Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
चकलीच्या सोर्‍या ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » चकलीच्या सोर्‍या « Previous Next »

Psg
Friday, April 18, 2008 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोली सुरु झाल्यापासून इथे कोणी डोकावतं की नाही काय माहीत? तरी पण चुकून एखादीने पाहिलेच तर.. म्हणून विचारते :-)

मला चकली करायचा सोर्‍या घ्यायचा आहे. आमच्याकडे एक पारंपारिक सोर्‍या आहे- लाकडी दोन भाग असलेला. मधे पीठ भरून दुसरा भाग त्यावर ठेवून दाबायचा.. पण यात हात प्रचंड भरून येतात :-(

'अंजली'चा सोर्‍या ज्याला स्प्रिंग असते आणि एका हातानी दाबायचा असतो तो कोणी वापरला आहे का? कसा असतो?

तसंच एक पितळी सोर्‍या पण मी पाहिला आहे. त्याला एक मोठं हॅंडल असतं, सोर्‍यात पीठ भरून ते हॅंडल गोल फ़िरवायचं असतं म्हणे. यात अजिबात हात दुखत नाहीत असं ऐकून आहे.. कोणाला काही अनुभव?

प्लीज शेअर करा..


Manjud
Friday, April 18, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, लाकडी सोर्‍यापेक्षा पितळेचा सोर्‍या एकदम छान आहे. खरंच त्याने हात दुखत नाहीत. त्या लाकडी सोर्‍याने एकदम सॉलिड मसल्स टोनिंग होतं . स्प्रिंग असलेला सोर्‍या मी वापरला आहे. पण शेव पाडण्यासाठी तो ठिक वाटतो. चकली पाडायला आपले हात पण गोल फिरवावे लागतात. मग ती स्प्रिंग प्रेस करणं आणि हात गोल फिरवणं एक्दम होत नाही. सरावाने जमतही असेल पण मला तरी चकलीसाठी तो पितळेचाच सोर्‍या कंफर्टेबल वाटला.


Tonaga
Friday, April 18, 2008 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाकडी सोर्‍या पूर्वी ठीक होता आता नवीन तन्त्राचा, गरजांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून बनवलेला चांगलाच असणार...

जुने जाऊ द्या मरणालागुनि,
जाळुनि किंवा पुरुन टाका,
सावध ऐका पुढल्या हाका
चकल्या सत्वर करा चला तर..

एक सोर्‍या द्या मज आणुन
दाबील मी जो स्वप्राणाने,
सम्पवून टाकील सगळे पीठ,
सुगम त्याचे ते स्प्रिंग फिरवणे....

केशवसुत


Prachee
Friday, April 18, 2008 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, अंजलीचा सोर्‍याही खुप उपयोगी पडतो. चांगला आहे. माझ्याकडे आहे आणि मलातरी वापरायला सोपा वाटला. शिवाय, स्वच्छ करायलाही सोपा आहे.

Mrinmayee
Friday, April 18, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, तिन्ही सोरे वापरून बघीतलेत.

पितळी बेष्ट!!!
अंजली स्प्रिंग ठीक.
लाकडी ठोंब्या वाईट्ट!.. हे आपलं माझं मत्त! :-)


Lalu
Friday, April 18, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे अंजली सारखाच पण 'मारुती' चा आहे मेटलचा. प्रेस करायचे हॅंडल एकदम स्मूथ आहे. ते एका हाताने प्रेस करता येते. दुसर्‍या हाताने पीठ भरलेला भाग धरायचा. या फोटोत त्या बाईने कुकी प्रेस धरले आहे तसे-
http://www.chocolatespoon.com/musings/images/cookies3.jpg
मला ते खूप सोपे वाटते. दोन्ही हातानी हॅंडल धरले तर ते जरा अवघड पडत असेल फिरवायला. त्यात पीठ खूप मावते त्यामुळे एका वेळी बर्‍याच चकल्या होतात, सारखे भरत बसावे लागत नाही. मी पितळी कधी वापरला नाही.
कोणाकडे असतील तर दोन्ही प्रकारचे आणून वापरुन बघ. :-)

Divya
Friday, April 18, 2008 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजलीचा सोर्या फ़ारच छान आहे. हात दुखत नाहीत. एका सोर्यात आठ दहा तरी चकल्या होतात. शेवेसाठीपण मी वापरते. चकली च्या छोट्या ताटली (काय म्हणायचे त्याला?) बरोबर जाड बारीक शेवेची पण मिळते आणि बाकिच्याही बर्याच येतात.

Tonaga
Friday, April 18, 2008 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला आम्ही चकत्या म्हणतो...
का म्हणू नये आम्ही चकत्या त्याला? :-)


Chinnu
Friday, April 18, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनमताई, ओजस चा मिळत असेल तर नक्की घे. स्टीलचा असतो. हात अजिबात दुखत नाहित. स्प्रिंग असतेच. शिवाय स्टीलचा असल्याने व्यवस्थित धुता येतो. एक छोटा डबा भरून तीस एक तरी साचे मिळतात. त्यात शेव, चकली आणि इतर बर्‍याच Designs येतात.
गंमत म्हणजे ओजसमुळे काम इतके सोपे असते की मला फ़क्त पीठ तयार करायचे काम असते बस. बाकी सब ओजस आणि घरातली मंडळी! टिंगटॉंग! :-)
मी 2/3 वर्षांपासून वापरत आहे.


Prr
Friday, April 18, 2008 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम मला चकल्या नाही येत पण लहानपणापासुन पितळी सोर्‍याने चकल्या पाडायचे. दिवाळीला चकल्या करताना तेच मला जमायचे खरे तर :-). मंजु म्हणाल्याप्रमाणे हॅन्डल गोल फ़िरवताना हव्या तश्या आकराच्या चकल्या अगदि सहज करता येतात. आणी हात दुखत नाहीत.

Manuswini
Friday, April 18, 2008 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाकडी पेक्षा पितळी चांगला असे मला वाटते. तो स्टीलचा मला नाही आवडला. स्प्रींग एकदम बेकार.
नखरेच भरपूर असाअ आहे प्रकार.
माझी आई अजूनही लाकडीच वापरते आवडीने.


Psg
Saturday, April 19, 2008 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती गुणी मुली आहेत सगळ्या.. कशी पटापट उत्तरं दिलीत :-) धन्स..

एकूण बघता, लाकडी सोर्‍या माळ्यावर ठेवून द्यावा हे सार्वमत दिसतंय :-)

पितळी का स्प्रिंगचा यात मतं विभागली गेली आहेत. काय करू? एका मैत्रिणीकडे अंजलीचा आहे, तो (तिने दिला तर) आणून, वापरून बघते. आणि मग कळवते तुम्हाला.. खूप खूप धन्स सगळ्यांना :-)


Manuswini
Sunday, April 20, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मतमोजणी कर नी ज्यास्त मते ज्या सोर्‍याला तो घे :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators