|
Suma
| |
| Saturday, March 05, 2005 - 2:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
kunalaa maiht Asalyaasa qao ilaha PlaIja
|
Dineshvs
| |
| Saturday, March 05, 2005 - 10:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पाणी पुरीची सर्व कृति मी मागे लिहिली आहे. हिरव्या चटणीसाठी दोन कप कोथिंबीर, दहा बारा हिरव्या मिरच्या (बिया काढलेल्या), आवडत असेल तर थोडा पुदीना, जिरे, आले आणि मीठ एकत्र करुन वाटावे. त्यात लिंबाचा रस घालावा. पालक (ब्लांच करुन) किंवा आंबट चुका पण घालता येतो. गोड चटणी खजुर आणि चिंच कोमट पाण्यात अर्धा तास भिजत घालावे. मग बिया दोर वैगरे काढुन रस कोळुन गाळुन घ्यावा. त्यात हवी असेल तर साखर वा गुळ घालावा. थोडे लाल तिखट घालावे. जिरे पुड व मिरीपुड पण घालावी. हि चटणी टिकत नाही म्हणुन मंद आचेवर घट्टसर होईपर्यंत शिजवुन घ्यावी. पिवळी चटणी भाजलेले चणे, (चणे शेंगदाण्यातले चणे, काळे चणे सोलायला सोपे जातात, म्हणुन ते घ्यावेत.) सोलुन घ्यावेत मग त्यात मीठ व लाल तिखट घालुन बारीक पुड करावी. त्यात थोडे कुरमुरे, थोडासा हिंग व थोडी सुंठपुड घालावी. (हे सगळे वाटतानाच घालावे.) हि पुड कोरडीच असते. हि चटणी चिंच व मिरचीबरोबर वाटुन त्याचे गोळे उसाच्या रसाबरोबर खायची बेळगावात पद्^धत आहे. प्रत्येक चटणीचे घटक आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करावेत.
|
Sayonara
| |
| Thursday, August 18, 2005 - 1:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझी भेळ, पाणीपुरीच्या चटणीची कृती : तिखट चटणी : कोथिंबीर, मिरच्या, पुदिना, मीठ मिक्सरम्धून थोडं पाणी घालून वाटून घ्यावं. चवीकरता हवं तर थोडा रायता मसाला, लिंबू घातलं तरी चालेल. गोड चटणी : खजूर, चिंच, गूळ, १ टोमॅटो मायक्रोवेव मधून शिजवून घ्यावा. साधारण १२, १३ मिनिटं. गार झाल्यावर मिक्सरमधून काढून गाळून घ्यावं. व नंतर त्यात चवीकरता लाल तिखट, मीठ व पाणीपुरीचा मसाला घालावा. आणखीन एक वेगळ्या चवीची चटणी : एका पातेल्यात १२, १३ लसणीच्या पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या मध्यम पाणी घालून शिजवत ठेवाव्यात. आणि भरपूर आटवावं जवळ जवल पाणी नाहीसं होईस्तोवर मग मिक्सरमधून मीठ घालून वाटावं. ही वेगळ्या चवीची चटणी ही भेळेबरोबर मस्त लागते.
|
Madhavm
| |
| Tuesday, December 06, 2005 - 11:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हिरवी चटणी: १ मध्यम जुडी कोथिम्बीर काड्यांसकट्) १५-१६ हिरव्या मिरच्या तिखट असाव्यात्) १/२ वाटी पुदिन्याची पाने १०-११ लसुण पाकळ्या १/४ वाटी धने १/४ वाटी जीरे १ च. च. लवंग्-दालचीनी powder किंवा गरम मसाला काळे मीठ सैंधव्) १. धने व जीरे वेगवेगळे भाजून घ्यावेत. (चांगला घमघमाट सुटला पाहिजे) २. Mixer मधून त्यांची एकत्र powder करून घ्यावी. ३. मिरच्या व लसुण एकत्र mixer मधे वाटाव्यात. ४. त्यावर कोथिंबीर, पुदिना घालून mixer मधून एकजीव paste करावी. ५. मग त्यात ताजी धने-जीरे powder , लवंग्-दालचीनी powder घालावी. ६. पाणी घालून योग्य consistency आणावी. ७. यात सैंधव घालूनच आळणीपणा घालवावा. साधे मिठ घालू नये. टीप्: ही चटणी freezer मधे ३-४ महिने सहज टिकते. फक्त अतिसूक्ष्म लहरीनी विबर्फीत करून घेतली की झाले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|