Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Brussels Sprouts, Broccoli, Asparagus...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » Brussels Sprouts, Broccoli, Asparagus etc. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 21, 200624 03-21-06  6:23 pm

Garva
Monday, April 03, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni celery chya vegdya recepies saangal ka pls ?? apart from cream of celery soup....


Bee
Monday, April 10, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे ब्रोकोलीच्या वेगळ्या कृती वाचयला मिळाल्यात पण मला कधीच ब्रोकोलीचा उग्र वास आला नाही. मी काल दोन्ही वेळा ब्रोकोलीचीच भाजी केली होती. पण उग्र वास जाणवला नाही.

अश्विनी म्हणते त्याप्रमाणे ब्रोकोलीची भाजी फ़्लावर प्रमाणे करता येते. मी तर सुरवातीला ब्रोकोली जेंव्हा पाहिली तेंव्हा वाटले होते हा हिरवा फ़्लावर आहे. नंतर कळले तो वेगळा प्रकार आहे भाज्यांमधला.

मला असे वाटते आहे की पिठ पेरुण ब्रोकोली होऊ शकेल.

हा Asparagus म्हणजे मराठीत ह्याचे नाव काय? मी असे वाचले आहे की आयुर्वेदातही Asparagus चा उल्लेख केलेला आहे. मी असे ऐकले आहे की शतावरी म्हणजेच Asparagus , कुणी खुलासा करेल का?

ब्रोकोलीचा उच्चार कसा आहे? मात्रा काढून चंद्रकोर द्यावी का?


Charu_ag
Tuesday, April 11, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मी ब्रोकोलीचे क्लीअर सूप करते आणि शिजलेल्या(सूप केल्यानंतर उरलेल्या) भाजीचे पराठे. कृती असेल बघ सूप विभागत, नसेल तर लिहीते नंतर.

पराठे करण्यासाठी ही शिजलेली भाजी डाळीचे पिठ लावुन तिखट मीठ घालुन परतते आणि सारण एकजीव करुन घेते. बाकी कृती नेहमीच्या आलू पराठ्यासारखीच. किंवा या भाजीतच कणीक मळुन देखिल पराठे करता येतात.


Bee
Tuesday, April 11, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह छानच की चारू. पण मला ब्रोकोलीचा जराही वास का नाही येत. मागे केसरचा वास येत नाही हे मी लिहिले होते. खरच मला उग्र तर सोडाच परंतू अगदी हलकासा देखील ह्या भाजीचा गंध येत नाही. बहुतेक सी फ़ूड चा न सोसवणारा वास टाळण्यासाठी मी नाक दाबून धरतो त्यामुळे माझी नासिका मृत झाली असावी :-)

Sunidhee
Wednesday, April 12, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च नि वर सुरुवातिला एक ब्रोकोलिचि कोशिम्बिर लिहिली आहे. ती मस्तच लागते...

Garva
Thursday, April 13, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kamaalch aahe....konala hi celery chya vegdya receipe yet nahi ka ???

Dineshvs
Friday, April 14, 2006 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गारवा, ईथे बघितलच नव्हतं
काहि आयडियाज.
सेलरी, झाकण ठेवुन ऊकळत्या पाण्यात मीठ घालुन साधारण दहा मिनिटे शिजवावी लागते.
१. एका पॅनमधे लोणी वितळुन घ्या. त्यात तुकडे करुन ऊकडुन घेतलेली सेलरी घाला. वरुन थोडी मिरपुड व कापलेली पार्सली पेरा.

२. वरीलप्रमाणे ऊकडुन घेतलेली सेलरी, गाजराचे तुकडे ( हवे तर ऊकडुन ) अवाकाडोचे तुकडे बोलमधे एकत्र करुन, त्यावर फ़्रेंच सलाद ड्रेसींग ओतावे.
३. एका बोलमधे साखर, सलाड ऑईल, व्हीनीगर, बारिक चिरलेला कांदा, मीठ व लाल तिखट एकत्र करावे, व त्यात सेलरीचे ऊकडलेले तुकडे घालावेत.

शिवाय कच्ची सेलरी, बर्फाच्या पाण्यात घालुन डिप बरोबर देता येते. आता ४ दिवसानी परत आलो कि आणखी लिहिन.



Garva
Monday, April 17, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dhanyavad...dinesh. tumhi 4 divasanni aalat ki definetly ajun idea's dya. shivay, turnip green chi palaka sarkhi bhaji karta yeil ka ? he dekhil saanga !
me tashi... hitguj ver navin nahi, pan interaction suru kele navhte...thanks for responding, tumchya khup recipes vachalya aahet.....recipe section madhe...

Bhagya
Monday, April 17, 2006 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गारवा, ही घ्या माझी आवडती सेलेरी रेसिपी.

सेलेरी चे stalks स्वच्छ धुवून घ्या. ४-५ इन्च लांब तुकडे करा.
उकडलेले बटाटे मॅश करा, त्यात बारिक चिरलेला कान्दा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ घाला. हवे तर कोथिंबीर पण.
हे मिश्रण त्या stalks च्या पोकळ भागात भरा. वरून किसलेले चीज भुरभुरा. हे चीज वितळेपर्यन्त, किंवा तुम्हाला आवडतिल तितपत ग्रिल करा. हव्या त्या चटणी वा डिप बरोबर खा. पार्टीत starters म्हणुन पण ठेवता येण्यासारखी ही डिश आहे.

ह्यात बरीच वेगवेगळी मिश्रणे भरता येतात.
सेलेरी चा रस नुसता प्यायला पण छान लागतो.
सेलेरि सलाद आणि stif fry मध्ये पण छान लागते.

दिनेशदा अजून लिहितिलच.


Bhagya
Monday, April 17, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता तु नागपूरची? आणी FLA ला राहतेस? क्या बात है! दोन्ही जागांशी माझ्या इतक्या आठवणी निगडित आहेत... मजा येईल तुझ्याशी बोलायला.

Zelam
Tuesday, April 18, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी asparagus म्हणजेच शतावरी.

Garva
Tuesday, April 18, 2006 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi bhagyashree, thankyou. me weekend la nakki try kanar aahe hi recipe...yummy vatat aahe ! tu pan nagpur chi ka g?
mag ter kharach, it would be fun to interact more...majha id aahe
smita.fulzele@gmail.com
mail tak vade midel tevha..n contact no. pan de...

Dineshvs
Tuesday, April 18, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेलरी आणि बदाम.

सेलरीचे अर्धा ईंच लांबीचे तुकडे करा. त्यावर दोन कप ऊकळते पाणी घाला व त्यातच सेलरीचे तुरे घाला. मीठ घालुन दहा बारा मिनिटे ऊकडुन घ्या. तुरे काढुन टाका व पाणी बाजुला काढा.
एक दांडी घेतली असेल तर दोन तीन चमचे बटर तापवा, त्यात तीन चमचे ऑल पर्पज फ़्लोअर घाला. चवीप्रमाणे मीठ व मिरपुड घाला. सव्वा कप दुध आणि सेलरी ऊकडलेल्या पाण्यापैकी अर्धा कप पाणी घाला. गुठळ्या होवु न देता शिजवा. त्यात सेलरीचे तुकडे आणि तीन चमचे बदामाच्या तुकड्यांपैकी अर्धे मिसळा. एक कॅसरोल मधे काढुन वर ऊरलेले बदाम पसरा. पाव कप ब्रेडचा चुरा, थोड्या लोण्यात परतुन तो वर भुरभुरुन घ्या. ३५० डिग्रीवर २० ते २५ मिनिटे बेक करा.

यात स्वीट कॉर्न, स्वीट पोटॅटो, लाल भोपळा वैगरे घालता येईल.


Garva
Tuesday, April 18, 2006 - 8:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow..khup innovative idea aahe...majhya karita tari..'celerymay' weekend hoil majha..karan baryach recipe try karta yetil....thanks again dinesh.

Bhagya
Sunday, April 23, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मिता तुला मेल केली आहे.

Dineshvs
Sunday, April 23, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या सुप राहिलच कि

एका सॉसपॅनमधे दीड कप सेलरीचे तुकडे, एक लहानसा कांदा कापुन एकत्र करावा त्यात अर्धा चमचा मीठ घालावे, त्यात एक कप पाणी घालुन झाकण टएवुन साधारण १५ मिनिटे शिजवावे. त्यात अडीज कप दुध घालावे. आणखी अर्ध्या कप दुधात, दोन तीन चमचे कॉर्नफ़्लोअर, मिरी पावडर एकत्र करावी, त्यात थोडे मीठ घालुन सगळे एकत्र करावे. ते सगळे दाट होईस्तो शिजवावे, बुडबुडे यायला लागले कि बंद करावे वरुन बटर घालावे.


Garva
Monday, April 24, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dinesh, ya soup la galayche, mhanje strain nahi ka karayche? aani ho, me he hi vicharle hote ki turnip green chi bhaji...palak bhaji sarkhi karu shakto ka?

Dineshvs
Tuesday, April 25, 2006 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि हे सुप गाळुन नाहि घ्यायचे. पांढर्‍या रंगात हिरवे तुकडे छान दिसतात.
Turnip जरा ऊग्र वाटेल, आपल्या चवीला.


Saj
Thursday, September 20, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi kal ratri archne sangitalya pramane brocolichi koshimbir keli hoti, ekdam chan zali hoti. fakt mi barik chirleli brocoli 1 minute microwave madhe vafvun ghetali karan agadi kachchi kashi lagel yabaddal thodi shanka hoti.
pan ekdam chan.
thanks arch

Vishee
Friday, September 21, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्रोकोली, अस्परगस (कसं लिहितात?) मी असं पण करते.
तुकडे करुन पाण्यात थोडावेळ उकळायचं किंचीत शिजेपर्यंत. मग पाणि ओतुन टाका. तुकडे एका डिश मधे ठेवुन त्यावर चिज किसुन घाला ( mozarella ). त्यावर मिरपुड, मिठ भुरभुरायचं आणि oven मधे चिज पिघळेपर्यंत ठेवा........सॉरी हा प्रकार भारतीय नाही पण असा पटकन होतो आणि चांगला लागतो.
एक पटकन होइल असा भारतीय प्रकार म्हणजे पराठे. पाण्यात मऊ शिजवुन घेणे. मग smash करुन कणिक आणि पराठ्याचं बाकिचं साहित्य मिसळुन पराठे करणं.


Wel123
Sunday, November 04, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brocolli pakora
brocolli che chote chote tukade karun tyat limbacha ras takawa ani lasun paste takawi thodawel tasech thewane sadharan 15min,nantar besan madhe mith,tikhat,halad,thoda soda,ani pani takun chan batter banawawe ani brocolli tyat deep karun telat talun ghawe.khup chan lagtat.

Prr
Thursday, August 21, 2008 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


http://www.loksatta.com/daily/20080726/ch02.htm
... ..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators