|
Dineshvs
| |
| Tuesday, January 04, 2005 - 5:05 pm: |
|
|
मागे एथे बेक्ड सामोश्यांची चर्चा झाली होती. त्यावेळी मी पफ़ पेस्ट्री वापरायला सुचवले होते. पण पफ़ पेस्ट्री वापरल्यास आपल्या समोश्याची नेहमीप्रमाणे त्रिकोणी घडी घालता येत नाही. पफ़ पेस्ट्री वापरुन लॅटिस पद्^धतीचे सामोसे (त्याला सामोसे म्हणता येणार नाही) करता येतील. त्यासाठी कृति अशी. आपल्या आवडीप्रमाणे सारण करावे, ते फ़ार ओले नसावे. ३७५ ग्रॅम पफ़ पेस्ट्री आणावी. जर ती फ़्रोझन असेल तर रुम टेंपरेचरला येऊ द्यावी. मग त्याचे दोन समान भाग करावेत. एक भाग चौकोनी लाटुन घ्यावा. त्यातुन सहा गोल कापुन घ्यावेत. उरलेला कडा बाजुळा ठेवाव्यात. या सहा बेसवर सारण ठेवावे. पिरॅमिडसारखा आकार द्यावा. सगळीकडुन जागा सोडावी. मग उरलेली अर्धी पेस्ट्री तशीच लाटावी.याचेही सहा चौकोनी तुकडे करावेत. मग त्यावर एक सेमी अंतरावर एक सेमी उंचीच्या चिरा द्याव्यात. अर्धा सेमी जागा सोडुन चिरांची दुसरी ओळ द्यावी. दुसर्या ओळीतल्या चिरा या वरच्या चिरांच्या मधे यायला हव्यात. मग सारणाच्या पिरॅमिडवर हे जरा हलकेसे ताणुन बसवावे. म्हणजे चिरा उघडुन पाकळ्यांसारखे झरोखे तयार होतात. कडा थोडे पाणी लावुन सील कराव्यात. थोडे दुध घेऊन वर लावावे. सारण गोड असेल तर थोडीशी साखर पेरावी. मग १९० अन्श से. वर हे साधारण २० मिनिटे भाजावे. करुन बघाच. पण मला ईथे नमुद करायला हवे. हे सामोसे ? बेक केले म्हणुन त्यात तेलाचा अंश कमी असतो असे नव्हे. मुळात पफ़ पेस्ट्रीत भरपुर तेल वापरलेले असतेच.
|
Najuka
| |
| Friday, August 26, 2005 - 6:41 pm: |
|
|
samosyanche saran: this is how i do it: 1. batate ukaduntyachya fodi karun ghyavyat 2. fodnit bharpur kadipatta jire mohri hing etc takave, thodya lal mirchya kiva hirvya mirchya takavyat aani kinchit halad. 3. tyat kutlela lasun aani aala takava aani paratava 4. mug batatyachya fodi takun kharpus paratava 5. mug lal tikhat( aadhi mirchya ghatlya aahet he lakshat asudyat) , mith aani amchur powder aani garam masala ghalava. thodishi badishop kutun ghalavi 6. watla tar thodese matar ukadun kiva microwave madhun kadhun takavet. aani ekjeev karun paratava... zala saran tayar. tips for batata ukadane: 1. microwave madhe uakadu naye, bhagara hoto. 2. kukar madhe khup panyat khup vel ukadala aani barach vel solala nai tar chikat hoto.
|
Maitri
| |
| Friday, August 26, 2005 - 8:16 pm: |
|
|
najuka dhanyavad!! udyacha karun baghate tuzya receipe pramane.
|
Najuka
| |
| Wednesday, August 31, 2005 - 5:36 pm: |
|
|
न चुकणारे सामोसे: पारीसाठी २ वाट्या मैदा, ८ टी स्पून तेल, बर्फ़ाचे पाणी लागेल तसे एका भान्ड्यात मैदा घेउन त्यात मीठ घालावे आणी मैद्याल तेल चान्गले चोळुन घ्यावे. हे जवळपास ओल्या bread crumbs सारखे दिसले पाहिजे. यात बर्फ़ाचे पाणी घालुन मैदा घट्ट भिजवावा. आणी ओल्या कापडात गुन्डाळुन ठेवावा ( अर्धा पाउण तास तरी. मग, मी वर सान्गितल्या प्रमाणे सारण करुन घ्यावे. आता सहा किन्व आठ भाग करावे या मैद्याच्या गोळ्याचे. मग पोळी लाटुन सुरिने अर्धी करावी, आणी सारण भरुन सामोसे करवेत. म्हणजे एकुण १२ ते १६ medium सामोसे होतिल. आणी freeze oil spray करुन बेक करावेत. freezer मध्ये बरेच दिवस टिकतात. पण त्या आअधिच सम्पून जातात. हे सामोसे आजिबात तेलकट होत नाहीत आणी बाहेर सारखे खुसखुशीत होतात
|
Ajauna %yaat addition saaMgaU kaÆ fTafT saamaÜsao For Cover : Puff Pastry Sheets For Filling : dÜnatIna ]kDlaolao baTaTo ek kaMda ³baarIk icaÉna´ qaÜDo frozen maTar Aalao lasauNa garma masaalaa maIz varIla saaih%ya Gao]na %yaacaI naohmaI p`maaNao BaajaI kravaI. naMtr pastry sheets cao saaQarNa 2 nca X 2 nca tukDo kapuna Gyaa. p`%yaokat saaQaarNa ek - ek camacaa BaajaI BaravaI. AaiNa qaÜDosao paNaI laavaUna krMjaI p`maaNao baMd kra. caÝkÜina ikMvaa i~kÜNaI. Cookie sheet var 2 - 2 nca dur zovaUna 375 degrees preheated oven maQyao zovaa. 15 - 20 imainaTnaI baGaa. (if required Ajauna qaÜDa vaoL zovaa.´ garmagarma saamaÜsao tyaar. ho ek - dÜna idvasa caaMgalao iTktat ³]rlao tr.. ´ Kayacyaa AaiQa 15 - 20 saokMd microwave maQyao garma kÉna caha barÜbar Va AaiNa Ka. mastca laagatat.
|
Kitkat
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:56 am: |
|
|
"Disco Samosa" सारणासाठी साहीत्य: १ कप खवा, अर्धा कप बेसन, आमचूर, तिखट, मीठ, मिरेपूड, धने, जिरेपूड, बडीशेपेची पूड, लवन्ग, दालचीनी पुड सर्व अन्दाजाने घ्या. एक चमचा साखर घाला. कृती: थोड्या तेलावर बेसन भाजा. खवा वेगळा भाजून घ्या. सर्व साहीत्य एकत्र करून चटपटीत सारण तयार करा. पारीसाठी २ कप मैदा. अर्धा चमचा वनस्पती तूप, एक चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर, गार पाणी भिजवायला. मैदा बेकिंग पावडर चाळा. तूप मैद्याला चोळून घ्या. गार पाण्याने भिजवा. लहान पुर्या लाटून एकाचे २ भाग करून सारण भरून तळून घ्या. हे समोसे लहान लहान बनवायची पद्धत आहे. हे समोसे बरेच दिवस टिकतात.
|
किटकॅट, हो मी अश्याच प्रकारच्या सामोश्यांची रेसिपी शोधत होते. पण मी शोधतीयं ते काॅकटेल सामोसे. त्यात आतमध्ये बाकरवडी च्या सारणासारखे मिळते-जुळते सारण असते. बारीक शेव, मूगाची डाळ, काजू, मनुका, चिंच, गरम मसाला, बडिशोप वगैरे घालून आंबट-गोड सारण असते. हलदीरामचे मिळतात बघा असे. त्यात खवा असेल असे मला नाही वाटत.. कोणाला माहिती असेल ती रेसिपी तर लिहा ना please ..
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 07, 2006 - 4:25 pm: |
|
|
मुगाची डाळ भिजवुन भरड वाटुन ती तेलात परतुन कोरडी करायची. मग त्यात चवीप्रमाणे गरम मसाला, चिंचेची पावडर वा आमचुर. किंचीत पिठीसाखर, मीठ, बडीशेपेची पुड वैगरे घालुन सारण करायचे. बेदाणे व काजु वैगरे पण जरा परतुन घालायचे. हे सारण पुर्ण कोरडे हवे. या सामोस्याचे कव्हर अगदी पातळ लाटावे लागते. तरच ते कुरकुरीत होतात. पण हल्ली सामोसा पट्टी म्हणुन ते बाजारात तयार मिळते. या आयताक्रुती कापलेल्या पट्ट्याच असतात. त्याचे कव्हर करायचे. तळल्यावरहि कागदावर काढायचे म्हणजे तेल निघुन जाते. कोरडे सारण व पातळ पारी यामुळे हा सामोसा कोरडा होतो.
|
अच्छा, मूगाची डाळ भिजवून, वाटून, कोरडी परतायची का..सोप्पी आहे कि मग! (अर्थात करून बघितल्यावरच कळेल). चिंचेची पावडर कुठून आणावी हे एक बघावे लागेल मला. आणखी एक पर्याय सुचला मला. मूडी ने कोरडे बेसन भरून कचोरीची रेसिपी दिली आहे ते सारण भरून पण करता येतील नाही असे टिकणारे छोटे छोटे सामोसे...
|
Prarthana
| |
| Friday, December 08, 2006 - 6:17 am: |
|
|
सामोसे किंवा कचोरी ची पारी खुसखुशीत रहाण्यासाठी काय करावे मी केले तर ते मऊ पडते
|
Surabhi
| |
| Friday, December 08, 2006 - 10:02 am: |
|
|
प्रार्थना, आपल्याला हवा तेव्हढा मैदा परातीत घ्यावा मीठ घालावे व एक चमचा तेल आणि एक चमचा गरम पाणी असे एक एक चमचा चमचा घालत (जितके लागेल तसे) तो मैदा भिजवावा घट्ट. असे कव्हर बनवून जर मंद आचेंवर समोसे तळलेस तर खुसखुशीत होतात व बराच वेळ तसेच रहातात. Try करून पहा.
|
Sonalisl
| |
| Monday, November 19, 2007 - 6:32 pm: |
|
|
म्हणजे जेवढं तेल तेवढं गरम पाणी लागतं ना?
|
Surabhi
| |
| Tuesday, November 20, 2007 - 10:28 am: |
|
|
हो सोनाली जितके तेल तितकेच पाणी घ्यायचे आहे. किंवा तू असे ही करू शकतेस, पाव वाटी तेलात पाव वाटी पाणी घाल व चवीला मीठ घालून विरघळून घे व त्यात एक वाटी भरून (अगदी शिगोशीग भर ) मैदा घाल व घट्ट भिजव. तसंही चालेल. नंतर पाहून मैदा मावत असेल तर घाल.तसेच तळताना मंद तळायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|