|
spring rollsche covers frozen section madhye miltat te anavet. cabbage agadi barik chirun ghyawa. carrot kisun ghyawe. sadharan 1 cup cabbagela 1/3cup carrot ghyawe. eka bhandyat chirlela cabbage,kislele carot, pandhari mire pud, 2 chamche soy sauce, chavila mith ani 2 chimti sakhar ekatra karun ghyawe. nantar packet waril instructions follow karun sring rollchya cover madhye saran bharawe. he classic receipe ahe. waril saranat agadi barikchirleli broccoli, bell pepper wagare hi ghalta yete. tasech shrimps kinva shredded chicken ghalta yete.
|
Dineshvs
| |
| Sunday, June 11, 2006 - 5:10 pm: |
|
|
घ्या स्प्रिंग रोल्स. स्प्रिंग रोल्सचे सारण करताना वर सांगितलेल्या भाज्या वापरता येतातच. ते लोक आणखी बर्याच भाज्या वापरतात. पण एकतर त्या ईथे मिळत नाहीत आणि त्यांची चवहि आपल्याला रुचणारी नसते. मला पर्याय म्हणुन. ऊकडुन कुस्करलेला सुरण, शिजवुन किंचीत मॅश केलेली पांढरी चवळी वा लाल चवळी, सोया मीन्स वैगरे सुचवावेसे वाटतात. सोया मीन्स आधी कोमट पान्यात १५ मिनिटे भिजवुन घ्यावा. मग पिळुन काढावा. तेलात आले लसुण पेस्ट परतुन किसलेला कांदा परतावा. तो सुकला कि त्यात तिखट, टोमॅटो प्युरी परतावे. मग सोया मीन्स घालुन कोरडे करावे. हे ईतर भाज्यांच्या बरोबरीने वापरता येते. आपल्या आवडीप्रमाणे सारण करावे. हे सारण एका थाळ्यात घालुन तो तिरका करुन ठेवावा, म्हणजे त्यातले अतिरिक्त तेल व पाणी निथळुन जाते. कव्हरसाठी अर्धा कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ़्लोअर आणि अर्धा कप तांदळाचे पीठ एकत्र चाळावे. त्यात थोडे तेल व मीठ घालुन घट्ट मळावे. अर्धा तास मुरु द्यावे, मग सुपारी एवढ्या गोळ्या करुन पातळ लाटावे. गोल लाटण्यापेक्षा लंबगोल लाटले तर चांगले. मग त्यावर आधी केलेले सारण पसरुन घट्ट गुंडाळी करावी. मैद्याची पेस्ट लावुन ऊघड्या बाजु दाबुन बंद कराव्यात. डीप फ़्राय करणार असाल तर रोल गोलच असावेत शॅलो फ़्राय करणार असाल तर तो रोल जरा चपटा करुन घ्यावा. व सोनेरी रंगावर तळुन काढावे. मग कागदावर निथळुन तेल निपटावे. तुकडे करुन वा तसेच आवडत्या सॉसबरोबर खावेत.
|
हे रोल तळण्याएवजी बेक केले तर फार छान लागतात आणि डाएटही होते
|
स्प्रिन्ग रोल्स कर न्यासाटी समोस पट्टी वापरली तर चालेल का
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 20, 2008 - 1:03 pm: |
|
|
हो चालेल की. फ़क्त डीप फ़्राय करायचे असेल तर मैद्याच्या पेस्टने दोन्हीकडून बंद करावे लागेल.
|
Anaani
| |
| Tuesday, May 20, 2008 - 1:37 pm: |
|
|
स्प्रिन्ग रोल्स करायचे असेल तर : best website: http://www.videojug.com/film/how-to-make-crispy-vegetable-spring-rolls
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|