add some kasuri methi after the tomatoes are done, the dal tastes very good.
|
Savani
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:32 pm: |
|
|
मी दाल फ़्राय मुगाची डाळ वापरुन करते. तेलात जीरे, मोहरी टाकायची. नन्तर त्यात हिन्ग घालायचे. मग कढीलिम्ब टाकायचे आणि मग ५-६ लसुण पाकळ्या घालायच्या. चान्गला लाल झाला पाहिजे. लाल मिरच्या टाकायच्या. आणि मग मुगाची भिजवलेली डाळ घालायची. पाणी घालुन शिजत ठेवायची. नन्तर वरुन कोथिम्बिर घालयची.
|
Savani
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:44 pm: |
|
|
टोम्याटो राहीलाच सान्गयचा. डाळ घालायच्या आधी बारीक चिरलेला टोम्यटो टाकायचा.
|
Savani
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:44 pm: |
|
|
e mala pls konitari tomato kase lihayche sanga re.
|
Moodi
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:54 pm: |
|
|
अग अस लिही TOmeTo टॉमेटो.
|
Psg
| |
| Friday, August 25, 2006 - 7:41 am: |
|
|
मूडी, तुझ्या पध्दतीने केला दाल फ़्राय.. एकदम मस्त! पण कांदापात वगळली आणि बरोबर टॉमेटो राईसच होता, म्हणून तोही घातला नाही दाल मधे. झकास झाला होता.. गरम गरम मस्त लागतो! धन्स गं!
|
Moodi
| |
| Friday, August 25, 2006 - 8:14 am: |
|
|
करुन पाहिल्याबद्दल तुझेच धन्यवाद पूनम. कांद्याची पात मस्त लागते, पण बाहेर डब्यात वगैरे नेतांना नंतर वास येतो. बरे झाले नाही घातलीस ती.
|
Bee
| |
| Friday, August 25, 2006 - 10:33 am: |
|
|
चांगले जाडजुड पाच टॉमेटो आणि त्याला फ़क्त अर्धावाटीभर डाळ घेऊन केलेली पातळ दाळ चवीला एकदम छान लागते. अशी डाळ गरम गरम प्यायली की लगेच हुषारी आल्यासारखी वाटते. microwave oven मध्ये छान कडकडीत गरम पण केली जाऊ शकते. ह्या डाळीत लाल तिखटच घालायचे आणि भरपूर मोहरी घालायची. थोडी साखर घालायची. मी असेच करतो त्याशिवाय टॉमेटो संपत नाही माझे. आणि इथे टॉमेटॉ काय कुठेही चांगला मिळतो. तेंव्हा जे मिळत त्याचा उपयोग चांगला करावा. मला ह्यात कोथिंबीर आवडत नाही. त्यामुळे ते वरण न वाटता सार किंवा सुप वाटते. माझी वहीनी उकळलेली मटकी मिक्सरमध्ये फ़िरवून ती टॉमेटोमध्ये घालते तसेही छान लागते. मग भरपूर जिरेपूड घालायची.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|