|
Dineshvs
| |
| Friday, August 15, 2003 - 10:59 am: |
|
|
अळुवडी अळुवडीसाठी वेगळी अळुची पाने मिळतात. त्यापैकी तीनचार पानांची एक वळकटी होते. ती पाने फ़ार जुन असू नयेत. त्याचा देठ जर जाड असेल तर तो जरा ठेचून घ्यावा. मग त्यापैकी सर्वात मोठे पान पालथे घालावे. त्यावर सारण हाताने पसरून लावावे. त्यावर दुसरे पान ठेवावे. त्यावरही सारण पसरावे. मग तिसरे पान ठेवावे त्यावर सारण पसरावे. पहिल्या पानाची देठाची बाजू आपल्याकडे असेल तर वरच्या पानाची ती बाजू अपल्यापासून लांब ठेवावी. सर्व पाने वापरुन झाल्यावए कडेने पानाच्या कडा आत दुमडुन घ्याव्यात. मग त्याची घट्ट वळकटी करावी. ही वळकटी प्रेशर कुकरमध्ये १० मिनीटे वाफ़वून घ्यावी. मग थंड झाल्यावर पातळ चकत्या करून खरपुस तळाव्या किंवा त्या जास्त तेलाची मोहरी घालुन फ़ोडणी करून, त्यात परताव्या. वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. तीन ते चार पानासाठी सारण. एक वाटी बेसन, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, आले लसुण पेस्ट दोन चमचे, तांदळाचे पीठ पाव वाटी, धणे जिरे पुड किंवा काळा मसाला १ चमचा, चवीप्रमाण तिखट आणि मीठ ( हे जरा जास्त घालावे कारण पानाला पण ते लागायला हवे. ) हिंग. जरुर पडली तर पाणी. चण्याची डाळ भिजवून वाटल्यास छान लागते. ज्याना चालते त्याने सारणात कोलंबी बारीक करून घालावी. एखादे शिराळे किंवा कांदा किसून घातले तरी चालते. वड्या न तळता नारळाच्या दुधात शिजवून पण खातात. अळुची पाने न मिळाल्यास, पालकाची मोठी पाने फ़ॉईलवर पसरून वड्या करता येतात. यावेळी पाने overlap पद्धतीने पसरावीत. देठ काढुन टाकावेत. मग फ़ॉईलच्या आधाराने वळकटी करावी. मग उकडुन तळावी.
|
ही माझ्या आईची अळु वडी recipe अळुची पानाचा मधला जाड दांडा काढुन टाकायचा, तसेच मधल्या बारिक शीरा ज्या जाडसर आहेत त्या काढुन चिंचेच्या कोळात भिजुन ठेवुन द्यायच्या. चिंचेचा कोळ यासाठी की जराशी खाज कमि होते. पाने ४-५ असतील तर मोठी वेगळी आणी लहान वेगळी ठेवायची.पानं फाटकी नसावी मधे वगैरे. २ वाटी बेसन, पाव वाटी रवाळ तांदुळाचे पीठ, चिंचेचा कोळ, गरम मसाला, हळद, थोडासं तिखट चविप्रमाणे,मीठ, वरिल सर्व पिठे, आणी मसाले, चिंचेचे रस टाकुन जाडसर पिठ करावे, साधरण जाडसर असावे. सगळ्यात मोठे पान घेवुन त्याला वरिल पिठाचा लेप द्याव,मग त्यात बसेल असे दुसरे, तिसरे आणी प्रत्येक पानात पिठाचा लेप. आधी कडेची side दुडपुन मग पसरट बाजुन हळु हळु दाबत वळी लडावी. असा एक एक लोड करुन तेल लावलेल्या भांड्यात लोड ठेवावे. मग cooker ला लावुन साधरण cooker प्रमणे पाणे डुबेल एतके चकतीवर पाणी ठेवुन भांडे(लोड असलेले) आत ठेवावे. दोन शीट्या काढुन थंड झाल्यावर लोडाच्या गोल चकत्या कराव्या. तेलात कुरकुरीत तळुन झाल्या की वरुन कोथीबिर,तिळ,मिरवी मिरची ची फोडणी द्यावी. आणी किसलेले fresh खोबरे टाकावे. try करा आणी सांग कश्या झाल्या ते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|