|
बटाट्याचे पापड साबुदाणा भाजुन बारिक दळुन आणावा... बटाटे उकडुन किसुन घ्यावे. यात आल्-मिरची पेश्ट किंवा लाल तिखट किंवा दोन्हि थोडे थोडे घालावे..मिठ्-जिरे घालावे,मावेल तेव्हडे साबुदाणा पिठ घालुन गोळा मळावा, झाकुन ठेवावा थोड्यावेळाने तुपाचा हात लावुन सारखा करावा, छोट्या लाट्या करुन खालिवर plastic कागद ठेवुन पापड लाटावे.. १ भांडे बटाटयाचा किस्/ लगदा असेल तर साधारण तेव्हडेच पिठ लागेल..
|
प्राजक्ता, हे पापड घरात, पंख्याखाली वाळवता येतात की कडक उन्हात(च) वाळवावे लागतात?
|
Savani
| |
| Wednesday, May 28, 2008 - 12:49 am: |
| 
|
प्राजक्ता, धन्स ग. मृ ने विचारलाय तोच प्रश्न माझा पण आहे. इकडे मी घरीच साबुदाणा ग्राइंडर वर दळला तरी चालेल नाही?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 28, 2008 - 6:02 am: |
| 
|
साबुदाणा, कोरडाच भाजुन दळावा लागेल. पापड पंख्याखाली वाळवले तर खटकन तुटला पाहिजे, इतपत वाळवावा. जरा जरी मऊ रहिले तर टिकणार नाहीत. अगदी पातळ लाटले, तर एका दिवसाचे ऊन पुरते
|
Itsme
| |
| Wednesday, May 28, 2008 - 6:49 am: |
| 
|
आम्ही हे पापड करतान साबुदाणा भिजवुन घेतो, आणि बटाटा आणि साबुदाणा एकत्र बारीक करतो. plastic च्या कागदा च्या मधे बोटी ठेउन बोटाने गोल-गोल फ़िरवले की झाला पापड तयार.
|
आम्ही पण असेच करतो...पण आमच्या घरात काही लोक पापड करतात काही नुसतेच लाट्या खातात :D
|
पंख्याखाली कोरडे होईपर्यंत पापड बुरशी धरणार. प्रचंड ह्युमिड आहे सध्या!
|
Savani
| |
| Wednesday, May 28, 2008 - 4:44 pm: |
| 
|
मृ, तुला कशाला ग लागताहेत पंख्याखाली वाळवायला. चांगलं कडकडीत ऊन आहे न तुझ्याइथे. ते उद्योग आम्हाला करावे लागतात. ५० अंशाच्या पुढे पारा काही सरकत नाही अजुन.
|
म्रुने बरोबर उत्तर दिलय... पापड वाळेस्तोवर बुरशी धरतिल.. चांगल कडकडित उन्ह दोन दिवसाच तरी पाहिजे.. दिनेशदा म्हणतात तस कितिही पातळ लाटल तरी उन पहिजेच..(बिन्-उन्हाचे एकच पापड ते म्हणजे उडिद) त्याशिवाय टिकणार नाही. सावनी ग्रांईडर भक्कम असेल तर हरकत नाही..(इथल्या १० बटनांच्या ब्लेन्डरवर काही बारिक होत नाही).. किंवा थोडा खटाटोप असा करता येईल.. साबुदाणा अगदी मऊ भिजवुन घ्यावा..मग पुरणयंत्राला बारिक चाळणी लावुन काढुन घ्यावा..मग, पुढची क्रुती करावी.. इट्स्मी म्हणते ते " बोटिपापड. " .. त्याला पिठ थोडे सैलसर(चिकट नाही ) असावे लागते.
|
सावनी, अगं ऊन जीतकं वाढतं तशी ह्युमिडिटी पण! फ्लोरिडा म्हणजे नुस्ती दलदल! बरं बाहेर वाळवायची सोय नाही. पक्षी एकही पापड टिकु द्यायचे नाहीत! न्यु यॉर्कला असताना साबुदाण्याच्या पापड्या खायची खूप इच्छा झाली तर वाटीभर साबुदाणा भिजत घालून पापड्या केल्या आणि रुम हिटर लावून वाळवल्या. बहुतेक तसंच करावं लागेल.
|
Savani
| |
| Wednesday, May 28, 2008 - 8:32 pm: |
| 
|
ते मात्र खरय मृ. दमटपणा मुळे उन्हाचा काय उपयोग. प्राजक्ता, चांगला भक्कम ग्राइंडर आहे. मी बरीचशी पीठं दळते त्याच्यावर.
|
Karadkar
| |
| Wednesday, May 28, 2008 - 8:47 pm: |
| 
|
ए सबुदाण्याच्या पिठासाठी इतके उद्योग कशाला करताय उसगावात असाल तर. Tapioca Flour या नावाने बर्याच किराणा मालाच्या दुकानात मिळते ते पीठ. ते आणुन उत्साह असेल तर कढईत भाजायचे किंवा मग ओवन मधे १५०-१७५ वर ठेवुन लक्ष देत टोस्ट करायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|