Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कापण्या

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » वड्या » कापण्या « Previous Next »

Bee
Saturday, July 24, 2004 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाजरीच्या पीठाच्या कापण्या हा एक खूप चविष्ट प्रकार आहे. करायला अतिशय स्वस्त आणि सोपा आहे. बहुतेक बाजरी आणि गूळ ह्या दोन गोष्टी made for each other असाव्यात.

बाजरीच्या पीठात गुळाचे पाणी घालून ते पीठ मळून घ्यावे. वेलदोड्याची पुड घालावी. नंतर तूपात किंवा डालड्यात गोल किंवा चतकोर आकाराच्या कापण्या तळून घ्याव्यात. मेणकापडावर कापण्या सहज थापता येतात. तळताना गुळाचा वास घरभर पसरतो. कापण्या एक दोन महिने टिकतात. पंधरा एक दिवसांनी जर ह्याच कापण्या खाल्यात तर चव अजून वेगळी लागते. एकदा जरूर करून पहा..


Prr
Monday, December 31, 2007 - 9:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी मला थोडी detail मध्ये साग कापण्या ची recipe
प्रमाण काय घ्यायचे आणि तळताना गुळ विरघळुन काही problem नाही का येत?
पीठ लाटायचे की थापायचे? आणि किती जाडीच्या कापण्या करायच्या?
its urgent....

Dineshvs
Tuesday, January 01, 2008 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रकार राजस्थानमधेही करतात. एक वाटी बाजरीच्या पिठाला, लिंबाएवढा गूळ, वाटीभर पाण्यात विरघळवुन घेतला तर पुरतो. मळताना थोडेसे तेल आणि पांढरे तीळ घालायचे.
याची पोळी लाटुन शंकरपाळ्या लाटल्या तरी चालतात किंवा गोल वडे थापुन तळले तरी चालतात. जाडी साधारण अर्धा सेमी ठेवायची. नुसते बाजरीचे पिठ घेतले तर त्याला चिकटपणा येत नाही, त्यामुळे गुळ घालायचा. व बाजरीची किंचीत कडसर चव गुळाने कमी होते.

मला तळलेले पदार्थ आवडत नाहीत म्हणुन हा एक सोपा प्रकार.
बाजरी पाच सहा तास भिजत घालुन मिक्सरमधे वाटायची. वाटताना पाणी घालायचे. मग हे मिश्रण गाळणीने गाळुन घ्यायचे.
थोडा वेळ तसेच ठेवले कि साका खाली बसतो. हा साका एक वाटी असेल तर एक वाटी साधे वा नारळाचे दूध घालायचे. साधे दुध वापरले तर अर्धी वाटी साखर आणि नारळाचे दूध वापरले तर अर्धी वाटी गुळ घ्यायचा.
सगळे मिक्स करुन घ्यायचे. जाड बुडाच्या पातेल्यात, अर्धा चमचा साजुक तुन घालुन, मंद आचेवर हे मिश्रण गरम करायचे. हे मिश्रण लगेच घट्ट होते. तसे झाले कि तुप लावलेल्या ताटात ओतायचे. वरुन हवे तर भाजलेले तीळ वा काजु तुकडे लावायचे.
या वड्या मऊसर बर्फ़ीसारख्या होतात. गोडाचे प्रमाण वाढवले तरी चालेल.


Prr
Tuesday, January 01, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण सहसा तळलेले पदार्था एवजी इतर प्रकारे तो पदार्थ करत येतो का हे बघते. पण मला १० दिवस फ़्रिज बाहेर टिकणारे पदार्थ हवे होते म्हणुन या कापण्या बद्द्ल विचारले.
वा!!! बाजरीची मिठाई ..... मस्त....:-)
पण मिश्रण गाळणीने गाळुन घ्यायलाच हवे का? माझ्याकडे गाळणी नाही आहे म्हणुन विचारले...

Dineshvs
Tuesday, January 01, 2008 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाळले नाही तर बाजरीचा कोंडा राहतो आणि वड्या मऊसर होत नाहीत. या वड्याना मस्तच चव येते.
गाळणी नसेल तर झिरझिरीत कापड वा रुमाल वापरता येतो.
पण हा प्रकार फ़्रीजबाहेर टिकणार नाही.


Prr
Tuesday, January 01, 2008 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद Dineshvs!!
मी कापण्या करायला बाजरीचे पिठ व गूळ पाण्यात विरघळवुन मळले. कडवट पणामुळे मी गुळ थोडा जास्तच वापरला.
पण मळल्यावर त्याचा भुगा झाला आहे. लाटणे तर नाहीच पण थापायला पण नीट जमत नाही आहे. मी पाण्याचा हाथ लावुन वड्यासारखे थापण्याचा प्रयत्न केला. पण थापताना सगळ्या बाजुनी भेगा पडल्या व त्यामुळे ते तळताना फ़ुटले. चव पण फ़ार कडवट लागते आहे.
नक्की काय चुकले माझे?

Dineshvs
Wednesday, January 02, 2008 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाजरीचे पिठ जुने असणार.
हे पिठ नीट मळून घ्यायला हवे होते.
सगळेच पिठ भिजवले नसेल, तर वरीलप्रमाणे वड्या करता येतील.


Prr
Wednesday, January 02, 2008 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर आहे तुमचे Dineshvs. Naliniने पण मला हेच सान्गितले...चान्गले पीठ मिळाले तर नन्तर अवश्य करेन.
thanks!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators