|
Sashal
| |
| Tuesday, October 07, 2003 - 6:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आंबोळ्या कशा करायच्या माहीत आहे का कोणाला?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 08, 2003 - 9:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दोन भाग तांदुळ व एक भाग उदीद डाळ धुवुन सावलीत वाळवुन एकत्र दळुन आणावी. त्यात थोड्या मेथ्या घालाव्या. थोडेसे जिरे आणि धणेही घालतात. हे सगळे दळायच्या आधीच घालावे. मग हवे तेवढे पीठ रात्री पाण्याने फ़ार पातळ नाही असे भिजवावे. सकाळी ते आंबुन सैल होते. मीठ व लागल्यास थोडे पाणी घालुन ढवळुन घ्यावे. आंबोळ्या करण्यासाठी शक्यतो जाड बीडाचा तवा घ्यावा. त्याला नारळाच्या शेंडीने तेल लावावे. त्यात हे पीठ जाडसर ओतावे. वर पोकळ झाकण ठेवावे. पीठ नीट " आले " असेल तर त्याला छान जाळी पडते. या परतुन भाजत नाहीत. काळ्या वाटाण्याच्या भाजी बरोबर खाव्यात.
|
Sashal
| |
| Wednesday, October 08, 2003 - 3:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
म्हणजे ही आंबोळ्यांची recipe बरीचशी डोश्यांसारखीच आहे अस दिसंतंय मी इथे US मध्ये आहे मला पीठ दळून घेणं शक्य नाही तेव्हा तांदळाची पिठी किंवा तान्दूळ भिजवून blender मध्ये उडदाच्या डाळीबरोबर वाटले तर किती फ़रक पडेल तसंच बीडाचा तवा माझ्याकडे नाही तेव्हा non-stick वापरून कराव्या लागतील
|
Beti
| |
| Wednesday, October 08, 2003 - 3:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फ़क्त एक addition आंबोळीला तांदूळ आंबेमोहोरच किन्वा फ़ार तर कोलम वापरावा नही तर पीठ गोड होत नाही आंबल्यावर आंबोळीत हळद आणि ठेचून लसूणही छान लागते. मला आंबोळी लसणीच्या चटणीबरोबर आवडते.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 09, 2003 - 12:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आंबोळ्या साठी तांदुळ आणि डाळ भिजवुन वाटुन घेतले तर चालते. त्यात थोड्या मेथ्या घालाव्यात. पण चवीत फ़रक पडतो. बीडाचा तवा म्हणजे सपाट, जाड काठ असलेला तवा. हल्ली तो फ़ारसा वापरात नाही.
|
Shmt
| |
| Wednesday, October 29, 2003 - 9:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी US मध्ये राहाते. माझ्याकडे इथले तान्दळाचे पीठ आहे. तान्दळाच्या आम्बोल्या कश्या करायच्या कोणी सांगु शकेल का? मी इथे एकदा केल्या होत्या पण त्या तितक्या मऊ झल्या नाहीत. आम्बोलील तडे गेले होते.
|
Rimzim
| |
| Thursday, October 30, 2003 - 4:03 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
shmt: tandalachya ambolya karatana me peeth bhijavatana thode dahi or tak ghalun bhijavate. ( 5 min pasun 1 tas paryant kitihi vel chalate). tya madhe meeth etc ghalayache. tava changala tapavun ghe. (i guess non stick aselach ) tar tyavar cooking sprey marun ghe. ( ya mule tel khup kami or nahich lagat ani ajibat chikatat or modat nahit.) ata sarsarit kelele peeth otun amboli kar. tyavar zakan thev ani gas med kar. ek baju purna koradi zali ki mag zakan kadhun ulatun ghe ata gas motha kar. agadi sahi hoatat , ajibat tutat nahit. ya madhe tu mix veg, kanda , kothimbir etc pan mix karu shakates. me try kele. chan lagate.
|
Lajo
| |
| Thursday, November 23, 2006 - 2:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आंबोळी ची अजुन एक कृती: चण्याचं पीठ (बेसन), मेथीचे थोडे दाणे, आणि थोडं तेल असं घालुन कोमट पाण्याने पीठ भिजवावे. रात्रभर झाकुन गरम जागी ठेवावे किंवा संध्याकाळी करायच्या असतील तर सकाळी भिजवुन ठेवायचे. साधारण ७-८ तास तरी भिजले पाहिजे (उन्हाळ्यात थोडा कमी वेळ चालेल). मेथी असल्यामुळे पीठ चांगले आंबते. आंबोळ्या घालण्यापुर्वी त्यात लसुण, जीरे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीचे वाटण (थोडे भरडच ठेवायचे), हळद आणि चवीपुरते मीठ घालावे. नीट कालवुन घ्यावे. पीठ फार सरसरीत नको. पण अगदी उत्तप्प्या सारखे घट्ट ही नको. सपाट तव्यावर (बीडाचा असेल तर उत्तम अथवा non-stick पण चालेल) तेल किंवा साजुक तुप घालुन आंबोळ्या घालाव्यात. या आंबोळ्या छान चुरचुरीत होतात. न्याहारीला गरम गरम खायला छान लागतात. याच्या बरोबर लसणाची चटणी किंवा मिरचीचे लोणचे आणि दही मस्त लागते. (मला तर नुसत्या साजुक तुपा बरोबर खायला आवडतात).
|
Sonchafa
| |
| Thursday, April 24, 2008 - 5:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझी आई आंबोळ्यांचे पीठ कायम दळून घेते. प्रमाण: प्रत्येकी एक वाटी चणाडाळ, उडीदडाळ, तूरडाळ, मूगडाळ. त्याच वाटीच्या मापाने १० वाट्या तांदूळ, एक वाटी (किंवा थोडी कमी) मेथीदाणे व धणे एकत्र मिळून. ह्या प्रमाणात एकत्र केलेलं धान्य दळून आणून ठेवले की कधीही झटपट आंबोळ्या करता येतात कारण दहा ते पंधरा मिनिटं पीठ भिजवून ठेवले तरी पुरते. जरुरीप्रमाणे पीठ घेऊन ते पाण्यात भिजवून घ्यावे. आधी जास्त पाणी घालू नये. मीठ, हळद, लाल तिखट चवीप्रमाणे घालावे. ह्यात ठेचलेली लसूण घालावी. नॉनस्टिक तव्यावर किंवा ऍल्युमिनियम च्या तव्यावर गरजेप्रमाणे तेल घालून तवा मिडियम तापल्यावर बाहेरून पीठ घालायला सुरुवात करून मध्यापर्यंत आंबोळी घालावी. डोश्याप्रमाणे पीठ तव्यावर मधे टाकून डावेने फ़िरवू नये. त्याने आंबोळी जाड होते आणि पीठही डावाला चिकटते. पहिली आंबोळी घातल्यावर पीठ अजून पातळ हवे असल्यास अंदाज येईल. सुरुवातीची आंबोळी लहानच घालावी.पहिली सुटायला जरी थोडा त्रास झाला तरी नंतरच्या छान सुटतील. ह्या आंबोळ्या छान कुरकुरीत तर होतातच आणि छान जाळीही पडते. लोण्याबरोबर फ़ार छान लागतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|