|
saaih%ya dÜna vaaT\yaa vaÜlyaa ma@yaacyaa kNaIsaacao daNao. baosanaacao pIz vaaTIBar. vaaTIBar kaMVacaI pat. vaaTIBar laaMba icarlaolaa kaMda. tumacyaa AavaDI p`maaNao fÜDnaIcao saaih%ya. iTp ma@yaacao kNaIsa jar far jaaD Asaola tr to kIsaUna pNa TakU Xakta. ÌtI naohmaI p`maanao fÜDnaI tyaar krvaI. %yaamaQao ima@sar maQauna kaZlaolaa ma@yaacyaa daNyaaMcaa gaÜLa Takavaa. naMtr AQaa- tasa maMd AacaovartI iXajat zovaa. sava- paNaI AaTvaayacaa p`ya%na kra. naMtr maga hLu ÁALu baosanaacao pIz Gaalaa. lagaoca kaMQaacaI pat pNa Gaalaa. Aaina JauNaka saarKa var Kila ZvaLa. Aaca maMdca rahu Va. h JauNaka Ôar pÜistk Aaho. AaiNa cavaIlaa pNa Kup Cana Aaho. Qanyavaad² baaL yaXa ´
|
Kiroo
| |
| Monday, August 18, 2003 - 6:09 pm: |
|
|
साहित्य: १ मोठा कांदा १ मिरची २ कोकमं २ वाट्या बेसन ३ वाट्या पाणी चवीपूरते मीठ फ़ोडणीचे साहित्य: ३ टेबल स्पून तेल, अर्धा चमचा मोहरी,हिंग,हळद कृती: एका कढईत फ़ोडणी करवी.मोहरी तडतडायला लागली की चिरलेली मिरचि आणि कांदा घालावा.कांदा थोडा मऊ झाला कि त्यात बेसन घालावे.बेसनाचा खमंग वास आला कि त्यात ३ वाट्या पाणी आणि मिठ घालावे आणि त्यात २ कोकमं घालवीत. नीट ढवळून झाकण ठेवावे.वाफ़ येवू द्यावि.मधे मधे ढवळावे गरम गरम पोळी किंवा भाकरी बरोबर वाढावे. .बेसनाच्या गाठी होता कामा नये. .वरून आवडत असल्यास कोथिंबीर आणि खोबरं घालावे. .कढई शक्यतो लोखंडी वापरावी म्हणजे झूणका खमंग होतो.
|
Anjuminu
| |
| Wednesday, August 20, 2003 - 11:17 pm: |
|
|
आले लसुण घालतात का झुणक्यामध्ये
|
Sami
| |
| Thursday, August 21, 2003 - 2:32 am: |
|
|
लसूण ठेचून फोडणीत घातली तर छान लागते.
|
Bee
| |
| Wednesday, August 17, 2005 - 6:43 am: |
|
|
इथे कुणाला पिठले आणि झुणका ह्यात काय फ़रक आहे हे माहिती आहे का? मला वाटतं झुणका हा जरा कोरडा असतो आणि कांदे किंवा पात घातल्यामुळे सुटा होतो. पिठले हे घट्ट पातळ कसेही असू शकते. मला झुणक्याची दमदार कृती हवी आहे . वीसेक लोकांसाठी जर झुणका करायचा असेल तर वाटीनुसार प्रमाण काय असेल?
|
बी, अरे झुणका आणि पिठल्याचे हवे तेव्हढे प्रकार करता येतात. मी झुणका असा करते, तुला हवा तसा बदल केलास तरी चालेल. हा अंदाज ४ माणसांचा आहे : २ मोठे कांदे २ वाटी (अंदाजे) चणा पीठ मीठ, लाल मिर्ची, हळद फ़ोडणी च साहित्य कांदा बारिक चिरुन त्याला हळद मीठ मिर्ची लावुन ठेवावा. पीठ चाळुन घ्याव. (ह्यात नुस्त्या चणा पिठा ऐवजी चणा पिठात बाजरी, गहू, तांदुळ, शिंगाडा, नाचणी वगरे पिठं सुधा मिसळतात. मी मात्र तस करत नाही. क्वचित गहू नाहितर तांदुळ पीठ घालते). पातेल्यात फ़ोडणी करून त्यात कांदा घालावा. (फ़ोडणी ला तेल थोड जास्तं लागतं). कांद्याला पाणी सुटल (किव्हा अर्धवट पांढरा झाला) की त्यात पीठ घालावं. परतून गस बारिक करावा. पीठ जळत नाही ना, हे लक्ष ठेवुन पीठ आणि कांदा शिजे पर्यंत गस मंदच ठेवावा. शेवटी लिंबू रस आणि थोडी कोथिंबिर (हवी असल्यास) घालायला हरकत नाही. चु. भू. द्या. घ्या.
|
Karadkar
| |
| Wednesday, August 17, 2005 - 4:35 pm: |
|
|
Bee you are mhaNing right!! ipzlao patL Asato AaiNa JauNaka kÜrDa AsatÜ.
|
Seema_
| |
| Wednesday, August 17, 2005 - 5:13 pm: |
|
|
AamacyaakDo JauNaka Asaa krtat tolaat maÜhrI jaIro AaiNa ihngaacaI ÔÜDNaI krayacaI . %yaat lasauna AaiNa kiDp<aa Gaalaayacaa . qaÜDsa
prtuna %yaat paNaI ( maaJyaa GarI duQa Gaalatat ) Gaalaava va ek ]kLI AaNaayacaI . laala itKT ( masaalyaaca navho tr Ô> laala imacaI- powder ) maIz Gaalavao. Aata hLU hLU %yaat baosana pIz Gaalat jaavao . baarIk sauk KÜbar Gaalaava . saaQaarna Ga+
hÜt Aala kI JaakNa zovauna vaaÔ AaNaavaI . tyaar Jaalyaavar hatanaoca qaÜDo kuskravao AanaI eksaarKo kravao
. kÜqaImbaIr GaalaavaI . Aamacyaa kDo gaarvyaat hoca pIzla dotat . BaakrI ikMvaa dXamaI Ê maugaacaI ikMvaa turIcaI ]saL ÊBarla
vaaMga ÊpaMZraXauBa` vaaGaraÊ AaMbyaaca maurlaola laÜNaca ÊXaoMgadaNyaacaI ikMvaa tILacaI caTNaI Ê XaoMgadaNyaacyaaÊsaaMjaacyaa
ikMvaa Kvyaacyaa pÜL\yaa vaOgaro dotat yaa barÜbar
|
Lalu
| |
| Wednesday, August 17, 2005 - 5:44 pm: |
|
|
झुणका!! नावावरुनच झणझणीत पदार्थ असावा असं वाटतं. ही अजून एक कृती - साहित्य : बेसन (साधारण दीड वाटी लागेल) १ मोठा लाल कान्दा उभा, पातळ चिरुन. नेहमी बारीक चौकोनी चिरतो तसा चिरायचा नाही. ४,५ पाने कडीपत्ता थोडी कोथिंबीर मीठ, मोहरी, हिन्ग, जिरे,हळद, तेल. आणि कोहापुरी कान्दा लसूण चटणी (१ मोठा चमचा) हा मसाला नसेल तर - ४,५ लसूण पाकळ्या १ इन्च आले १ चमचा गरम मसाला. १ मोठा चमचा लाल तिखट एका पसरट भांड्यात किंवा पन मधे २ मोठे चमचे तेल घालावे. त्यात हिन्ग, मोहरी, जिर्याची फोडणी करावी. मग कान्दा, कडीपत्ता आणि हळद घालून कान्दा थोडा परतून घ्यावा. मग त्यात कोल्हापुरी मसाला किन्वा नसल्यास त्याऐवजी दिलेले पदार्थ घालावेत. (आले लसणाची गोळी वाटून घालावी) मसाला परतून त्यात अन्दाजाने मीठ घालावे, (कोल्हापुरी चटणीत मीठ असते हे लक्षात ठेवावे, त्याप्रमाणे मीठाचे प्रमाण ठरवावे.) मीठाचे थोडे पाणी सुटेल, पुन्हा त्यावर पळीवर चिकटलेला मसाला निघून जाईल इतके पाणी फ़क्त पळीवरून घालावे. (पळी खोलगट नको, कालथा बरा त्यापेक्षा) २ मिनिटे झाकून पाणी उकळू द्यावे मग चमच्याने हळूहळू पीठ घालावे. ते घालताना पसरून घालवे. जरा कोरडे होत आले की थाम्बावे आणि झाकण ठेवून एक वाफ आणावे. यावेळी आच कमी करवी नाहीतर खाली लागेल (ती खरपुडी पण मस्त लागते.) पुन्हा झाकण काढून कालथ्याने झुणका मोकळा करुन घ्यावा. वरुन कोथिंबीर घालावी. ३,४ जणाना पुरेल एवढा होतो. (बी आता तुझे तू पुढचे गणित कर!)
|
Rimzim
| |
| Wednesday, August 17, 2005 - 9:28 pm: |
|
|
me zunaka karatana tyat panya (water) sobat thode tak (butter milk) pan ghalate. chan lagate chav. korade pithale ( khobare jast ghalun) kase karayache?
|
Dineshvs
| |
| Saturday, August 20, 2005 - 12:36 am: |
|
|
कोरड्या पिठल्यात खोबरे जास्त घालायची गरज नाही. मंद आचेवर परतत कोरडे केले कि झाले. मागे नेवाश्याच्या बाजारात स्वस्त मिळाले म्हणुन हरबरे घेतले होते. त्यावर केलेला प्रयोग म्हणजे ते भिजत घालुन भरड वाटले व त्याचा झुणका केला. लवकर मोकळा होतो. (नुसत्या बेसनाचा बराच वेळ परतावा लागतो.) काबुली चण्यावर देखील असा प्रयोग करता येईल.
|
Tanya
| |
| Friday, October 14, 2005 - 3:41 am: |
|
|
लालु... काल तुझ्या पद्धतीचा झुणका करुन पाहिला. एकदम सही झाला होता. नवर्याने पहिल्यांदा विचारले की झुणका म्हणतेस तर असा लाल रंग कसा? (झुणका हा फक्त पिवळ्य रंगाच असतो हेच आम्हाला ठाउक ना!) पण खाल्ल्यानंतर तोंड गप्प. खरच thanks!
|
Bee
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:31 am: |
|
|
टोमॅटो झुणका - पाच लाल टोमॅटो चिरून घ्या. सोबत एक कांदा, लसून, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची कापून घ्या. सर्वात आधी, नेहमीप्रमाणी भरपूर मोहरी घालून फ़ोडणी करा. फ़ोडणी करताना जर olive oil घेतले असेल तर basil leaves टाकायला हरकत नाही. त्यानी छान italian flavour येईल. तर ह्या फ़ोडणीत आधी कांदा नीट होउ द्या. कांदा लालसर झाला की टोमॅटो घाला. नंतर एकीकडे वाटीभर बेसन भाजून घ्या. जसे टोमंcटो शिजून त्याची चटणी तयार झाली की त्यात बेसन घाला. आता आच एकदम मंद करा. कारण जर आच जास्त असली तर लगेच एकतर बेसन जळेल. किंवा तळातील बेसन लगेच टोमॅटोमधले पाणी शोषून घेईन. त्यामुळे वरचे पीठ कोरडेच राहू शकते. म्हणून लगेच आच कमी करायची. किंवा बंद करून घ्यावी. मग ती चटणी आणि पीठ एकजीव करावी. नंतर परत मंद आचेवर झाकण ठेवून झुणका होऊ द्यावा. जितकी आच मंद आणि पातेले आचेवर राहू शकेल तितका छान झुणका होईल.. अगदी सुटासुटा आणि खमंग. ह्यात लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल. पण लवंगी मिरची नसेल तर इतर कुठलीही मिरची पावडर वापरणेच बरे होईल. शेवटी कोथिंबीर घातली की झुणका तयार. वाढण्या अगोदर जर हा झुणाका एक दाहा एक मिनिटे झाकण घालून तसाच राहू दिला तर छान चव मुरते असा माझा नेहमीचा अनुभव आहे. मी आठवड्यातून एकदा तरी हा झुणका करतो. वर दोन भाकरी आणि कैरीच लोणच.
|
Supermom
| |
| Thursday, June 22, 2006 - 11:34 am: |
|
|
बी, नागपूरकडे लाल टोमटो आणि हिरवागार पातीचा कांदा एकत्र करून त्यांचा झुणका करतात. मस्तच लागतो.
|
Amayach
| |
| Thursday, June 22, 2006 - 1:49 pm: |
|
|
सुपरमॉम, रेसिपी टाक ना ग. मी नागपुरचीच पण मला माहिती नाहि. ट्राय करायला नक्कीच आवडेल.
|
Supermom
| |
| Thursday, June 22, 2006 - 3:48 pm: |
|
|
अमया,रेसिपी अशी खास नाही ग,फ़क्त नुसत्या पातीच्या कांद्याऐवजी त्यात दोन तीन टोमटो चिरून टाकायचे.खूप छान लागते किंचित आंबट चव. बाकी आपली नेहेमीचीच झुणक्याची पद्धत. तू धंतोलीची का ग?
|
Amayach
| |
| Thursday, June 22, 2006 - 6:05 pm: |
|
|
सुपेरमॉम धन्यवाद. करुन पहाते लवकरच आणि कळवते तुला. हो ग मी तिथलीच.
|
Supermom
| |
| Thursday, June 22, 2006 - 10:04 pm: |
|
|
अमया, मी पण तिथलीच. म्हणूनच विचारले. .
|
Prady
| |
| Tuesday, July 17, 2007 - 3:02 pm: |
|
|
कोबीचा झुणका कसा करायचा सांगेल का कुणी?
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:19 pm: |
|
|
कोबीच्या झुणक्यासाठी कोबीचा मधला भाग किसुन घ्यावा. तेलाची हिंग मोहरीची फोडणी करुन त्यावर बारिक कापलेला कांदा ठेचलेला लसुण परतुन त्यावर किस परतावा. ( कांदा नाही घातला तरी चालेल ) मग झाकण ठेवुन किस शिजु द्यावा. मीठ घालावे. हळद व तिखट घालुन कोरडे बेसन पेरावे. व परतुन मोकळा करावा. किसाला पाणी सुटले नसेल तर थोडे घालावे लागेल. असाच अलकोलचा करावा. तो जास्त चविष्ट लागतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|