|
Veenah
| |
| Thursday, December 08, 2005 - 8:25 am: |
|
|
२ वाट्या तान्दूळ धुऊन दीड वाटी ताकात दुपारी भिजत घालावे. त्यात १/२ चमचा मेथीही भिजताना घालावी. १ वाटी पोहे धुऊन थोडा वेळ भिजवावे. सन्ध्याकाळी भिजलेले तान्दूळ, पोहे, १/२ वाटी ओले खोबरे, १/४ टिस्पून हळद्पूड व १ वाटी गूळ एकत्र बारीक वाटावे. इडलीच्या पीठाप्रमाणे दाटसर consistency ठेवावी. मिश्रण झाकून रात्रभर fermentation साठी ठेवावे. सकाळी Non-Stick Pan वर एक चमचा तेल टाकून ह्या पीठाची तळहाता एवढ्या आकाराची जाडसर धिरडी घालावी. एकावेळी दोन तीन घालता येतात.मन्द विस्तवावर झाकून शिजवावी. एकाच बाजूने भाजवी. आन्च मन्द नसली तर गुळामुळे लगेच करपून काळी होतात. सोनेरी रन्गावरच भाजावी. घरगूती लोणी व लसणीच्या कोरड्या चटणी बरोबर छान लागतात.सकाळच्या न्याहारीला करण्यासारखा प्रकार आहे.
|
Moodi
| |
| Thursday, December 08, 2005 - 8:59 am: |
|
|
वीणा फारच मस्त रेसेपी दिलीस ग. पण गुळ घातला नाही तर चालेल ना? की चवीत फरक पडेल? अन आवडीनुसार हिरवी मिर्ची अन कोथिंबीर घालता येइल ना?
|
मूडी, तु अगदी माझ्या मनातलेच प्रश्न विचारलेस ग !
|
Veenah
| |
| Thursday, December 08, 2005 - 11:03 am: |
|
|
Moodi, Sharmeela, गूळ न घालता पण करता येतात. तेव्हा वाटताना आले व ओली मिर्ची घालावी. हळद पण घालू नये. दूसर्या दिवशी करताना जास्तशी कोथम्बीर चिरून घालावी. तेव्हा ओल्या खोबर्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|