|
Dineshvs
| |
| Sunday, December 29, 2002 - 12:05 pm: |
| 
|
कोकणात ओले काजू मिळतात. मूमबईत ते सूकवलेले मिळू शकतात. हे काजू, कजू बिया न भाजता काढलेले असतात. कदाचित घसा खवखवू शकतात. रोस्टेड काजू वापरूनही ही भाजी करता येते. तर हे ओले काजू किन्वा भाजलेले काजू कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. साले असल्यास काढून टाकावीत. फ़ोडणीत जिरे व कोथिंबीर घालावी. मग एक कांदा बारीक कापून घालावा. हवा असल्यास टोमॅटो घालावा व परतून घ्यावा. त्यात हळद, हिंग व लाल तिखट घालून जरा परतावे. व काजू घालावेत. पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्यावेत. चव बघून मीठ घालावे. रोस्टेड काजू खारट असतात हे लक्षात ठेवावे. ते शिजल्यावर, टोमॅटो घातलेला नसल्यास कोकमे घालावीत व हवे तेवढे पाणी घालावे. मग त्यात खालील मसाल्याची गोळी घालावी. थोडी खसखस व चारोळी वाटून घालावी. व ऊकळून बंद करावे. वरची कृती पाव किलो ओल्या काजूंसाठी किन्वा १०० ग्रम सूक्या काजूंसाठी. पूरवठ्यासाठी यात ऊकडलेला बटाटा घालता येतो. खालचा मसाला अनूभवसिद्ध आहे आणि बहू ऊपयोगी आहे. सहा मोठे कांदे ऊभे कापून घ्यावेत फ़ार पातळ कापायची गरज नाही. एक वाटी सूके खोबरे किसून घावे. बाकी साहित्य अर्धा चहाचा चमचा मेथी दाणे, एक चहाचा चमचा मोहरी, अर्धी वाटी धणे तीन चहाचे चमचे जिरे, तीन चहाचे चमचे बडीशेप १ चहाचा चमचा काळे मिरी २ ईन्च दालचिनी ३ लवन्गा ४ हिरव्या वेलच्या एका मसाल्याच्या वेलचीचे दाणे २ चक्री फ़ूले ( स्टार अनिस ) २ चहाचे चमचे खसखस ३ चहाचे चमचे तीळ अर्धा चमचा ओवा पाव जायफ़ळ १२ लसूण पाकळ्या १ ईन्च आल्याच्या चकत्या १ चहचा चमचा हळद १ चहाचा चमचा हिंग जाड बूडाची कढई मन्द आंचेवर तापत थेवावी व वरील मसाले क्रमाक्रमाने भाजून घावेत. मेथी दाणे बदामी रन्गावर व मोहरी पांढरी होईपर्यंत भाजावेत. जिरे, बडीशेप आणि धणे कूरकूरीत भाजावेत. एखादा दाण चावून बघावा. पूर्ण चूरायला हवा. तीळ फ़ूटायला हवेत. मेथीपासून जायफळापर्यन्त सर्व मसाले असे खमंग भाजून घावेत. हे मसाले पेपरवर पसरून ठेवावेत आणि ते थंड झाल्यावर त्याची पूड करावी. मग खोबर्याचा कीस भाजायला घ्यावा. अगदी मन्द आचेवर खोबरे तपकीरी रंगावर परतावे. ते थंड करत ठेवावे. मग कांदा परतायला घ्यावा. ह्यावेळी मात्र तेल घालावे लागेल. हा कांदा परतायला बराच वेळ लागतो. तपकीरी रंगावर येईस्तोवर परतत रहावे, पण कर्पवू देवू नये. कान्द परतण्यावरच या मसाल्याची चव अवलम्बून आहे. कांदा कापून जर ऊन्हात सूकवून घेतला तर वेळ वाचतो. तसे शक्य असेल तर अवश्य करावे. मनासारखा कान्दा परतल्यावर शेवटी त्यात हळद व हिंग घालून गस बंद करावा. मग खोबरे वाटून घ्यावे. त्याला बरेच तेल सूटेल. ते काढून कान्दा, आले व लसूण वाटावे ( आले व लसूण कच्चेच घ्यायचे आहे ). कान्दा वाटायला जरा त्रास होतो म्हणून त्यात थोडे तेल किन्वा व्हीनीगर घालावे मग सगळे एकत्र करावे व नीट मिसळून घावे. मिश्रण तपकीरी दिसायला हवे. पांढरट दिसल्यास कान्दा खोबरे नीट भाजले गेले नाही असे समजावे. या मिश्रणाचे लिंबाएवढे घट्ट गोळे करून घट्ट झाकणाच्या डब्यात घालून फ़्रीझरमधे ठेवावे. या प्रमाणात १२ ते १४ गोळे होतात. ४ ते ६ जणांच्या पदार्थाला यातला एक गोळा पूरतो. हा गोळा अगदी शेवटी नीट फ़ोडून घालावा. लाल मिरची पूड वेगळी घालावी. हाच मसाला वापरून, बटाटा, ऊकडलेली अंडी, डबल बीन्स, बटर बीन्स, पांढरी चवळी, मसूर, वांगी काळे वाटाणे, चिकन व मटण देखील करता येते. कृती साधारण वरील्प्रमाणेच. सर्व प्रकार आधी शिजवून घावेत. चिकन व मटणाला आधी आले लसूण लावून परतून घ्यावे. हा मसाला तिखट नसतो. आवडीप्रमाणे आयत्यावेळी लाल तिखट घालावे. आणखी झणझणीत हवे असल्यास, मिरी व लवन्गा दुप्पट घ्याव्यात. चमचाभर नाकेश्वर घालावे. ( लवंगेसारखेच असते ). मटण, काळा वाटाणा साठी, कांदा असा न तळता विस्तवावर भाजावा. वरचे साल जळून गेले तरी आतून रस यायचे बंद होईपरयन्त भाजावा. मग त्या जळक्या सालासकट वाटावा. खोबर्याच्या वाटीचे देखील तूकडे करून ते जाळावेत. मग़ त्याचे काप करून वाटणात घ्यावेत. याप्रकारे एक वेगळा स्वाद येतो. आवडीप्रमाणे आम्बटपणासाठी कोकम किंवा टोमटो घालावेत.
|
Malavika
| |
| Wednesday, October 25, 2006 - 7:12 pm: |
| 
|
मसाल्याची कृती एकदम झकास! एक शंका आहे. तुम्ही लिहीलय की कांदा उन्हात सुकवला तरी चालेल म्हणून. त्याऐवजी ओव्हन मधे २००-२५० वर भजला तर चालेल का?
|
Dineshvs
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:42 am: |
| 
|
ओव्हनपेक्षा साध्या कढईत परतला तरी चालेल, पण तो भाजताना घाई न करता, व्यवस्थित परतला पाहिजे. ओव्हनमधे भाजला तर ओव्हनला वास येतो. तो चालत असेल, तर अवश्य भाजावा.
|
Manuswini
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:50 am: |
| 
|
आम्ही ह्याला 'वाटण' म्हणतो. ते कायम असते वाटून ठेवून पुर्वी पाट्यावर रोज fresh वाटले जायचे. आई चक्क सकाळी सकाळी hospital office ला जाण्याच्या आधी पुर्वी पाट्यावर वाटायची mixie असून सुद्धा. वेगळी चव लागते कांदा जर अक्खा भाजला असेल तर......... कांदा असाच gas भाजून वाटला जायचा. सगळ्याला उपयोगी पडते. खेकड्ताचा रस्सा,मटण ते तिखट कोंबडी, काळी वाटणा उसळ सगळे सगळे all purpose
|
Hems
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:49 pm: |
| 
|
दिनेश ओल्या काजूची ही उसळ केवळ भन्नाट लागते ! वेंगुर्ला - सावंतवाडी भागात काजूच्या सीझन मध्ये हाॅटेलातही मिळते. पण आमच्या घरी मात्र मसाल्यात जायफळ आणि हळद घालत नाही आई. इथे ओले काजू मिळत नाहीत म्हणून सुके काजू भिजवून ही उसळ करून दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न केला मी. पण हा मसाला खरच all purpose आहे.. मनू म्हणते तेही खरं , पाट्यावर वाटला की वेगळीच चव येते !
|
Vrushs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 1:58 pm: |
| 
|
दिनेशदा,सुके काजू साधारण किती वेळ भिजत टाकायचे?
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:14 pm: |
| 
|
काजु दोन तीन तासात भिजतात. जास्त वेळ लागत नाही. जर सुकवलेलेच वापरायचे असतील तर रोस्टेड मिळतात ते घ्यावे, त्याने वेगळा खमंगपणा येतो. त्याला खुपदा मीठ लावलेले असते, ते लक्षात ठेवावे.
|
Vrushs
| |
| Wednesday, October 03, 2007 - 8:30 pm: |
| 
|
धन्स दिनेशदा. तुम्ही नेहमीच हवी तेव्हा मदत करतात. उसळ कशी झाली ते सांगते उद्या.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|