|
Karadkar
| |
| Monday, November 14, 2005 - 5:04 am: |
|
|
भाग्या, धपाटे आणि थालीपिठे जवळपास सारखीच. धपाट्याचे पिठ दळुन आणताना त्यात धणे घालतातc. त्याने खमंग होतात धपाटे. ज्वारीचे पिठ, थोडे तांदुळाचे पिठ, थोडे बेसन, हिरवी मिरcई वाटुन, भरपुर कोथींबिर, किंचित गुळाचा खडा, मिठ घालुन हे पिठ भिजवतात. त्याची जाड थालपिठे करतात. भरपुर तेल घालुन लोखंडाच्या तव्यावर खरपुस भाजायचे. हे झाले कच्या पिठाचे धपाटे. हवे तर थोडी धणे पावडर घाल हवी तर.
|
Lajo
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:14 am: |
|
|
हे घे बी तुझ्यासाठी स्पेशल झटपट धपाटे!! कणिक आणि हवे असल्यास थोडे बेसन, चिरलेला कांदा, भरड कुटलेले थोडे धणे आणि आवडत असेल तर जीरे, लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची, थोडी हळद, चवीला मीठ आणि बारीक चिरलेली भरपुर कोथिंबीर, लहान चमचाभर तेल. पद्धत १: सगळे साहित्य एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालुन भाजणीच्या थलिपीठा सारखे मळायचे. प्लस्टिकवर थालिपीठासारखे थापायचे. मधे एक भोक पाडुन तव्यावर तेलात वा तुपात दोन्ही बाजुनी खरपुस भजायचे. लसणीच्या चटणी आणि लोण्याबरोबर भरपुर चापायचे. (ही पद्धत बरीचशी भजणीच्या थलिपीठासारखीच आहे. दर वेळेला भाजणी घरात असतेच असे नाही आणि आम्हाला परदेशात तर इम्पोर्टच करावी लागते अश्या वेळेला हे धपाटे चांगले लागतात!) पद्धत २: वरचे सगळे साहित्य एकत्र पराठ्याच्या पीठासरखे घट्ट मळायचे. आणि पोळपाटावर थोडे जाडसर लाटायचे. तेलात वा तुपात खरपुस भाजायचे. मिरचीच लोणच आणि दह्याबरोबर मटकवायचे. टीप्: धणे आणि जीरे यांच्या ऐवजी ओवा खरडुन टाकला तर छान चव येते. कोथिंबीरी ऐवजी मेथी सुद्धा छान लागते.
|
Lajo
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:11 pm: |
|
|
अजुन एक टीप काल लिहायला विसरले. कोथिंबीर आणि कांद्याच्या ऐवजी ताजा पातीचा कांदा पण छान लागतो.
|
Moodi
| |
| Friday, September 22, 2006 - 11:24 am: |
|
|
कृती झक्कासच आहे हं लाजो. पुढच्या आठवड्यात नक्की करुन बघणार आणि मग सांगणार.
|
Shilpapm
| |
| Friday, September 29, 2006 - 7:34 pm: |
|
|
धपाटे करताना भोपळा किँवा काकडी किसून घातली तरी छान लागते... आणि याच पीठाच्या तिख़ट पुर्या पण मस्त लागतात...
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|