|
दिनेशजी तुमच्या रेसिपीप्रमाणे मेथी मलाई मटर आजच केली. खूपच छान झाली आहे. आज पर्यन्त मला ही भाजी करायला कधीही जमलं नव्हतं. धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Tuesday, September 11, 2007 - 1:27 pm: |
|
|
दिपा, आभार कसचे. उलट मलाच आनंद झाला. अगदी हॉटेलसारखी चव येते या भाजीला.
|
Swati_p
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:09 am: |
|
|
ही भाजी करुन बघायची आहे. फ़्रोझन किंवा फ़्रेश मेथी नाही माझ्याकडे तर कसुरी मेथी कशी आणी केव्हा घालायची?
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 21, 2007 - 10:27 am: |
|
|
फ़्रोझन मेथी ( थॉ वैगरे करुन ) वरीलप्रमाणेच आणि कसुरी मेथी थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवुन, वापरायची.
|
Swati_p
| |
| Thursday, November 29, 2007 - 3:35 am: |
|
|
दिनेश, तुम्ही लगेच उत्तर पाठवल्या बद्ल thanks मी कालच भाजी करुन बघितली. छानच झाली होती. मेथी, क्रीम, मटार वगैरे जमवा जमव करे पर्यन्त घरातले कांदे संपले!!! शेवटी काल योग आला भाजी करायचा. Anyways thanks once again ! मला वाटत भाजी करायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ हे मराठी टायपींग करायला लागतो मला
|
Prajaktad
| |
| Friday, December 14, 2007 - 4:19 pm: |
|
|
मला ही भाजी १७ लोकांसाठी (इतर मेनु एक कोरडी भाजि,दाल,पुलाव वैगरे आहेच)करायची आहे.कपांच्या प्रमाणात साहित्य सांगता येइल का?मटार साठी lb चे प्रमाण चालेल... मला एक शंका आहेच ... भाजीला कडसर चव येते का?पार्टी साठी करायची आहे..मी एकदा अगदी थोड्या प्रमाणात केलि होति पण, खुप दिवस झाले त्यामुळे नक्कि काही आठवत नाही आता..
|
Dineshvs
| |
| Saturday, December 15, 2007 - 3:20 am: |
|
|
दिलेले प्रमाण तीन चार जणांसाठी आहे. त्यामूळे चौपट प्रमाण १७ जणांसाठी लागेल. इतर प्रकार आहेतच. ताजी मेथी पाने न चिरता वापरली तर या भाजीला अजिबात कडु चव येत नाही. कांदे आणि दूध यामूळे कडसर चव मारली जाते. फ़्रोझन मेथी मी वापरली नाही.
|
Prajaktad
| |
| Saturday, December 15, 2007 - 11:28 am: |
|
|
दिनेशदांना धन्यवाद म्हणायचे नाही हा शिरस्ता आहे...मग,फ़र्माइश करु का? गुलमोहर वर एखादी कथा,वेगळा प्रयोग येउ द्या तुमच्याकडुन..
|
Dineshvs
| |
| Sunday, December 16, 2007 - 5:57 am: |
|
|
प्राजक्ता, या नव्या मायबोलीत मी प्रौढ निरक्षर झालोय. मला मोठे लेख लिहायला जमतच नाही. बरीच फ़ुलझाडे माझ्या पीसी वर वाट बघताहेत, आणि कथा डोक्यात.
|
Prajaktad
| |
| Sunday, December 16, 2007 - 2:27 pm: |
|
|
हो ना! नव्या मायबोलीशी काही सुर जुळत नाहीये लवकर..खरतर मायाजालात आल कि हितगुज वरच यायचे त्यामुळे नविन मायबोलिवर जायचही लक्षात येत नाही.. असो..मेथी-मलई-मटर मस्तच झाले.ऽगदी व्यवस्थित पुरले..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|