|
Dineshvs
| |
| Monday, April 07, 2008 - 4:25 pm: |
| 
|
इडली किंवा डोश्याचे पिठ उरले तर परत ते करणे नको होते. त्यावेळी करता येण्याजोगा एक प्रकार. ( अर्थात माझा यशस्वी प्रयोग ) हे माझ्या प्रयोगातले घटक पदार्थ आहेत, पण आवडीनुसार काय बदल करता येतील, तेही सूचवतोय. दोन वाट्या इडलीचे तयार पिठ घेऊन त्यात पाव वाटी ओले खोबरे, मूठभर कोथिंबीर घालावी. अर्धी वाटी मटार, कोबीचा किस, दुधीचा किस, गाजराचा किस, यापैकी जे उपलब्ध असेल ते घालावे. चवीप्रमाणे बारिक चिरलेली हिरवी मिरची, अर्धी वाटी दाण्याचे कूट, आणि थोडा हिंग घालून नीट ढवळुन घ्यावे. जर पिठ शिळे असेल तर त्याला आंबट चव आलेली असते, म्हणुन त्यात थोडी साखर घालावी. चव बघुन मीठ घालावे. अर्धा चमचा कच्चे तेल घालावे. त्यात अर्धी वाटी पोहे घालावेत. जर पोहे जाड असतील तर पाण्याने धुवून आणि पातळ असतील तर तसेच घालावेत. पोह्यांच्या जागी शिळा भातही वापरता येईल. एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉन स्टीक पॅनमधे थोडेसे तेल गरम करावे. त्यात जिरे, तीळ थोडेसे पसरुन घालावेत. तीळाच्या जागी उडदाची डाळहि वपरता येईल. मग त्यात तयार मिश्रण ओतावे. ढवळु नये. त्यावर झाकण ठेवुन अगदी मंद आचेवर शिजु द्यावे. कडेने सुटु लागले कि उलथन्याने कडा सोडवुन घ्यावात. त्यावर थोडेसे तेल लावलेला तवा पालथा घालावा आणि काळजी पुर्वक कढई वा पॅन त्या तव्यावर उपडे करावे. कढई उपडी करायला जरा काळजी घ्यावी लागते पण पॅन उपडे करणे सोपे जाते. मग परत थोडावेळ तवा गॅसवर ठेवावा. नीट शिजले कि बशीत काढून घ्यावे. याच्या सोबत काहि चटणी वगैरे लागत नाही. अपेक्षेपेक्षाही खुप छान चव येते याला. फोटो सोबत देतोय.

|
Itsme
| |
| Tuesday, April 08, 2008 - 7:00 am: |
| 
|
नुसता फोटोच .... एकदा करुन बघायला हवे, इडलीच्या पीठाचे कुठलेही रुप मला अतीशय प्रिय आहे
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 08, 2008 - 3:07 pm: |
| 
|
पूढच्या ट्रेकच्या वेळी नक्कि, यावेळी फ़क्त खाऊगिरीसाठी एक ट्रेक करायचा, बरं का.
|
Ashu
| |
| Thursday, May 15, 2008 - 2:50 pm: |
| 
|
दिनेशदा मी काल हे करुन बघितले, पोहे किन्वा भात घातले नव्हते तरीपण मस्त लागले,इड्लीचे पीठ नेहमीच जास्तीचे होते. तेव्हा पीठ सम्पवण्याचा आणि झट्पट होणारा प्रकार परत परत करीन हे नक्की.
|
Sonchafa
| |
| Tuesday, May 20, 2008 - 2:13 am: |
| 
|
वॉव जंबो इडली...! पाणी सुटलं तोंडाला. पुढच्या वेळेस मुद्दाम पीठ जास्त करणार
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|