|
Dineshvs
| |
| Monday, March 17, 2008 - 1:06 pm: |
|
|
भिजवलेली हरभरा डाळ जाडसर वाटुन घ्यावी. वाटतानाच त्यात चवीप्रमाणे, तिखट मीठ, हिंग व हळद घालावे. कोथिंबीर चिरुन घालावी. एक वाटी डाळीला एक चमचा कणीक पण घालावी, म्हणजे गोळे फ़ुटत नाहीत. चव घेऊन पहावी, नेहमीपेक्षा झणझणीत असावी. मग त्याचे सुपारी एवढे गोळे करावेत. गोळे करताना मुठीने दाबुन घ्यावेत. एवढ्या डाळीसाठी, दोन मोठे कांदे उभे चितुन तळुन घ्यावेत. अर्धी वाटी सुके खोबरे खमंग भाजुन घ्यावे. त्यात पाचसहा लसुण पाकळ्या आणि थोडे आले घालुन बारिक वाटुन घ्यावे. ( या ऐवजी तयार कांदा खोबर्याचा मसाला वापरला तरी चालेल ) आवडत असल्यास आणखी एक छोटा कांदा बारिक चिरून घ्यावा. तेलाची हिंग जिर्याची फ़ोडणी करावी. त्यात हळद घालुन बारिक चिरलेला कांदा घालावा. तो वापरत नसल्यास थोडी कोथिंबीर घालावी. त्यातच वरचा मसाला थोडा परतुन घ्यावा. मग हवे तेवढे पाणी ओतावे. त्यात चिंच व थोडातरी गूळ घालावा. आमटी चांगली खळबळ उकळायला हवी. अगदी चमचाभर बेसन पाण्यात मिसळून त्यात घालावे. मीठ व तिखड आवडीप्रमाणे घालावे. मग त्यात हळु हळु म्हणजे एकेक करुन गोळे सोडावेत. पहिला घातलेला वर आला कि दुसरा घालावा. एकदम घालु नयेत. गोळे शिजले कि वरती येतात. गोळे घातल्यावर आमटी फार उकळु नये तसेच परत फ़ार गरमही करु नये. वरुन कोथिंबीर घालुन खावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|