|
Shonoo
| |
| Friday, July 28, 2006 - 3:27 pm: |
| 
|
बुधवारी न्यू यॉर्क टाईम्स मधे मार्क बिटमन ने छान लेख लिहिला आहे टाको बद्दल. ही त्याची लिन्क http://www.nytimes.com/2006/07/26/dining/26mini.html
|
Dineshvs
| |
| Monday, December 18, 2006 - 3:57 pm: |
| 
|
Bean & Corn Burritos चार ते पाच स्वीट कॉर्नची कणसे घेऊन, ती गॅसवर किंवा निखार्यावर भाजुन घ्यावीत. दाणे काळे होवु देऊ नयेत. मनासारखी भाजुन झाली कि धारदार सुरीने दाणे वरच्यावर कापुन घ्यावेत. फ़्रोझन कॉर्न वापरायचे असतील तर तोड्या तेलात ते सोनेरी रंगावर परतुन घ्यावेत, त्यातले थोडे मिक्सरमधुन काढावेत. व बाकिचे तसेच ठेवावेत. आठ दहा लसुण पाकळ्या बारिक कापुन घ्याव्यात. दोन सिमला मिरच्या बारिक चिरुन घ्याव्यात. एक मध्यम कांदा बारिक चिरुन घ्यावा. थोडे तेल तापवुन त्यात लसुण व कांदा परतुन घ्यावा. त्यात बारिक चिरलेली सिमला मिरची घालावी. ती शिजली कि त्यात आवडीप्रमाणे, मीठ, मिरपुड घालावी, हवे तर थोडी धणेजिरे पुड घालावी. अर्धा टिन बेक्ड बीन्स घालावेत. त्या बीनच्या जागी शिजवलेला राजमाहि घालता येईल. सगळे एकजीव झाले कि त्यात बारिक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडा लिंबुरस घालावा. वर लिहिल्याप्रमाणे टॉर्टिला करुन घ्याव्यात. किंवा त्या तयार घ्याव्यात व थोड्या शेकुन घ्याव्यात. म्हणजे त्या मऊ पडतात. त्याच्या मधोमध वरील सारण ठेवुन त्यावर थोडे किसलेले शेडार चीज घालावे, व घट्ट गुंडाळी करावी. खायच्या पुर्वी, ते मायक्रोवेव्ह मधे गरम करावे किंवा तव्यात थोडे तेल घालुन सोनेरी रंगावर परतुन घ्यावे. टोमॅटो साल्सा व थोडे sour cream सोबत घ्यावे.
|
Bage
| |
| Monday, December 18, 2006 - 9:19 pm: |
| 
|
thanks Dinesh मी try करते आणि सान्गते कसे झाले ते
|
Bage
| |
| Sunday, December 24, 2006 - 7:45 am: |
| 
|
thanks Dinesh आज मी केले होते बरीटोज excellent झालेत
|
मला कोणीपण बरिटोज करुन देत नही. खुप अवडत असले तरी सुद्धा. Bage, your family must be having a great time. touchwood.
|
Savani
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:44 pm: |
| 
|
प्रज्ञा, तुझ्या रेसिपीने सालसा केला. जबरी झाला आहे. too good पण मला ह्यात जरा मदत हवी आहे. तो प्रमाणाबहेर तिखट झालाय. आणि करून ३ दिवस झालेत तरी तिखटपणा कमी झालेला नाही. तर मला प्लीज कोणीतरी उपाय सांगा की त्याचा तिखटपणा कशाने कमी करता येईल.
|
Prady
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:56 pm: |
| 
|
फ्रीजमधे ठेवूनही तिखटपणा कमी नसेल झाला तर पुढच्या वेळी मिरची कमी वापरणे हाच उपाय. सगळ्यात तिखट म्हणजे habenero peppers . पुढच्या वेळी माईल्ड पेपर वापरून बघ.
|
Savani
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:08 pm: |
| 
|
पुढच्यावेळी नक्कीच कमी करीन ग. पण आत्ता काय करता येईल. थोडा टोमॅटो सॉस घालू का परत? बरणीभर झालाय. वाया नको जायला म्हणुन वाटतयं.
|
Prady
| |
| Thursday, February 01, 2007 - 3:12 pm: |
| 
|
मला वाटतं टोमॅटो घाल थोडे अजून.
|
Dineshvs
| |
| Friday, February 02, 2007 - 5:20 am: |
| 
|
savani काहि मिरच्या प्रमाणाबाहेर तिखट असतात. त्यांचा तिखटपणा असा जायचा नाही. त्यातला थोअडा सालसा बाजुला काढुन त्यात अधिक टोमॅटो घालुन चवीत काहि फरक पडतो ते पहावे लागेल. सगळ्या सालसामधेच टोमॅटो घालणे, मला धोक्याचे वाटतेय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|