|
Dineshvs
| |
| Tuesday, November 22, 2005 - 5:15 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हा बिर्यानीचा एक पाकिस्तानी प्रकार आहे. याला म्हणतात कच्चे गोश्त कि बिर्यानी. अर्धा किलो मटण स्वच्छ धुवुन त्याला दहि चोळुन चार तास तसेच ठेवुन द्यावे. मग त्याला दोन मोठे चमचे वाटलेली कच्ची पपई, दोन चमचे वाटलेले आले, मीठ आणि दोन चमचे बेसन लावुन परत तासभर मुरत ठेवावे. कच्ची पपई नसल्यास मिट टेन्डरायझर मिळते ते वापरावे. एक वाटी दहि घुसळुन घ्यावे. दोन कांदे सोनेरी तळुन चुरडुन घ्यावेत. चार सहा हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर कापुन घ्यावी. हे सगळे मटणाला चोळुन घ्यावे. त्यात केवडा ईसेन्स, दोन लिंबाचा रस व थोडे केशर घालावे. व बाजुला ठेवावे. अर्धा किलो तांदुळ धुवुन भिजत ठेवावा. एक ईंच दालचिनीचा तुकडा, दोन लवंगा, एक मोठी काळी वेलची, दोन तीन हिरव्या वेलच्या, एक चमचा शहाजिरे, चारपाच मिरीदाणे या सगळ्यांची बारिक वाटुन त्याची पुड करावी. त्यापुर्वी हे सगळे जरा गरम करुन घ्यावे. यातली अर्धी पुड मटणाला लावावी. तुपाची फ़ोडणी करुन त्यात एक तामालपत्र घालावे. मग त्यात पाऊण लिटर पाणी घालावे. त्यात वरील मसाल्याची पुड घालावी. पाण्याचा रंग बदलेपर्यंत ऊकळावे. मसाल्याचे तुकडे तरंगत असतील ते काढुन घ्यावेत. त्यात तांदुळ घालावे. मीठ घालुन अर्धे कच्चे शिजवुन घ्यावेत. पाणी निथळुन घ्यावे. त्याला थोडे तुप लावुन मिसळुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पसरट भांड्याला तळाला थोडे तुप लावावे. त्यावर मुरवलेले मटण घालावे. मग त्यावर तांडुळ पसरावेत. पाऊण कप दुधात थोडे केशर मिसळुन घ्यावे. तांदळाचे थर देताना अधुन मधुन ते शिंपडावे. या भांड्याला घट्ट बसेल असे झाकण लावावे. त्याच्या कडेला मऊसर कणीक भिजवुन सील करावे. या भिजवलेल्या कणकेपैकी थोडी बाजुला ठेवावी. पाच मिनिटे भांडे आचेवर ठेवावे. मग मंद आचेवर जाड तवा ठेवुन त्यावर हे भांडे ठेवावे. अर्धा तास ठेवावे लागेल. या दरम्यान लावलेल्या पीठाला छिद्रे पाडुन वाफ़ बाहेर येऊ लागेल. तिथे बाजुला ठेवलेल्या पीठाचे गोळे लावत रहावे. जेंव्हा या छिद्रातुन जोरात वाफ़ बाहेर येऊ लागेल व सुंदर वास सुटेल, त्यावेळी आच बंद करावी. अगदी आयत्यावेळी झाकण काढावे. मुळ कृतीत लाल तिखट नाही. हवे तर मटणात घालावे. चिकन पण वापरता येईल. त्याला कमी वेळ लागेल. सोबत पुदिना, आले, कांदा व मिरची घातलेले दहि घ्यावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|