|
Dineshvs
| |
| Tuesday, May 20, 2008 - 2:55 am: |
|
|
शिळ्या भाकर्या असल्या तर त्या कुस्करून फ़ोडणीला देतात. तो भगरा खुप चवदार लागतो. नाचणीच्या पिठाचा, भाकर्या न करताच, असा एक चवदार पदार्थ करता येतो. एक कप ओले खोबरे वा किसलेला कोबी वा गाजर, किंवा यापैकी जे असेल ते घेऊन त्यात दोन कप नाचणीचे पिठ घालावे. हलक्या हाताने कालवावे. वरुन थोडे ताक वा दूध शिंपडावे. हे मिश्रण मळायचे नाही, कोरडेच ठेवायचे आहे. भाकरीच्या चुर्याप्रमाणे दिसायला हवे. मग हे मिश्रण, मोदकाप्रमाणे ( आणखी पाणी न घालता ) आठ दहा मिनिटे वाफ़वून घ्यावे. मग ते पुर्ण थंड होवू द्यावे. हे आदल्या रात्री करुन ठेवले तरी चालेल. मग एक मोठा कांदा बारिक कापुन घ्यावा. आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि लसुण जाडसर वाटून घ्यावा. ते काढुन थोडे कच्चे शेंगदाणे भरड वाटुन घ्यावेत. थोड्या तेलात हे दाण्याचे भरड भाजून घ्यावे. मग ते बाहेर काढून हिंगजिर्याची फ़ोडणी करावी. त्यात मिरची लसूण परतावा. मग कांदा परतावा. ( कांदा वगळला तरी चालेल, किंवा कच्चाच वरून घातला तरी चालेल ) मग त्यात नाचणीचा भगरा हाताने मोकळा करुन घालावा. मीठ साखर घालुन वाफ़ येऊ द्यावी. वरुन दाण्याचे मिश्रण आणि लिंबू कोथिंबीर घालावी. मस्त पोटभरीचा प्रकार होतो. नाचणीच्या पिठाबरोबर ज्वारी किंवा तांदळाचे पिठ घेतले तरी चालेल. दाण्याचे कूट करायला वेळ नसेल तर तयार कूट वापरले तरी चालेल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|