|
Gautami
| |
| Friday, October 14, 2005 - 12:29 pm: |
|
|
malaa kÜNaI saaMjyaacyaa pÜL\yaaMcaI receipe dovaU Xakola kaÆ
|
Ksmita
| |
| Friday, August 03, 2007 - 11:12 pm: |
|
|
सांज्याच्या किंवा शिर्याच्या पोळ्या सांजा करून घ्यायचा रव्याचा गुळ घालून , त्यात स्वादासाठी वेलची पावडर व जायफ़ळ घालायचे थंड झाल्यावर पोळ्या करायच्या कणिक थोडी सैल भिजवायची कणकिच्या उंड्यापेक्षा मोठा सांज्याचा वा शिर्याचा उंडा घेऊन पुरणपोळीसारखी पोळी करायची व तुपावर खमंग भाजायची same process with शिरा
|
Ksmita
| |
| Friday, August 03, 2007 - 11:20 pm: |
|
|
sorry मी नीट प्रमाणे वा माप देऊन नाही लिहु शकले पण आधी छोट्या वाटीच्या मापाचा रवा घेऊन सांजा करून बघ आणि पोळी जमते का ते बघ पुरणपोळी वा आलु पराठा केला असशील तर सोपी आहे सांजाची पोळी
|
Dineshvs
| |
| Saturday, August 04, 2007 - 4:21 am: |
|
|
थोडी डिटेलमधे लोहितो. दोन वाट्या बारिक रवा, तुपावर खमंग भाजुन घ्यावा. मग दोन ते तीन वाट्या गुळ बारिक चिरुन घ्यावा. साध्या शिर्यापेक्षा गुळ जास्त लागतो, कारण वरच्या कव्हरचा पण विचार करायचा आहे. गुळाएवढेच पाणी उकळत ठेवावे. त्यात अर्धा चमचा तुप घालावे व गुळ घालावा. गुळ पुरता विरघळुन उकळी फुटली कि त्यात रवा घालावा. वेलची पुड घालावी. झाकण ठेवुन वाफ़ येऊ द्यावी. पाणी जिरले कि तो थंड करत ठेवावा. यावेळी झाकण ठेवु नये. रवा जितका घेतला तितकीच कणीक घ्यावी. ती तेलाचे मोहन घालुन पुरीला भिजवतो त्यापेक्षा सैल पण चपातीपेक्षा घट्ट भिजवावी. चांगली मळुन घ्यावी. केलेला सांजा जरा मळुन त्याचे गोळे करावे.मग कणकेचे तेवढेच गोळे करुन त्याचा उंडा करावा. व हलक्या हाताने लाटावा. पुरणपोळीपेक्षा हा प्रकार करायला सोपा आहे. पण भाजायला वेळ लागतो. उत्तम पोळी फ़ुगली पाहिजे. त्यासाठी तव्यावर थोडे तेल वा तुप सोडुन मंद आचेवर भाजावी. यात खवा, पिकलेले केळे, उकडलेले रताळे घालुन स्वाद वाढवता येतो. हे सगळे रव्यातच घालायचे.
|
Mepunekar
| |
| Saturday, August 04, 2007 - 4:53 am: |
|
|
स्मिता thanks अग एवढ्या तत्पर्तेने माझ्यासाथी लिहिलेस आणी sorry म्हणून मला लाजवु नकोस. दिनेशदा, आता निर्धास्तपणे तुम्ही दिलेल्या प्रमाणानुसार करेन, खुप धन्यवाद. मला एक विचारायचय कि शिरा गुळ घालुनच करायला पाहिजे का? नेहेमीप्रमणे साखरेचा नाही चालत का? गुळामुळे खमंगपणा येइल, अजुन काही कारण आहे का?
|
Dineshvs
| |
| Saturday, August 04, 2007 - 12:41 pm: |
|
|
साखर घातली तरी चालेल. त्यावेळी एक चिमुटभर मीठ टाकायचे. साखरेच्या पोळ्या शुभ्र होतात. या पोळ्या आधी करुन ठेवता येतात. त्या दोनतीन दिवस सहज टिकतात. परत गरम करायची गरज नसते.
|
दिनेश, काल मी सांज्याच्या पोळ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे केल्या आणी खुपच छान झाल्या. धन्यवाद!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|