Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
General

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Tips » General « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 10, 200720 01-10-07  3:18 pm

Dineshvs
Wednesday, January 10, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिथे तळण वैगरे चालु असेल, तिथे एका वाडग्यात व्हीनीगर भरुन, त्या शेजारी साधी मेणबत्ती लावावी, सगळे वास आणि धुर त्यात शोषले जातात.

Disha013
Friday, January 12, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ धारदार टिप्स माझ्याकडून.....
किसणीला धार करण्यासाठी तिच्यावर sand paper घासावा.

mixer मधुन खडे मीठ फ़िरवले तर blade ला चांगली धार येते.


Sayuri
Saturday, January 27, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठी वेलची आणि जावेत्री हे दोन मसाल्याचे पदार्थ दिसतात कसे? त्यांची इंग्रजी नावे काय? म्हणजे गूगलींग करता येईल मला. google images मधून त्यांच चित्रही मिळेल.

Sas
Saturday, January 27, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठि वेलची हि हिरव्या वेलची सारखिच असते आकाराने मात्र मोठी असते व काळपट असते.
छे डोक्यात होत आणी गेलही इंग्रजी नाव आठवल की लिहिते.हिंदित जंगली ईलायची म्हणतात.

Sas
Saturday, January 27, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Large/Big Cardamom मोठि वेलची

Prady
Saturday, January 27, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावित्री म्हणजे Mace जाय्फळाच्या वर हे असतं.
इमेज इथे बघ.

http://www.inmagine.com/fdc_single10/fdc940172-photo
मसाला वेलची पण मिळाली तर देते इमेज.

Sas
Saturday, January 27, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just give Cardamom in google you will get images, Big Cardamom can be Green or Black.
Which to use in Masala Dineshda or Moodi can guide. (Where is Moodi from long time?)

Prady
Saturday, January 27, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घे मसाला वेलचीची इमेज.

http://en.wikipedia.org/wiki/Black_cardamom

Sayuri
Saturday, January 27, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady & Sas, thanks a lot!!!

Prady
Tuesday, February 06, 2007 - 3:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किचनमधला भांडी घासायचा स्पंज वापरून झाल्यावर पाण्याने नीट धुवून स्वच्छ पिळून ठेवावा. हा स्पंज तसा दमट असल्यामुळे तो अनेक रोग पसरवणार्‍या जर्म्स चं ब्रीडींग ग्राऊंड होतो. दिवसातून एकदा जर व्यवस्थीत ओला केलेला स्पंज १५-२० सेकंदांसाठी हाय पॉवरवर microwave मधे ठेवला तर तो सॅनिटाईझ व्हायला मदत होते. शक्यतो ह्यापेक्षा जास्त वेळ ठेऊ नये. स्पंजने पेट घेतला तर भलतंच काही व्हायचं. काहीजण Dishwasher मधे स्पंज धुवा असं सांगतात. मी ट्राय केलेलं नाही. शक्यतो दर महिना ते दीड महिन्याने स्पंज बदलावा.

Bee
Wednesday, February 07, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

plastic चे जेवनाचे डबे अगदी कितीही साबन लावून धुतले तरी पदार्थांचा राहिलेला वास त्यातून जात नाही. शिवाय हळदीचे तिखटाचे डाग देखील पडतात. ह्यावर काही उपाय आहे का? आजकाल microwave असल्यामुळे plastic चे डबे सोयीस्कर झालेले आहेत.

Sia
Wednesday, February 07, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee
माझी आई प्लास्टिक चे डबे चहा केल्या वर जी चहा पत्ती उरते त्यानी एकदा पूसून घेते. नाही तर मग कागदा नि पूसून घेते.

Prady
Wednesday, February 07, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डबे microwave मधे ठेवल्यामुळे डाग पडतात हे खरं आहे पण हल्ली stain resistent डबे मिळतात. ते वापरून पहा. वास येत असेल तर धुवायच्या आधी थोडा वेळ मिठाचं गरम पाणी घालून ठेवावं. वास निघून जातो.

Lopamudraa
Wednesday, February 07, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डायलुट केलेल्या ब्लीच ने पुसुन स्वच्छ धुतले तर हळदीचे डाग सह्ज जातात..

Shonoo
Wednesday, February 07, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शक्यतो हळदीचे, फोडणीचे प्रकार प्लॅस्टिक डब्यांमधून मायक्रोवेव्ह करून नयेत. काचेची भांडी वापरावीत.
हळदीचे डाग असले तर थोड्या वेळ कडक उन्हात वाळवून पहा. त्याने पण हळदीचे डाग जातात. बेकिंग सोडा आणि पाणी याचे मिश्रण थोडा वेळ लावून ठेवून पहा.

नाहीतर सरळ नवे डबे आण :-)


Bee
Thursday, February 08, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळे प्रयोग करुन बघण्यासारखे आहे. धन्यवाद सगळ्यांचे..

शोनू, थांब बिल तुझ्याचकडे पाठवतो :-)


Dhanashri
Thursday, March 08, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्रीचा भात खुप उरला असल्यास त्याचे छोटे छोटे संडगे घालावेत थोडे मीठ मिसळुन.
वालल्यावर तळावेत छान लागतात.


Sonalisl
Friday, November 30, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कढाईत तेलामध्ये पापड तळण्यापेक्षा पापडाला तेल लाऊन ते microwave मध्ये medium power वर गरम करवेत, ३० ते ५० सेकंदात तयार!

Prajaktad
Thursday, February 07, 2008 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाळिला patio मधे रांगोळी काढली होती..त्यातिल रंगाचे डाग कशे जातिल..

Sunidhee
Thursday, February 07, 2008 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, मी इथे रडिओवर नेहमी Tips from Queen of clean हा कार्यक्रम ऐकते. त्यात ती राणी नेहमी सांगते, Walgreens मधे Green Holy Cow क्लिनर मिळते, ते स्प्रे करून ठेवायचे आणि मग पाण्याने धुवायचे म्हणे अश्या घट्ट डागांसाठी. मी कधी वापरले नाहिये, पण तु करून पहा. घरगुती उपाय मात्र कोणापाशी आहे का पाहुया.

Prajaktad
Friday, February 08, 2008 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स सुनिधी! हौसेने दिवाळित रांगोळी काढली, दुसर्‍या दिवशीच भरमसाठ स्नो झाला..घरात असलेले सगळे क्लिनर वापरुन झालेत..आता तु सांगितलेले आणुन बघते.

Karadkar
Friday, February 08, 2008 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, अग clorox वापरुन पहिलेस का?

Savani
Friday, February 08, 2008 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, तू oxyclean वापरून बघ. माझ्याकडे गणपतीच्या वेळेस एका लहान मुलाने धक्का दिल्यामुळे हळदी- कुंकु कार्पेट वर सांडलं. तो प्रचंड मोट्ठा डाग बघुन मी फ़क्त रडायची शिल्लक राहिले होते. पण oxyclean ने सगळा डाग गेला. नक्की वापरून बघ तू.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators