|
mods असेल जर हा thread आधीच कुठे तर हलवा तिथे, मी अशी करते, जी बरेच friends सांगतात की त्यांना आवडते; तूरडाळ आमटी : तूरडाळ फक्त हळद नी किंचीत तेल घालून उकडवून घ्यावी. मग घोटावी गरम असतानाच, त्यातच किंचीत काळा किंवा गोडा मसाला धणा पॉवडर(हो मी सेपरेट घालते), लाल मसाला घालते. फोडणी एकदम खंमग द्यायची. तेल तापले की गॅस कमी करावा. मग त्यात हिंग, भरडसर जीरे टाकावे(अक्खे टाकु नये), ठेचलेली लसूण(ठेचूनच टाकावी), हवे असल्यास कडीपत्ता, लाल सुखी मिरची(शोभेला), राई चांगली तडतडावी. आम्ही(आमच्या घरी) कोकम वापरतो आमटीत. नाहीतर चिंच टाकावी. मग गूळ हातानेच चेपून टाकावा. मग ही डाळ ओतावी चर्र आवाज़ होतो. मग वरून अगदी बारीक चिरलेली कोथींबीर मी टाकते. अगदी बारीक करावी. मग एखादा चमचा वरून मी शुद्ध तूप टाकते नेई मंद आचीवर ठेवते. मस्त लागते. हवे असल्यास कोथींबीर, हिरवी मिरची वाटून लाव वेगळेपणासाठी. गरम भाताबरोबर छान लागते ही डाळ. किंवा फुलके. क्यास्त मग डाळ उकळवत बसू नये. फोडणी नंतर. त्या शुद्ध तूपाचा वास मस्त वाटतो.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|