|
Pratika
| |
| Thursday, October 09, 2003 - 2:04 pm: |
|
|
सायोनारा, घावन घाटल्याची रेसिपी घावन : तांदूळाचे पीठ ( तांदूळ धुवून वाळवून दळून केलेले पीठ किंवा तयार तांदूळाचे पीठ ) थोडे मीठ घालून दुधात किंवा पाण्यात धिरड्यांच्या पीठाप्रमाणे सरसरीत भिजवायचे. तव्यावर तेलाचे काही थेंब घालून या पीठाची धिरडी करावी. यांनाc घावन म्हणतात. घाटले : पाणी उकळायला ठेवून त्यात चिरलेला गूळ ( पाणी : गूळाचे प्रमाण ५ : १ घ्यावे ) , दीड वाटी ओले खोबरे, थोडे मीठ पाहिजे तर थोडी वेलदोडा पूड घालणे सर्व एकत्र होवून उकळी आली की त्यात अर्धी वाटी तांदूळ पीठ एक वाटी कोमट पाण्यात कालवून घालावे. थोडे हलवून वरून थोडे तूप घालावे. ( पीठ घातल्यावर फार वेळ उकळवू नये कारण थोडे गार झाल्यावर घाटले आळते ) . घावन घाटल्यात बुडवून मस्त खायचे.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 12, 2006 - 10:21 pm: |
|
|
आम्ही घाटलं हे फक्त नारळ दूध coconut juice घालुनच करतो, बाकी सगले same तादूळाचे पिठ नाही घालत. एक वाटी नारळ दूध, वेलची गूळ, केशर गूळ जराश्या पाण्यात उकळवून त्यात वेलची,केसर, नारलाचे दूध टाकयचे. आणी मस्त लुसलुशीत घावण बुडवून खायचे.
|
Robeenhood
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:19 pm: |
|
|
mi tandul,thode2chamache udid,ch.mug 1 ch.methi dane ghalunsarv ekatra dalale tyache gtavan hotil ka sanga
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:38 pm: |
|
|
रॉबीन, तांदुळ किती घेतले ? उडदाची डाळ तांदळाच्या अर्धी हवी. पण घट्टसर भिजवुन घावण करुन बघायला हरकत नाही. समजा नाहीच जमले तर त्यात थोडे ईनो सॉल्ट घालुन ढोकळा करता येईल.
|
Robeenhood
| |
| Thursday, November 23, 2006 - 12:01 pm: |
|
|
1kilo tandul, 2Tspoon udid,1T spoon methidane,ajun advise asel tar sangshil dinesh ok thanks
|
Dineshvs
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:50 pm: |
|
|
एक किलो तांदळाला पाव ते अर्धा किलो उडीद डाळ लागेल. मेथीदाणे योग्य आहेत. पिठ भिजवताना जरा घट्टच भिजवायचे कारण आंबल्यावर ते सैल होते. जर तसे झाले नाही तर आणखी थोडा वेळ थांबावे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|