|
Moodi
| |
| Friday, August 11, 2006 - 6:02 pm: |
|
|
दिनेश छान लागते बरं का हे. या तळलेल्या पानांवर शेव अन चिंच गुळाची चटणी पण घालुन खाता येते. मस्त कृती.
|
Moodi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 10:37 am: |
|
|
खेकडा भजी एका माणसाकरता... साहित्य : २ मध्यम किंवा एकच मोठ्ठा आकाराचा कांदा, तिखट,मीठ,तेल,ओवा,बेसन कृती : कांदे लांबट चिरुन(उभे चिरुन) त्याला चमचाभर मीठ लावुन ठेवावे. त्याला हळू हळू पाणी सुटेल, त्यात हवे तेवढे तिखट, अर्धा टीस्पून ओवा आणि हिंग तसेच हळद घालावी. जर तिखट नको असेल तर हिरवी मिर्ची बारीक चकत्या करुन घालावी. त्यात मावेल एवढेच( जेवढे कांद्याला पाणी सुटलेले असते त्यातच) बेसन( चणा डाळीचे पीठ) घालावे. ते एकत्र करावे. त्यात वाटल्यास मोहन घालावे किंवा चिमुटभर खायचा सोडा घालावा. एकजीव करावे आणि कढईत तेल आधी कडकडीत तापवुन मग साधारण मंद आंचेवर भजी करावीत. झणझणीत, तोंडाला पाणी आणणारी भज्जी तयार...
|
Savani
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:03 pm: |
|
|
एक टीप देऊ का? तेलाचे मोहन किन्वा सोडा घालण्याऐवजी थोडे दही घालावे त्यात. अगदी चमचाभरच. भजी छान हलकी आणि कुरकुरीत होतात. सोडा किंवा मोहनाने तेल जास्त पितात असं मला वाटतं. यात थोडे धणे जीरे बारीक करून घातले की पण छान लागतात.
|
Moodi
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:12 pm: |
|
|
चांगली आहे की गं सुचना. करुन बघायला हवे. हो सोड्याने जास्त तेल पितात भजी. धणे जिर्याची काय भाजुन भरड पूड घालायची का?
|
Savani
| |
| Wednesday, August 30, 2006 - 1:30 pm: |
|
|
मी बटाटेवड्यांमधे पण दही घालते. चांगले होतात. धणे जीरे थोडे भाजून कुटून घालते मी. बारीक पूड नाही करत. जरा जाडसरच ठेवायचे.
|
Bee
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:30 am: |
|
|
मूडी, मी करुन पाहीन ही भजी पुढल्यावेळी. धन्यवाद!
|
Milindaa
| |
| Thursday, August 31, 2006 - 10:40 am: |
|
|
मूडी, केवळ माहितीसाठी म्हणून, हीच रेसिपी इथे आहे /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=89186#POST89186
|
Deemdu
| |
| Thursday, August 31, 2006 - 10:50 am: |
|
|
भजी/ वडे करताना जे डाळीचं पिठ भिजवतो त्या मध्ये थोडं शिजवुन घोटलेल साध वरण घालयचं. मस्त चव येते आणी एकदम कुरकुरीत (तोंडाला पाणी सुटलेला चेहरा )
|
Moodi
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:06 pm: |
|
|
मिलिंदा सॉरी कृती परत टाकली म्हणून, पण आता मिंग्लिश कृतींकडे लक्षच जात नाही, पाहीजे तर उडव.( मला राग अजीबात येणार नाही कारण ही कृती वर आहेच आणि बी सोडला तर सगळ्यांनाच माहीत आहे)
|
Lalitas
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:29 pm: |
|
|
मुडी, इथे पहा खेकडा भजी फोटोसकट! /hitguj/messages/103383/104499.html?1140241996
|
Moodi
| |
| Thursday, August 31, 2006 - 2:40 pm: |
|
|
ललिताताई धन्यवाद, अहो काल रात्री लक्षात आले ते पण बीला दाखवायचे विसरले मी.
|
Bee
| |
| Friday, September 01, 2006 - 7:16 am: |
|
|
मूडी, आमच्याकडे ह्याला कांदाभजी म्हणतात. तुमच्याकडे कांदा पोहेसारखा कांदाभजी प्रकार नसतो का?
|
Moodi
| |
| Friday, September 01, 2006 - 9:42 am: |
|
|
बी आमच्याकडे याला कांदाभजीच म्हणतात. आमच्याकडे नाश्त्याचे सर्व मराठी प्रकार असतात. तू पावसाची भजी म्हणालास, पण जर मी ही भजी सांगीतली असती तर उपयोग झाला नसता, कारण तुला जे आहे त्यापेक्षा एकदम वेगळे लागते, मग कसे देणार? याला खेकडा भजी अशासाठी म्हणतात कारण याचा आकार तसा असतो. आमच्याकडे पाऊस झाला की अशीच कांदा भजी करतात. विदर्भात कोणती करतात माहीत नाही.
|
Cutepraju
| |
| Friday, September 14, 2007 - 8:10 am: |
|
|
मक्याची भजी साहित्य दोन वाट्या मक्याचे दाणे (अमेरिकन म्हनजे पिवळ्या रंगाचे असावेत) , ७-८ लसणीच्या पाकळ्या, थोडस आलं ३-४ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिम्बिर बेसन, तान्दळाच पीठ, किन्चीत सोडा, एक बटटा कीसलेला क्रुती मक्याचे दाणे प्रथम चान्गले धुवुन निथळुन घ्यायचे. ते चान्गले कोरडे ज़ाले पाहिजेत. मग ते मिक्सर मधुन फ़िरवुन घ्यायचे. एकदम पेस्ट नाही करायची. जर दाणा अख्खा राहीला असेल तर तो हाताने चेचुन घ्ययच. आल, लसुण, मिरचि, कोथिम्बिर मिक्सर मधुन व्यवस्थित वाटुन घ्यायचे. हे वाटलेले मिश्रण थोडे थोडे मक्यामधे घालयचे. म्हन्जे तिखटाचा अन्दाज घेउन घालायचे. नन्त र त्यामधे एक बटाटा किसलेला(त्याच पाणी काढुन टाकायच) चवीपुरता मीठ, बेसन, तान्दुळाच पीठ(थोडसा) घालुन एकजीव करायच. मग अगदी चिमुट्भर सोडा घालयच. मग तापलेल्या तेलामधे चमच्याने छोटी छोटी भजी घालुन लालसर रन्गावर तळायची आणि गरम गरम खायची
|
Addy
| |
| Friday, September 14, 2007 - 12:30 pm: |
|
|
हीच भजी मक्याची कणसे (कणसाचा बाहेरचा दाणे असलेला भाग) किसूनसुद्धा करता येतात. अजून एक सोप्पी कृती: मक्याची कणसे (कणसाचा बाहेरचा दाणे असलेला भाग) किसून घ्यायची. त्यात आले-मिरची पेस्ट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबिर घालायची. मग त्यात मावेल तेव्हढे बेसन घालायचे. थोडे सैलसर असले पहिजे मिश्रण. या मिश्रणाची मुग भज्यांसारखी छोटी छोटी भजी घालुन सोनेरी रंगावर तळायची. सोडा / मोहन न घलताही मस्त हलकी होतात. चटणी / टोमॅटो साॅसबरोबर छान लागतात. मिश्रण खूप वेळ आधी करून ठेवले तर पाणी सुटते. त्यामुळे तयारी आधी करुन ठेवायची पण एकत्र मात्र ऐनवेळीच करायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|