|
Chafa
| |
| Thursday, July 13, 2006 - 3:46 am: |
| 
|
दिनेश, इथे अमेरिकेत मिळणारे हे फ्रोजन ग्रीन सोयाबीन्स एकदम पटकन शिजतात. १० मिनीटंही लागत नाहीत उघड्या पॅनमधे. आणि वासही येत नाही तुम्ही म्हणताय तसा. Amayach मी दिली आहे तशी भाजी मी एकदम रेग्युलर्ली करतो; माझी आवडती भाजी आहे ही.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:50 pm: |
| 
|
मी नेहमी ताजे वापरले. त्या शेंगा सोलणे पण जिकीरीचे असते. तरिही मटाराप्रमाणे वापरता येतात ते. BTW मला वाटते, सोयाबीनचे दोनतीन प्रकार आहेत. आमची माती आमची माणसं मधे दाखवायचे त्या शेंगा चार धारांच्या असायच्या. आणि केनयात आणि इजिप्तमधे त्या केसाळ असतात.
|
Amayach
| |
| Monday, July 17, 2006 - 8:16 pm: |
| 
|
चाफ़ा, तु वर लिहीलेली ऊसळ करुन पाहीली. छान झाली होती. आणी ऊरलेले दाणे मटारच्या ऐवजी वापरले. मुळीच वास येत नाही आणी हे दाणे पटकन शिजतात चाफ़ा, दिनेश तुम्हाला दोघांनाही खुप धन्यवाद.
|
Leenas
| |
| Thursday, August 03, 2006 - 6:24 am: |
| 
|
माझ्याकडे सोयाबीन चे पीठ आहे, त्याचे काय काय करता येइल?
|
Dineshvs
| |
| Friday, August 04, 2006 - 1:37 am: |
| 
|
चपातीच्या पिठात मिसळता येईल. लाडु वड्या करता येतील. डोसे, ढोकळ्याच्या पिठात, ईडलीच्या पिठात मिसळता येईल. ह्या सगळ्यात पाव पटीत हे पिठ मिसळायचे.
|
Leenas
| |
| Wednesday, August 09, 2006 - 8:06 am: |
| 
|
हमम, इडली डोश्याच्या पिठात मिसळायची आयडिया छान आहे. कणकेत घातले आहे मी.
|
Disha013
| |
| Monday, December 18, 2006 - 11:27 pm: |
| 
|
सोया granuals चे पॅटिस्: १ कप granuals , १ छोटा कांदा बारीक कापून, भात + उकड्लेला बटाटा---अर्धा कप्---एक्त्र मॅश करुन, २,३ मिरच्या,कोथिम्बिर,मीठ, हवे असल्यास आले-लसूण पेस्ट. रवा / ब्रेड क्रंब्स granuals गरम पाण्यात शिजवुन घेणे. पानी पुर्ण पिळुन काढणे. बाकिचे साहित्य mix करणे. नीट मळणे. पटिस बनवून रव्यात घोळवून shallow fry करणे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|