|
Karadkar
| |
| Monday, November 21, 2005 - 7:14 am: |
| 
|
आमच्याकडे दहीबुत्ती अशी करतात शिळा भात, आंबट दही, १ - २ काळी मिरी दाणे, लसुण पाकळ्या, मिठ, थोडे लागले तर दुध. शिळाभात कुस्करुन त्यात मिठ आणि दही घालायचे. मिरी आणि लसुण एकत्र वाटुन घेउन ते पण त्यात मिसळायचे. हा भात तसच १५ मिनिटे तरी ठेवुन द्यायचा. जास्ती वेळ ठेवायला हरकत नाही. खाताना जर खुप कोरडा वाटला आणि खुप अंबट वाटला तर त्यात दुध घालायचे. आणि अंबट नसेल तर ताक किंवा दही घालायचे. मला हा भात जाम आवडतो.
|
Moodi
| |
| Wednesday, January 04, 2006 - 10:53 am: |
| 
|
दहीभाताचा दुसरा प्रकार. सकाळचा वा आदल्या रात्रीचा भात नीट मोकळा करुन घ्यावा. त्यात दही, चवीपुरते मीठ अन साखर तसेच चिरलेली कोथिंबीर अन चिरलेल्या हिरव्या मिर्च्या असे नीट मिक्स करावे. मग वरुन याला तेलातली जीरे,हिंग, हळद अन सुक्या लाल मिर्च्यांची फोडणी द्यावी. खमंग लागतो. मात्र मिर्च्यांचे प्रमाण आवडी अन तब्येतीनुसार कमी जास्त करावे.
|
Prady
| |
| Thursday, February 23, 2006 - 2:37 pm: |
| 
|
Dahi bhat kalwoon tyaat jar mirachi ( walwaan karato ti masala bharleli mirachi) talun ani churun ghatali tar te pan chhan lagata. Awadi pramane mirchyanche praman kami jasta karawe. kahi jan dahi bhat kalwoon tyaat kothimbir,kakadi, kandaa, tomato barik chirun ghaltaat ani mag waroon telatli jira, hinga, kadhi patta, thodi udid dal ani mirchya ashi fodani ghaltaat. Thoda wegala prakar.
|
दही भाताचा अजुन एक प्रकार, हा भात मला आणि माझ्या घरच्यांना खुप आवडतो. माझा नवर्याला रोज काहिही न करता जर नुसता दिला तरी तो आवडिने खाइल. कुकर मधे तांदुळ, डाळ, थोडस तुप, हिंग, हळद घालून नेहमीप्रमणे वाफ़वून घ्यावा. कुकर थंड झाल्यावर एका पातेल्यात फोडणी पुरता तुप घालुन ते गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, जिर, कडिपत्ता, आणि ओली मिरची ची फोडणी द्यावि. तडतडू लागल्यावर त्यात शिजवलेला भात परतून लगेचच लागेल तेवढे दही घालवे. वरुन छान कोथिंबीर टाकावी.गरम गरम असतानाच ह भात खावा
|
Miseeka
| |
| Friday, August 04, 2006 - 4:52 pm: |
| 
|
गरम भातावर दहि घालुन खावु नये असे म्हणतात.
|
>>>गरम भातावर दहि घालुन खावु नये असे म्हणतात.<<<< नाही माहित ह्याबद्दल पण बकी कही त्रास होत नाही हे नक्की.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|