|
Dswati
| |
| Monday, June 02, 2008 - 1:59 pm: |
| 
|
तयार आंबे खाऊन संपले नाहीत तर ते साठवून वर्षभर उपभोग घेण्यासाठी हा खटाटोप. माझ्या सासूबाईंकडून मिळवलेली खात्रीची कृती. पिकलेल्या आंब्याचा रस एका मोठ्या कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात काढावा. कढई वा पातेले स्टीलचे किंवा इतर न कळकणारे असावे. रस मंद आचेवर उकळवावा. जोरदार खदखदू लागल्यावर आचेवरून खाली उतरवावा व त्यात विरघळेल तितकी साखर घालावी. साखर घातल्यावर पुन्हा आचेवर चढवू नये. थोड्या थोड्या वेळाने ढवळत रहावे. थंड झाल्यावर थाळीत पसरून दोन तीन दिवस उन्हात वाळवावा. ढगाळ वातावरण असेल तर साखर घातल्यावरही मंद आचेवर ठेवावा व चांगला गोळा झाल्यावर थाळीत पसरून ठेवावा. ह्या रसाला थोडा काळसर रंग येतो. आटवलेला रस नुसताच खाऊ म्हणून माझी मुले खातात. तो आईसक्रीम, आम्रखंड किंवा मिल्कशेक मधेही वापरता येतो. आटवलेला रस वर्षभर तरी टिकतो.
|
वर्षभर टिकतो ? मुले टिकु देतात ? 
|
Itsme
| |
| Tuesday, June 03, 2008 - 3:41 am: |
| 
|
सगळ्यांचीच मुले च हावरट नसतात बरे
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 03, 2008 - 4:34 am: |
| 
|
दादरला एका दुकानात अलिक्डेच जांभूळपोळी असा फ़लक बघितला, चौकशी केली तर उपलब्ध नव्हती, पण जांभूळ टिकवण्याचा चांगला उपाय दिसतोय हा.
|
Dswati
| |
| Tuesday, June 03, 2008 - 1:47 pm: |
| 
|
अर्थातच डब्यात भरून, डबा लपवून ठेवावा लागतो. माझ्या सासूबाई माझ्या मुलांसाठी खास करतात आणि लपवूनही ठेवतात, नाहीतर आम्ही भारतात पोहोचेपर्यंत कसा टिकेल?
|
Itsme
| |
| Wednesday, June 04, 2008 - 1:39 pm: |
| 
|
थोडी साखर जास्त घालुन चोकोनी वड्या पाडाव्या म्हणजे आल्या गेल्यांना द्यायला पण बर्या दिसतात. आमच्या घरी हा प्रकार दरवर्षी असतो, घरचे आंबे असल्यामुळे.
|
Manuswini
| |
| Wednesday, June 04, 2008 - 5:04 pm: |
| 
|
असाच एक प्रकार रस गरम न करता तसाच वालवून करतो ह्याला आम्ही साठं म्हणतो. पण त्यात साखर नाही घालत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|