|
Vj1
| |
| Sunday, July 02, 2006 - 6:45 pm: |
| 
|
Mitraho, had come across a book 'Cookbook for Workholics'; published by Penguin. If you can lay hands on it, it's a GOLDMINE collection. It has LOTS of tips and recepies. One which I can remember ' instead of having salt and pepper in 2 shakers, have a mixture in 1. Saves time in morning.. Do let me know if u get a copy.
|
Pooh
| |
| Sunday, July 02, 2006 - 8:33 pm: |
| 
|
माझी झटपट meal ची कृती हवी आहे का कुणाला?? :-) पिझ्झा हट, डॉमिनोज किंवा बॅन्कॉक कुझिन ला फोन करणे ३० मिनिटात जेवण घरपोच मिळते.
|
Geetai
| |
| Wednesday, December 13, 2006 - 12:36 pm: |
| 
|
Mla gharguti jevn, purn jevn, mhanje koshimbir pasun shiknyachi echha aahe. Ts srv jevn krte, pn catering class chaltatna tshya eka classchi mahiti milu shakelka mla. Ek aavd mhanu mla class kraycha aahe. Jr konal MUMBAI madhe ashi kahi classes mahit astil tr mla krupya klva. Thanks.
|
मला वेळ नसेल किंवा कंटाळा आला तर मी ह्यादोन पदार्थांनी जेवण उरकते. लाल भोपळ्याचा पराठा आणि उसळ, pumpkin pie करण्यासाठि cooked pumpkin chyaa cans मिळतात ति can 15 oz ची (मी Libby's 100% pumpkin वापरते). या pumpkin puree मध्ये थोड तेल, तिखट (ऐच्छिक), हळद, मीठ, तीळ आणि ओवा घालुन नीट मिसळुन घ्यायच. त्यात मग मावेल तितकि कणिक घालुन सधारण पोळ्यांच्या कणकेप्रमाणे भिजवुन घ्यायच. हि कणिक लगेच वापरता येते पराठे करायला (जास्त वेळ भिजवुन ठेवलि तर सैल होते.) ह्या भिजवलेल्या कणकेचे सधारण १४१५ पराठे होतात. या परठयाबरोबर canned Beans (kidney beans, black eyed beans, garbanzo beans (chickpeas) etc) ची उसळ करता येते. या beans शिजवलेल्या असल्यामुळे उसळ पण झट्पट होते. उसळ नको असल्यास वांग्याचे भरित करता येइल. हा मेनु झट्पट होणारा असला तरिहि खुप nutritious आहे. लाल भोपळा loads of Vit. A , beans = proteins आणि वांग्याच भरित loads of iron + fibers .
|
Bavlat
| |
| Friday, January 12, 2007 - 6:57 pm: |
| 
|
१४१५ पराठे???. कितीतरी दिवस पुरतील नाही.
|
Sashal
| |
| Friday, January 12, 2007 - 6:59 pm: |
| 
|
gorgonzello beans ->>> garbanzo beans म्हणायचंय ना?
|
Sashal , मला Gorgonzola beans म्हणायच होत. I made a spelling mistake .
|
Sashal
| |
| Friday, January 12, 2007 - 9:02 pm: |
| 
|
अगं gorgonzola cheese असतं .. अशा नावाचे beans नसावेत बहुदा ..
|
oops! you are right sashal. काय माहिति माझ कुथे लक्श होत लिहताना. मी correct कर्ते ह मुळ mistake.
|
Rakhee
| |
| Thursday, September 20, 2007 - 1:13 am: |
| 
|
तांदळाच्या उकडीचे थालिपीठ आणि काॅर्नचे सुप थालिपीठ्: तांदळाच्या उकडीमध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, वाटलेली हिरवी मिरची व जिरे पुड घालावी. चांगले मळून गोळा बनवावा. हा मोठा गोळा लहान गोळ्यांमध्ये विभागावा. तव्यावर कुकींग स्प्रे किंवा तेल लावावे. एक छोटा गोळा घेऊन त्याचे थालिपीठ थापावे. ह्या थालिपीठाला मधे एक आणि त्या भोकाच्या भोवति अजुन ४ भोके पाडावीत. ह्या भोकांमध्ये तेल सोडावे. झाकण ठेऊन खालची बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे. मग झाकण काढुन थालिपीठ उलटावे. दुसरी बाजु क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे. सुप्: थालिपीठ करायला घेण्याआधी काॅर्नचे दाणे कुकर मधे ३ शिट्या करुन शिजवुन घ्यावे. एका काॅपर बाॅटम किंवा नाॅनस्टिकच्या भांड्यात कोर्न फ़्लोअर बटरमधे भाजुन घ्यावे. काॅर्न फ़्लोअरचा रंग बदलला की त्यात दुध घालुन शिजवावे. हे मिश्रण खूप घट्ट नको. भज्यांच्या पीठापेक्षा थोडे घट्ट चालेल. मग ह्यात शिजलेले काॅर्नचे दाणे घालावेत. चवीप्रमाणे मीठ, साखर व मीरपुड घालावी. अजुन थोडे दुध किंवा पाणी घालुन सुप उकळावे. गरम थालिपीठा बरोबर गरम सुप खावे. हे गणेशोत्सवामधे टाकता येइल का? माझ्या आयडीला तिथे काहीतरी प्राॅब्लेम येतोय.
|
Psg
| |
| Thursday, September 20, 2007 - 7:44 am: |
| 
|
राखी, तू आधी नवीन मायबोलीवर लॉगिन कर. इथे मेन पानावर 'गणपतिची मूर्ति' दिसते त्यावर क्लिक कर. तिथे तुझे लॉगिन आणि पासवर्ड विचारले जाईल. हाच आयडी आणि पासवर्ड दे म्हणजे तुझे हे प्रोफ़ाईल तिकडे शिफ़्ट होईल. तिथे मग ही पाककृती लिही पुन्हा
|
Rakhee
| |
| Thursday, September 20, 2007 - 11:33 pm: |
| 
|
पूनम, माझ्या आयडीनी नवीन मायबोलीवर लाॅगिनच होत नाहीये. ऍडमिनला मेल केली आहे. Thank you 
|
Sanyojak
| |
| Friday, September 21, 2007 - 4:19 am: |
| 
|
हौशी मंडळीनो! तिकडे गणेशोत्सवातही पाककला स्पर्धा ठेवलीय. माहीती आहे ना? तुमच्या आया, आज्ज्या, माम्या, मावश्या, काकवा आणि तुम्ही स्वतः अशा सुग्रणींच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून किंवा बाबा, काका, मामा अशा सुग्रणांच्या संडे स्पेशल प्रयोगांमधून तावून सुलाखून आलेले एखादे झटपट जेवण कॉंबी आठवतेय का? चला तर आता पाचच दिवस राहिले स्पर्धा संपायला. त्वरा करा!
|
Sanyojak
| |
| Friday, September 21, 2007 - 4:26 am: |
| 
|
राखी शेवटच्या दिवसापर्यंत तुमचे लिखाण तिकडे हलवण्यात प्रॉब्लेम झाला तर आम्ही तिकडे टाकू किंवा इथूनही स्पर्धेत धरले जाईल पण लॉगिन होत असेल तेंव्हा लगेच तिकडे पोस्ट करून टाकायचा प्रयत्न करा.
|
Mahaguru
| |
| Friday, September 21, 2007 - 3:44 pm: |
| 
|
संयोजक महोदय, मी काही पाककलेमधला तज्ञ नाही पण ३० मिनिटामधे जेवणातले २ पदार्थ होणे जरा अवघड आहे. ह्या नियमाप्रमाणे आत्तापर्यंत आलेल्या सगळ्याच प्रवेशिका बाद होतील. अमेरीकन पदार्थ ३० मि. मधे (पुर्वतयारीचा वेळ गृहीत न धरता) करणे वगळे आणि भारतीय पदार्थ वेगळे. जरा नियम शिथिल करा नाही तर एकही पाककृती qualify होणार नाही.
|
Mrinmayee
| |
| Friday, February 08, 2008 - 3:58 pm: |
| 
|
रेचेल रे च्या कृपेनी काल एक मस्त जेवण झालं. मेक्सिकन सँडविचेस! २ ब्रेड (मी crusty 5 grain baton घेतले. तीच्या कृतीत baguette म्हंटलं होतं.) २ कॅन ब्लॅक बीन्स साल्सा जीरे पावडर १ चमचा लाल तीखट हवं तसं मीठ (बीन्स मधे नसल्यास) तेल (ऑलिव ऑइल चांगलं लागलं) पिटेड ऑलिव्ह हॅलापिनो मिरच्या (बाटलीतल्या) बारिक चिरलेला कांदा बारिक चिरलेला लेट्युस चिरलेले टोमॅटो पेपर जॅक चीज ४ चीज ब्लेंड (किसलेलं आयतं मिळतं) कृती: ब्रेडला लेंथवाईज कापून (हवाहवाईला कुजबुजीला मटेरिअल पुरवावं म्हणून मी चित्र टाकणार होते! ) ब्रेडच्या आतला भाग थोडा पोखरून घ्यावा. अर्ध्या बीन्सना चांगलं बारिक करून उरलेले अख्खे बीन्स तसेच ठेवून (दोन्ही प्रकार) तेलात परतावे. (तिखट आवडत असल्यास तेलात हॅलापिनो मिरच्या घालाव्यात.) मीठ, जीरेपुड, लाल तिखट आणि थोडा सालसा घालून ३-४ मिनिटं परतावं. (एव्हाना ओवन ३५० डेग्रीवर बेक साठी ठेवावं) पोखरलेल्या ब्रेड मधे गरम बीन्स भरून वरून सालसा आणि चीज घालून ५ मिनिटं (किंवा चीज वितळेपर्यंत) बेक करावं. ओवनच्या बाहेर काढल्यावर ब्रेड वर लेट्युस, कांदा, टोमॅटो, ऑलिव्ह्ज, घालून गरमा गरम संडविचेस ( TV समोर तंगड्या पसरून) खावेत! (चार लोकांना, अगदी खादाड असले तरी, पुरतात). *ह्या कृतीत भरपूर बीन्स असल्यामुळे सगळ्यांनी जेवणं झाली की वेगवेगळ्या खोल्यात बसावं!
|
Manuswini
| |
| Friday, February 08, 2008 - 10:07 pm: |
| 
|
तंगड्या पसरूनच खाल्ले तरच चांगले लागणार?
|
Ami79
| |
| Friday, May 16, 2008 - 9:36 am: |
| 
|
माझे ३० मिनिटतले जेवण टोमॅटोची भाजी: टोमॅटो आणि बटाटे २:१ प्रमाणात घेऊन मध्यम आकारात कापावे. चवीप्रमाणे मिरच्या कढीपता आणि कोथिंबीर कापून घ्यावे. टोमॅटो-बटाट्याच्या अर्ध्या प्रमाणात कांदे बारिक कापून घ्यावे. नेहमीप्रमाणे फोडणी बनवून त्यात कांदा परतून वरून बटाटे आणि टोमॅटो घालून शिजू द्यावे.मीठ अर्थात चवीप्रमाणे. याबरोबर भाकरी बनवावी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|