|
Prr
| |
| Wednesday, April 02, 2008 - 3:42 pm: |
| 
|
स्वयंपाकासाठी कुठली भांडी वापरावीत ... stainless Steel, cast Iron, Hard anodized, aluminium, hard anodized aluminum (Calphalon) , non stic coating(Teflon), earthenware pots ...which is healthier to use?
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 02, 2008 - 4:39 pm: |
| 
|
सर्वात आदर्श, मातीची भांडी आणि आता काचेची. बाकि कुठल्याही अगदी नॉन स्टिक भांड्याचा पदार्थावर थोडाफ़ार परिणाम होतोच. मला वाटते यावर आधी चर्चा झालीय इथे.
|
Prr
| |
| Thursday, April 03, 2008 - 1:35 pm: |
| 
|
हो ते आहेच. पण तरीही जी कमी परीणाम करतात त्यांची महिती मिळेल का? मला नवीन भांडी घ्यायची आहेत. .... पण आजकाल बाजारात एवढे प्रकार आहेत की नक्की काय चांगले ते नाही कळले. मातीची भांड्यांबाबत तर कुठे लिहीलेले आढळले नाही. मातीची भांडी..... ह्म्म्म्म.... त्यात शिजणार्या पदार्थांची चव तर छानच येते. कालवण, आमटी यासाठी मातीचे भांडे वापरतो. पण मातीच्या भांड्यांमध्ये सगळ्या प्रकारचे जेवण करता येइल का? काचेची भांडी जेवण करायला कशी चालतील? आधी चर्चा झाली असेल तर मी हा थ्रेड डिलीट करायला सांगते. ब्रॅन्डपेक्शा कुठल्या मेटलची भांडी वापरावीत आरोग्याच्या दृष्टीने... याबाबत सविस्तर अशी माहिती मिळाली नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:02 pm: |
| 
|
मातीच्या भांड्यात सर्व तर्हेचे जेवण करता येते. अजुनही काहि देशात तशी भांडी वापरतात. मायक्रोवेव्हमधे काचेची भांडी वापरता येतात. तांब्याची उत्तम कल्हई केलेली ठोक्याची भांडी उत्तम असत पण अलिकडे जाड तांब्याची भांडीच मिळत नाहीत आणि कल्हईवाला तर कुठे दिसतच नाही. लोखंडाचा तवा, कढई उत्तम, पण त्यात केलेले पदार्थ नेहमी लगेच दुसर्या भांड्यात काढून घ्यावेत. ( नाहीतर कळकतात ) चपाती, भाकरी, डोसा साठी लोखंडाचा तवाच उत्तम. स्टेनलेस स्टीलची भांडी तशी बरी, पण ती फार पातळ असू नयेत. नॉन स्टिक भांडी वापरली तर आवर्जुन तेल तूप कमी वापरावे,तसेच ती भांडी कधीही प्रखर आचेवर ठेवु नयेत. अल्युमिनियमची भांडी शक्यतो जेवण शिजवायला वापरू नयेत.
|
Prr
| |
| Friday, April 04, 2008 - 8:08 pm: |
| 
|
मायक्रोवेव्हमधे काचेची भांडी वापरता येतात.>>> अरे हो विसरलेच मी . ... खरे तर मी गॅसवर वापरता येतील अशा भांड्याचाच विचार केला. कळकतात... .... बरे झाले तुम्ही सांगितलेत. लोखंडाची भांडी रोज वापरु शकतो का. ...मला कोणीतरी सांगितले होते की फ़क़्त ऍनिमीया असणार्यांसाठी रोज वापरणे ठिक आहे. अरे बापरे! मी तर रोज अल्युमिनियमचे भांडे हॉकिन्स कुकर वापरते. आमच्याकडे बरेचदा अल्युमिनियमची भांडी वापरतात. हे hard anodized पण नॉनस्टिकच आहे ना! पण नॉर्मल नॉनस्टिक भांड्यांपेक्शा हे वापरणे जास्त चांगले आहे का? मातीची भांडी वापरताना काही खास काळजी घ्यावी लागते का. ... म्हणजे असे हाताळावे etc...
|
Karadkar
| |
| Friday, April 04, 2008 - 11:08 pm: |
| 
|
मी इथे खरेतर परवाच लिहिणार होते पण म्हणले लोकांची काय काय उत्तरे येतात बघु मग ठरवु! १. काचेची भांडी जी मायक्रोवेव सेफ़ असतात तीच फ़क्त मायक्रोवेव मधे वापरता येतात. २. बोरोसील नावाच्या कंपनीने मधे काचेचे चहा करायचे भांडे बाजारात आणले आहे ते उत्तम आहे. त्यात वेगवेगळे साईझेस पण मिळतात. पण भांडे नुसते तापवू नये, थंड फ़रशीवर वगैरे ठेवु नये या सुचना नीट पाळाव्या लागतात. २. बेकिंग करत असाल तर US मधे पायरेक्स आणि भारतात बोरोसील वापरायला चांगलि असतात. ४. रोजच्या गॅसवर ठेवुन करण्याच्या स्वयंपाकासाठी, US मधे कॉर्निन्ग्वेअर नावाच्या कंपनीची काचेची भांडी पूर्वी मिळत असत आता मिळत नाहीत. ५. रोजच्या पोळ्या भाजायला लोखंडाचा तवा वापरायला हरकत नसावी. तो US मधे 'case iron griddle' या नावाने मिळतो. त्यातच कधितरी पालेभाजी वगैरे केली आणि केल्या केल्या दुसर्या भांड्यात काढुन ठेवली तर रोजही करायला हरकत नाही. भारतत बीडचे तवे आणी कढया अजुनही मिळतत . ६. अल्युमिनिअमच्या भांड्यात पदार्थ फ़ार्वेळ ठेवला तर त्याची पण प्रक्रिया होते म्हणुन ओले पदार्थ जसे भाजी, आमटी वगैरे अल्युमिनिअमच्य भांड्यात करु नयेत. चिवडा वगैरे करायला हरकत नसावी. ७. तांबे, पितळ वगैरेची भांडी कितीही 'उष्णतेचे वाहक' असली तरी आत्ताच्या जमान्यात ती वापरणे शक्य नाही तेव्हा त्याचा विचार करण्याची गरज नाही. William Sonoma सारखी दुकाने आतुन स्टील आणि बाहेरुन तांबे लावलेली भांडी जवळ्पास $६०-$७५ ला २ कप आकाराचे एक भांडे विकतात. त्याचा खरोखर किति उपयोग होतो ते मला माहीती नाही. ८. La Creuset नावाच्या कंपनीची लोखंदाची वरून एनामल लावलेली उत्क्रुष्ठ भांडी मेसीज, William sonomaa वगैरे दुकानात मिळतात. पण ती वजनाने खूप जड आणि महाग असतात. पण त्यात पदार्थ चांगले होतात असे ऐकले आहे. स्वत:चा अनुभव नाही. ९. स्टीलची copper bottom वाली देशातली भांडी जर तळ सपाट असेल तर US मधे पण चालतात. पण गोल असेल आणि घरी flat गॅस असेल तर पदार्थ शिजायला त्रास होतो. पण आच खुप प्रखर असु नये. १०. analon, circulon, calphalon वगैरे हार्ड अनोडाईझ्ड भांडी नीट लाकडी चमचे उलातणी वगैरे वापरली तरी १० वर्षे वगैरे नीट रहातात. भांडे सगळीकडुन नीट तापते, मौ स्पंजने घासले तरी नीट साफ़ होते आणि पदार्थ जळला असेल तर जरा जरा पाणी घालुन थोडासा भांडी घासायचा साबण घालून उकळले तर नीट निघते. ११. US मधे मिळणारी fabreware, beligue, calphalon वगैरे कंपनीची स्टीलची heavy bottom ची भांडी मिळतात त्यात पण लाकडाचे चमचे वगैरे वापरले तर त्यावर चरे उमटत नाहीत. आणि घासायला पण खूप त्रास होत नाहीत. पण स्टील असल्याने थोड्या दिवसांनी त्याची चकाकी कमी होत जातेच. तळ खूप जड असेल, beligue, calphalon सारखी भांडी, तर भांडे तापायला वेळ लागतो आणी तापलेले भांडे गार होण्यासही वेळ लागतो त्यामुळे ते तंत्र थोडे जमावे लागते. १२. भारतात आता hawkins futura ची बरीचशी भांडी मस्त मिळतात. तळ सपाट असतील तर US मधे पण वापरायला हरकत नाही. १४. प्रेशर कुकरमध्ये डाररेक्ट पदार्थ शिजवायचा असेल तर शक्यतो स्टील, futura वापरलेला बरा. १५. भारतात दूध, दही यासाठी वेगळी भांडी लागतत त्यासाठी साधी स्टीलची भांडी वापरायला हरकत नाही. १६. मातीची भांडी पुर्वी सर्रास वापरली जात असत. म्हणुन मी माझ्या pottery teacher ला करायचे आहे म्हणुन सांगितले . तेव्हा तिने दिलेले उत्तर खालिल प्रमाणे - In old day, the clay used in making the pots was natural clay. No one added any chemicals in the clay. So it was good to use. Now a days in the modern pottery, the clay is half natural and half chemicals so I wouldn't suggest to make any pots without glazes to cook food directly. The food particles can go in the porous surface and might not get cleaned at all and might be home for lot of bacterias. There is a French company who make these kind of pots and might be available in high end shops. If the Indian cooks still use these earthen pots to make some dishes, I am not sure how hygienic it is and what kind of clay is used. I have not seen them so I can't comment. मला वाटते गेले ५० एक वर्षे pottery करणाअर्या, त्यावर research करणार्या व्यक्तीचे मत थोडे तरी ग्राह्य मानायला हवेच.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 05, 2008 - 2:59 am: |
| 
|
पूनम, चपातीसाठी भाकरीसाठी लोखंडाचाच तवा उत्तम. कुठल्या कामासाठी कुठला तवा वापरायचा, याची चर्चा इथे आहे कुठेतरी. या कामासाठी लोखंडाचाच तवा वापरणे चांगले आणि भारताचा विचार केला तर ६० टक्के लोकात लोहाची कमतरता असते. कॉपर बॉटमची स्टीलची भांडी मिळतात त्यातला तांब्याचा थर खुपच पातळ असतो, आणि तो कालांतराने निघून जातो. कुकरमधे स्टीलचे डबे वापरले, तर कुकर अल्युमिनियमचा असला तरी चालतो. योग्य तपमान, इंधनाची बचत यासाठी तोच धातू चांगला. नॉनस्टिक भांड्यांची काळजी घेतली तर उत्तम टिकतात, पण त्यावर चपात्या नीट भाजल्या जात नाहीत. बहुतेक घरात पोपडे आलेले, खरचटलेलेच तवे दिसतात. भारतात भूमि नावाने मातीची खास भांडी मिळत होती, आता दिसत नाहीत. तरिही अनेक भांडी अजुनही मिळतात. खास बंजारा डिशेस साठी ती लागतात. ती कशी वापरायची आणि त्याची काय काळजी घ्यायची ते पण मी लिहिले होते. त्यातल्या पदार्थाना अप्रतिम चव येते. महाराष्ट्रातल्या किनारा भागात भाताचा कोंडा, भोकरे आणि गूळ वापरून, एक खापुर्ली नावाचा, केकसारखा प्रकार करतात. तो खास मातीच्या तवलीतच करतात.तो रात्रभर मंद आचेवर भाजतात. अप्रतिम चव येते त्याला. मातीच्या गाडग्यातल्या, नाचणीच्या आंबिलीली पण मस्त चव येते. अमेरिकेतले माहित नाही, पण आफ़्रिकेत मी रोजच्या जेवणाला मातीचीच भांडी वापरत असे. तिथले बहुतेक स्थानिक लोक तीच वापरतात.
|
Prr
| |
| Wednesday, April 09, 2008 - 4:37 pm: |
| 
|
कराडकर... फ़ारच सविस्तर आणि नविन माहिती दिलीत. काचेचे चहाचे भाडे छानच आहे. http://www.borosil.com/Carafe.asp फ़क्त वापरताना काळजीपुर्वक वापरायचे लक्शात ठेवायला हवे. La Creuset ची भांडी पाहिली MECY'S मध्ये. पण एनामल केलेली लोखंडाची भांडी वापरणे कितपत फ़ायदेशीर आहे? because Cast iron cookware leaches small amounts of iron into the food. मातीच्या भांड्यांबाबत मला नेमके हेच विचारायचे होते की कुठल्या मातीची भांडी वापरावीत. मला वाटते देशात अजुनही गावांमध्ये natural clay ची मातीची भांडी मिळतील. दिनेशदा वाचली मी तव्याची चर्चा. कॉपर बॉटमची स्टीलची भांडी वापरताना असे लक्शात आले की स्टीलची भांडी कालांतराने तळाला काळी पडतात. कॉपर बॉटम असल्याने प्रखर आचेवर ठेवुनही फ़ारशी काळी पडत नाहीत. बाकी काही फ़रक जाणवला नाही. तुमची पोस्ट वाचुन मी आता स्टीलची भांडी असलेला कुकरच वापरतेय. अमेरीकेत स्थानिक लोक घरी जेवण करण्यापेक्शा रेडीमेड, बेक वा मायक्रोवेव मध्ये झटपट करता येईल असेच जेवण करतात. त्यामुळे भांडी शक्यतो कमीच लागत असावीत. भूमि बद्दल लिहिलेले सर्च करुनही दिसले नाही. ह्या केकच्या वेगळ्या प्रकाराची रेसीपी लिहा ना!
|
Dineshvs
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:37 am: |
| 
|
भुमि भांडी बंदच झाली आता. पण आपल्याकडे घडाभाजी, पर्पटी, असे अनेक प्रकार अजुनही मातीच्या भांड्यात करतात. मला स्वतःला खुप तेल वापरणे, ते धूर येईपर्यंत तापवणे हे प्रकारच आवडत नाहीत, त्यामूळे माझी भांडी व्यवस्थित टिकतात. अलिकडे मी पुर्णपणे प्लॅस्टिकचा कुकर वापरतो. लहान मुलांच्या दूधाच्या बाटल्या ज्या दर्ज्याच्या प्लॅस्टिकच्या बनवतात त्याचा हा कुकर आहे. हा वीजेवर चालतो आणि त्यात स्टीलचे डबे वापरता येतात. यात तर अजिबातच तेल वापरावे लागत नाही कि लक्ष द्यावे लागत नाही. पण हा कुकर भारताबाहेर उपलब्ध आहे का ते मला माहित नाही. तसेच याचे तंत्र नीट न जमल्याने भारतातही त्याला फारसा उठाव नाही. ईझी कुक नावाने तो मिळतो.
|
Prr
| |
| Friday, April 18, 2008 - 4:25 pm: |
| 
|
आवडण्यापेक्शा धुर येईपर्यण्त तापवले कि भांडी मस्त काळी व्हायला लागतात माझी. त्यामुळे मी असे प्रकार करतच नाही. प्लॅस्टिकचा कुकर नाही माहित. अजुन तरी असे काही दिसले नाहि इथे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|