|
Dineshvs
| |
| Wednesday, July 13, 2005 - 2:51 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अर्धा किलो मटण घेतलं तर त्याला दहा बारा लसुण पाकळ्या, दोन तीन ईंच आले, व अर्धी वाटी कोथिंबीर हे बारीक वाटुन चोळुन ठेवावे. दोन छोटे चमचे प्रत्येकी खसखस व तीळ गुलाबी रंगावर कोरडेच भाजुन घ्यावेत.मग आठ दहा मिरीदाणे, दोन ईंच दालचिनी व दोन मसाला वेलचीचे फ़क्त दाणे भाजुन घ्यावे. अर्धी वाटी सुके खोबरे तपकिरी रंगावर भाजुन घ्यावे. मग थोडे तेल तापवुन त्यात तीन चार लवंगा तळून काढुन घ्याव्यात (अश्या तळून घेतलेल्या लवंगा जास्त खमंग लागतात, नुसत्याच भाजलेल्या कडवट होतात. ) व त्यातच चार पाच उभे चिरलेले कांदे लाल रंगावर परतुन घ्यावेत. कांदे परतुन झाले कि त्यात मराठ्यांचा मसाला, किंवा तो नसल्यास लाल तिखट व थोडा गरम मसाला घालुन परतावे. आधी कोरडे जिन्नस व मग कांदा बारीक वाटुन घ्यावा व सगळे एकत्र कालवुन घ्यावे. मिक्सर धुवुन ते पाणी बाजुला ठेवावे. तेलाची फ़ोडणी करुन त्यात हिंग घालावा व एक बारीक चिरलेला कांदा घालावा.तो परतुन त्यावर मटणाचे तुकडे घालावेत. (हे कुकरमधे केले तर चांगले) जरा परतुन वर हळद घालावी व वरील पाणी घालुन शिजवुन घ्यावे. वरील वाटलेला मसाला परत थोड्या तेलात परतुन घ्यावा. (कांदा खोबरे कितीहि परतले तरी पोटात थोडे कच्चे राहते व मसाला खमंग होत नाही, म्हणुन हे परत परतायचे). मटणात हा मसाला व मीठ घालुन नीट उकळावे. मराठ्यांच्या जेवणात रस्सा जरा पातळच असतो. फ़ोडीना तेवढे महत्व मसते. जोडीला कांदा आणि लिंबाच्या फ़ोडीशिवाय काहि नसते. भाकरी किंवा भाताबरोबर हा खातात.
|
Tanya
| |
| Thursday, July 14, 2005 - 4:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Dinesh : kharach manapasun thanks. Yach paddhatine chicken rassa karayacha ka? any other option for Khaskhas? Mi phaar purvi mazyz shaletalya maitrinikade aase matan khaale hote. (tiche mama mhanje dadarchya phool market madhale dukan wale je Grantroad la Navjivan Soc. madhe rahatat.) Aata gatari javal yetey nakki karun bhaghen. Thank U very much once again.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 14, 2005 - 2:48 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चिकनचा रस्सा असाच. खसखस नसली तरी चालेल. तिला तसा पर्याय नाही. पण परदेशात पांढरी नाही मिळाली तर काळी खसखस मिळु शकेल. ती पावावर वैगरे टाकुन बेक करतात.
|
Manmouji
| |
| Friday, July 15, 2005 - 1:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश थोडेसे विषयान्तर, पण मला जर शहाजिरे ह्याबद्दल माहिती सान्गु शकशिल काय?
|
Manjiree
| |
| Tuesday, July 26, 2005 - 6:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Dineshji, Mi shakahari ahe, pan warilpramane kelele chicken sagalyanach khup khup awadale. Aabhari Aahe.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 27, 2005 - 12:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Manmouji उत्तर द्यायला ऊशीर झाला, कारण या बीबीवर आलो नव्हतो. शहजिरे, हे नेहमीच्या जिर्यापेक्षा आकाराने लहान व काळ्या रंगाचे असते. जिर्यापेक्षा याची चव माईल्ड असते. फ़ोडणीपेक्षा वाटणात घेतले तर त्याचा स्वाद खुलतो. अनेक वेळा पाव, बेकरी उत्पादने यात ते वापरले जाते. मला त्याचा सगळ्यात आवडणारा ऊपयोग म्हणजे खर्वस करताना ते वाटुन लावतात. त्याने खर्वसाला वेगळीच छान चव येते.
|
Manmouji
| |
| Wednesday, July 27, 2005 - 3:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद. पुण्याकडे मिळणार्या खरवसात पण हे घालत असतील का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 27, 2005 - 3:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
घालत असतील तर त्याचा चुरा तळाशी असेल. पण शक्यता कमी आहे. आपल्याकडे वेलची जायफळ घालायची पद्धत आहे.
|
Nalini
| |
| Tuesday, November 22, 2005 - 6:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अर्धा किलो मटण धुवुन स्वच्छ करुन घ्यावे. आले लसुण ओले नारळ बारिक वाटुन घ्यावे. एका पातेलित जी कुकरमध्ये मावेल अशी) तेल गरम करुन त्यात आले, लसुण, खोबरे ह्याची पेस्ट परतवुन घ्यावी. तेल सुटले की त्यात धना पावडर टाकावी व मटणाच्या फोडी टाकुन चांगले परतवुन घ्यावे.ओला नारळ नुकताच फोडला असेल तर त्याचे पाणि घालावे अन्यथा गरम पाणि घालावे(शिजण्यापुरते) , चांगली उकळी आली कि मग चविपुरते मिठ घालावे हे पातेले कुकरमध्ये ठेवुन दोन - तिन शिट्या होऊ द्याव्यात. मटण शिजेपर्यत कांदा गॅसवर किंवा शक्य असल्यास निखार्यावर भाजुन घ्यावा. तव्यावर तेल टाकुन हा कांदा परतवुन घ्यावा. त्यातच खोबर्याचे तुकडे करुन परतवुन घ्यावे. हरभर्याची मुठभर डाळ ही परतवुन घ्यावी. मुठभर तांदुळ परतवुन घ्यावे. थोडेसे धने ही ह्या तव्यावरच भाजुन घ्यावे. वरचा परतलेला सगळा मसाला, कोथिंबीर एकत्र बारिक वाटुन घ्यावे. पातेलीत किंवा कढईत तेल गरम करुन घरी तयार केलेला काळा / गरम मसाला, लाल तिखट परतवुन घ्यावा व त्यात वाटलेला मसाला टाकुन चांगला परतवुन घ्यायचा. आणि त्यात उकडलेले मटण टाकायचे. हवे असेल तेवढे पाणि घालायचे व चांगली उकळी येऊ द्यायची. चुलीवर किंवा गोबरगॅसवर भाजलेली बाजरीची गरम भाकर, उभा इरलेला कांदा, मिठ आणि लिंबु. अश्या प्रकारे करते माझी आई मटण रस्सा.
|
Prajaktad
| |
| Monday, November 28, 2005 - 7:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश! तुम्ही सांगितल्याप्रमाणे मराठा पध्दतिचा मसाला वापरुन चिकन केले होते. मस्त झाले होते धन्यवाद!
|
Maku
| |
| Thursday, March 01, 2007 - 10:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश मला काहीच दिसत नाहीये तुम्ही परत post करता का ? please
|
Dineshvs
| |
| Friday, March 02, 2007 - 3:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Maku ते जुने पोस्ट आहे. शिवाजी फ़ॉन्ट्स लागतील त्यासाठी.
|
Zakki
| |
| Saturday, December 29, 2007 - 3:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोणमांस मटण किंवा कोंबडी, नारळ, दही, दूध, केशर, गुलाबपाणि, तूप, वेलदोडे, शिवाय आले, मिरच्या कोथिंबीर, धने, मीठ इ. वस्तू घालून हा पदार्थ करतात. जर केशरी रंग नको असेल तर केशर घालू नये. केवळ राजेरजवाड्यांकरिता स्वैपाक करणार्या बाईंनी सर्वसामान्य लोकांसाठी स्वस्त वस्तू वापरून करता येतील अश्या पाककृति या पुस्तकात लिहिल्या आहेत. कुणाला हवे असल्यास, मी एक दिवस(भर) खपून पूर्ण कृति लिहीन.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|