Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कडमडे पोहे

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पोह्याचे प्रकार » कडमडे पोहे « Previous Next »

Dineshvs
Monday, December 26, 2005 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडमडे पोहे.

खुपदा आपल्याकडे पातळ पोहे असतात. त्याचे कांदेपोहे करता येत नाहीत, कराण ते भिजवले कि त्यांचा चुरा येतो अश्या पोह्यांचा एक प्रकार.
तुपाची किंवा तेलाची हिंग मोहरी घालुन फ़ोडणी करावी. त्यावर हळद, पोह्याच्या अदमासाने तिखट व मीठ घालुन कोरडे पोहे टाकावेत. अधुन मधुन परतत ते लाल व कुरकुरीत करुन घ्यावेत. मंद आचेवर झाकण न ठेवता परतावेत. बेसनाप्रमाणे सतत ढवळत रहावे लागत नाही.

हे ऊतरुन जरा निवु द्यावेत. त्यावर वर्तमानपत्र झाकुन ठेवावे, म्हणजे कुरकुरीत राहतात. खायला घेताना, त्यात बारिक कापलेला कांदा, हिरवी मिरची, ओले खोबरे व लिंबाचा रस घालुन खावेत. हवी तर थोडी साखर घालावी.

पोहे आधी भाजुन ठेवता येतात. हवाबंद डब्यात ठेवावेत.



Anuli
Monday, December 26, 2005 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dinesh ekdam chan recipe dilit. amchya shalet ek bai ase madhlya suttit vikayla anaychya. 1 rupayala eka chotya kagdavar muthbhar dyaychya. kai masta lagayche te pohe. kiti divas mi athavt hote kase kartat te. dhanyavad agdi.

Bhagya
Monday, December 26, 2005 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! पोहे, मुरमुरे, डाळे/फ़ुटाणे आणि दाणे. हे पदार्थ हलके आणि पौष्टिक.
छानच रेसिपी दिलीस दिनेशदा. असे अजून पदार्थ माहिती असतिल आणि इथे कुठल्या बी बी वर नसतील तर द्या.


Prajaktad
Tuesday, December 27, 2005 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेल्-मिठ पोहे

पातळ पोह्यावर थोडे पाणि शिंपडुन सारखे करावे.त्यावर मिठ,थोडे तिखट,आणि कच्चेच तेल घालुन मिसळावे.थोडा कांदा कापुन आणि दाणे घालावे.बरोबर असेल तर कैरिच फ़ोड घ्यावी.
फ़ोडणि वैगेरे काहि नाहि...झक्क पदार्थ मिनिटात होतो.


Kitkat
Sunday, February 26, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे मेतकुट लावतात पातळ पोह्यांना. त्याला आम्ही लावलेले पोहे म्हणतो. आमच्या बेळ्गावच्या बाजूकडे असे पोहे संध्याकाळी चहाला करतात.
पातळ पोहे एका ताटात घ्यावे. त्यावर मेतकूट, मीठ, भरपूर ओले खोबरे आणी चिरलेली कोथंबीर घालावी.
तुपात राई, हिंग, हिरवी मिरची आणी कढीलिंबाची पाने टाकुन फोडणी करावी. ही फोडणी पोह्यावर ओतावी आणी किंचीत दुधाचा हात लावत पोहे हाताने चुरून कालवावे. पोहे मऊ करू नये कालवले की लगेच खायला घ्यावे.

करून पाहा खूप टेस्टी आणी करायला पण सोपे आहेत.

Mepunekar
Sunday, February 26, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mazi aai khalil prakare pohe karaychi. tyala amhi masale pohe mhanaycho.Agdi zatpat hotat. v fodni vagaire pan karayla lagat nahi.
Patal pohe gheun tyavar thode kacche tel, tikhat, mith, dane, goda masala ghalun sarv mix karave. Atishay chavisht lagtat. Tyat kanda lasun masala aslyas thoda ghalava , ajun chan chav yeil. Zatpat ani swadisht...

Preetikole
Wednesday, May 16, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्चा चिवडा............

करायला सोपा आणि चवदार...........

पातळ पोहे छान भाजुन घ्यावेत मग त्यात लसुण जिरयचि पेस्ट, तिख़ट, मिट, साख़र आणि तेल घालुन मिक्स करावे. वर्तुन कांदा चिरुन टाकवा. आवडत असल्यास दाणे आणि डाळवं घालावे. ख़ुप छान लागतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators