|
Dineshvs
| |
| Saturday, December 07, 2002 - 12:57 pm: |
|
|
सातकापे घावन एक कप तांदूळ पीठ घ्या. त्यात पाणी घालून दूधापेक्षा जरा जाड भिजवा. थोडे मीठ घाला. नॉन स्टीक किंवा बीडाचा तवा मध्यम आचेवर तापत ठेवा. त्यावर थोडेसे तेल घालून वरील पीठ ढवळून गोल पसरा. मग त्याच्या अर्ध्या भागावर खालील सारण पसरा. व अर्धा भाग त्यावर घडी घालून ठेवा. हा घावन तव्यातच ठेवायचा आहे. आता जी अर्धी जागा मोकळी झाली असेल त्यावरपण पीठ घाला. आणी आधी ऊलटलेले घावन त्यावर ठेवा. आता परत रीकाम्या झालेल्या अर्धगोलात पीठ पसरा. नॉन स्टीक तव्यावर हे सहज ऊलटतात, पण नाही ऊलटले तर एक कपाला एक चमचा रवा किंवा मैदा मिसळा किन्वा एक अंडे फ़ोडून फ़ेटून घाला. सारण नारळाच्या चवाचे करतात. खवणलेल्या खोबर्याचा निम्मा गूळ घेवून ते सर्व घट्ट होईपर्यंत शिजवा. ह्यात बर्फ़ी, मोतीचूराच्या लाडवाचा चूरा किंवा ईतर कूठलीही मिठाई घालता येते. गोड सारण नको असेल तर गाजराचा, कोबीचा कीस, ( शिजवून किंवा कच्चा ), फ़्लॉवरची भाजी,पावभाजी वैगरे काहीही घलता येते. अंड्याची भूर्जी पण चालेल. प्रत्येक थरात वेगवेगळे सारणही घालता येईल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|