|
Dineshvs
| |
| Monday, November 21, 2005 - 4:10 pm: |
|
|
बोटव्या, मालत्या, नखोते आणि गव्हले आणखी एक प्रकार असतो, हा आपला पास्ता कि पास्ता म्हणजे त्यांच्या मालत्या) करायला फ़ार कठिण नाही. पण खीर छानच लागते यांची
|
Priya
| |
| Monday, November 21, 2005 - 4:17 pm: |
|
|
पुर्वी जेव्हा लग्नात पाच खिरी असत तेव्हा हे सगळे प्रकार लागायचे. मला वाटतं मालत्यांनी वरमाईची ओटी भरत असत ना?
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 22, 2005 - 5:32 pm: |
|
|
प्रिया आपल्याकडे हे प्रकार फ़ार पुर्वीपासुन शुभ शकुनाचे म्हणुन केले जातात. गव्हल्यांचा साखरभात पण खुप छान लागतो. गोव्यात रताळ्याचे भरपुर पिक येते. हे लोक त्याच्या शेवया करतात. फ़ार सोपा प्रकार आहे हा. रताळी ऊकडुन कुस्करुन त्याची शेव घालायची. वाळवायची. मग हि तळुन त्यावर पिठीसाखर घालुन खायची. एक वेगळा प्रकार म्हणुन छान लागतो. मी खीर पण करुन बघितली त्याची. चांगली झाली.
|
Tanya
| |
| Wednesday, November 23, 2005 - 4:00 pm: |
|
|
नलिनी... अग आता मालत्यांची आठवण, लग्नात मुलाच्या आईचे तोंड धुणे विधी असताना हाती लावण्या पुरती(ओटी भरताना) उरली आहे, ती पण चांदीच्य/सोन्याच्या मालत्यानी ओटी भरुन.
|
Prajaktad
| |
| Friday, December 02, 2005 - 3:08 pm: |
|
|
डांगर म्हणजे काय?
|
Nalini
| |
| Friday, December 02, 2005 - 3:45 pm: |
|
|
प्राजक्ता, डांगर म्हणजे काशीफळ / लाल भोपळा / Pumpkin .
|
Priya
| |
| Friday, December 02, 2005 - 6:56 pm: |
|
|
प्राजक्ता, नलिनी - दिनेश जे डांगर म्हणत आहेत ते थोडक्यात म्हणजे पापडाचे भिजवलेले पीठ, ज्याच्या लाट्या करुन पापड लाटले जातात ते. अर्थात, हे नुसते खायलाही छान लागते. उडदाचे डांगर खाताना दातांना चिकटते, पण पोह्याचे मात्र नाही. त्यात कच्चे तेल घालून छान लागते. दिनेश, तुम्ही याच डांगराबद्दल म्हणत होतात ना?
|
Prajaktad
| |
| Friday, December 02, 2005 - 8:12 pm: |
|
|
नलिनि मि दिनेशने पोह्याच्या पापड पोश्ट मधे जे दहि घालुन किंवा तेल घालुन डांगर करता येते ते विचारत होते. बहुदा तेच प्रिया ने explain केले आहे.
|
Moodi
| |
| Saturday, December 03, 2005 - 3:04 pm: |
|
|
आमच्या इथे डांगर म्हणजे दह्यात मीठ अन किंचीत साखर टाकुन कालवलेले मेतकुट. मेतकुट आपण ताज्या गरम भातावर तुप टाकुन घेतो ना तेच मेतकुट. हे चटणीसारखे पानात डावीकडे वाढतात.
|
Madhavm
| |
| Monday, December 19, 2005 - 10:21 am: |
|
|
उडदाचे तोंडी लावायचे डांगर दोन प्रकारचे असते. कच्चे आणि भाजलेले. भाजलेले डांगर थोडेफार मेतकुटासारकेच लागते. कच्च्या डांगर म्हणजे उडदाच्या पापडाचे पीठ फक्त पापडखार न घालता. हे पीठ, दह्यात कालवायचे त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिम्बीर आणि हिरवी मिरची घालायची. इतके मस्त लागते की मी डाव्या बाजुऐवजी उजव्या बाजुलाच भाजीऐवजी घ्यायचो.
|
Manuswini
| |
| Sunday, October 15, 2006 - 7:35 pm: |
|
|
गव्हल्याची खीर हा अतिशय सुंदर प्रकार आहे. ती करण्यात पण एक कौश्यल लागते मिळून यायला. आए नेहमी अतिशाय खास पुजेला करायची. इथे गव्हले मिळत नाहीत. very bad.......
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|