|
Moodi
| |
| Wednesday, December 07, 2005 - 8:29 pm: |
| 
|
चवळीच्या देठाचे सुप चवळीच्या भाजीची देठे 10-12 , एक टॉमेटो, पाव चमचा मिरी पावडर, २ पाकळी लसुण, थोडे जीरे, १ चमचा तुप, 4-5 कप पाणी कृती : चवळीची भाजी निवडताना बाजुला काढलेली देठे धुवुन घ्या अन थोडी ठेचा. अन मग ही देठे चिरलेला टॉमेटो अन पाणी घालुन उकळत ठेवा. त्यात मीठ, मिरी पावडर घाला. ५ कप पाण्याचे आटुन ३ कप पाणी झाले की हे पाणी मोठ्या गाळणीने गाळुन घ्या. त्यात चांगल्या तुपाची जीरे, हिंग अन लसुण घातलेली फोडणी ओता अन गरम गरम सुप प्यायला द्या. पाहिजे तर दाटपणासाठी थोडी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घाला. आवडेल त्या भाजीचे म्हणजे पालक वगैरेचे पण सुप असे करुन बघा.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 10, 2005 - 3:38 pm: |
| 
|
माझे हे अगदी आवडीचे सुप. मी शिजवण्यापुर्वी देठे सोलुन चिरुन घेतो. आणि मग ब्लेंड करुन घेतो, त्यामुळे रफ़ेज सगळे मिळते. तसेच शिजवताना त्यात थोडे तांदुळ घालतो.
|
Maku
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:16 am: |
| 
|
दिनेश कसे करता तुम्ही ते सुप मला ज़रा सांगता का ? please
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|