|
Pama
| |
| Wednesday, November 02, 2005 - 4:03 pm: |
|
|
मी हा वेगळा प्रकार केला आज. छान झालाय. पालकच्या कडक कुरकुरीत पुर्या साहित्य : कणीक २ वाट्या बेसन १ वाटी रवा २ टेबल स्पू. पालक ( ताजा असेल तर धुवून इरून मिठाcया पाण्यात शिजवून घेतलेला नाहीतर 1/2 Box forzen पालक) धणे जिरे पूड २ तिखट, हळद, ओवा, कृती सगळी पिठ एकत्र कऊन त्यात सर्व मसाला व पालक घालावा. 1/2 वाटी कडकडीत तेलाच मोहन घालून पीठ घट्ट भिजवून अर्धा तास air tight डब्यात ठेवून द्याव. नंतर जरा तेलाचा हात लावून मळून घ्याव. हव्या त्या size च्या पुर्या लाटाव्या आणि त्या fork ने बर्याच ठिकाणी टोचाव्या. (सगळ्या पुरीभर टोचलेल असाव म्हणजे पुरी फुगत नाही. जिथे टोचल नसेल तो भाग फुगतो) अशा पुर्या अगदी मंद आचेवर तळाव्या. तळताना झार्याने वरून दाबाव्या म्हणजे अजिबात फुगणार नाहीत. लालसर तळून काढाव्या आणि tissue paper अथवा वर्तमानपत्रावर ठेवाव्या. एकदम खुसखुशीत आणी कुरकुरीत होतात. साधारण ८ - १० दिवस तरी टिकतील. झाल्यावर पण air tight डब्यात ठेवाव्य नाहीतर मऊ पडतील. मला इथे मेथी मिळत नाही म्हणून नाहीतर मेथीच्या पुर्या मस्त होतील.
|
Bhagya
| |
| Thursday, November 03, 2005 - 5:12 am: |
|
|
अगं पमा, कसूरी मेथी वापरली तर चालेल असे वाटते. तसेच, जर early spring मध्ये मेथीचे दाणे कुंड्यांमध्ये पेरलेस तर छान मेथी येईल. मी नेहमी लावते. मेथी थंड हवेत छान वाढते, तिला frost पण चालते पण खूप ऊन किंवा NJ सारखा बर्फ़ चालत नाही.
|
Pama
| |
| Thursday, November 03, 2005 - 4:28 pm: |
|
|
हो भाग्या, कसूरी मेथी चालेल. माझ्या कडे पालक होता म्हणून मी पालकाच्याच केल्या. मी मेथी लावण्याचा वगैरे प्रयोग केलेला नाही.मला वाटत NJ सारख Mass चा बर्फही त्याला चालणार नाही.
|
भाग्य तू अळकुड्या लावून बघितल्या आहेस का अळूची पाने सुंदर येतात थंडीत सुद्धा छान राहते झाड माझ्या मैत्रिणीकडे मी पाहिलंय मी स्वतः हा प्रयोग केला नाहीये तिच्या कडे मेथी लाल माठ सर्व छान येते
|
Snp
| |
| Tuesday, October 17, 2006 - 1:32 pm: |
|
|
Read this for all Diwali items दिवाळीचा फ़राळ ह्त्त्प्://व्व्व.एसकलओमेसकल०१७२००६०२७६आ३९४९B्त्म
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|